मंगळवार, जुलै 14, 2020
   
Text Size


दुर्दैवी सीता

कामाला जा उद्यांपासून. बसून बसून मरशील. हात पाय हलव जरा. जा कामावर* तो म्हणाला. ती मिलमध्ये गेली. तेथे एक नवीन नर्स आली होती. ती म्हणाली. बाई इतक्यात नका कामाला येऊ! दोन महिने झाले का? बाई नवरा घरी मारील. द्या काही काम - सांगा मालकाला, ती म्हणाली. ती नर्स मॅनेजरकडे गेली व म्हणाली, काही हलके काम द्या तिला.

‘तुम्हांला काय गरज? कायदा आमच्या बोकांडी आहे. जाऊ दे तिलां. मॅनेजर म्हणाला.

ती घरी गेली. नवरा बोले, मारी. शेवटी इतर कामगार बाया एके दिवशी त्या नर्सला म्हणाल्या, ‘ठेवा तिला कामावर. येथे आमच्याजवळचा तुकडा खाईल. घरी नरकयातना आहेत तिलां. त्या नर्सने  मॅनेजरची समजूत घालून तिला हलके काम
दिले. इतर बाया तिला चटणी भाकर थोडीथोडी देत.

‘मूल का गेले?’ त्या बाया विचारीत. तिचे अश्रू उत्तर देत. पगाराचे थोडेतरी पैसे मागे रहावे, काही खायला घ्यायला होतील तिला वाटले. परंतु पगाराचा कागद होई त्या दिवशी नवरा हजर असे.

त्या महिन्यात तिने खोटेच सांगितले. ‘मी गेले होते. संडासात. पगाराचा कागद मिळाला नाही. दंडही झाला आहे.’ परंतु त्यांने चौकशी केली. ते खोटे होते.

'घरी तर ये सटव्ये, तुझा संडास काढतो' तो गरजला.

त्यांने तिला मरेमरेतो झोडपले. सकाळी तिला उठवेना. तो कामाला गेला. ती विव्हळत होती. ‘देवा नारायणा, मला ने, अंबाबाई, झोळाई, सोमजाई, मला ने ती म्हणत होती. तो घरी आला. ती निश्चेष्ट होती.

पुरे ढोंग. ऊठ रांडे’ असे म्हणून त्याने लाथ मारली. परंतु हालचाल नाही. काही नाही. त्याने तीव्रपणे पाहिले. तो जवळ बसला. ‘मेलीस की काय?’ तो म्हणाला. उठून शेजा-यांना जाऊन म्हणाला. ‘बायको मेली काय, बघा हो.’ ते आले. आयाबाया आल्या. कोणी डॉक्टरला आणले.

‘मेली’, डॉक्टर म्हणाला. ‘हे सांगायची फी हवी का?’ ‘तर मेल्याचे का फुकट सांगू?’

‘तुला पैसे देऊन दारुला काय?’ डॉक्टर निघून गेला. रामा तेथे बसला होता. रागाने म्हणाला,’ इतक्यात मरायला फावलं तुला. दवाखान्यात तुला पाठवले बाळंतपणाला. त्याचे पैसे तरी फेडायचे होतेस माझे. आणि आता तुला जाळायला कोठून आणू पैसे? बोल की सटवे’.

शेजा-यांनी सारी क्रिया केली. रामा नुसता बरोबर गेला. तिकडे अनाथालयात आज बाळ रडत होता.

दिवाळीचे दिवस. रामा मुलखात गेला. तुळशीची लग्ने लागली. रामाने नवीन नोवरी हेरुन ठेवली. ‘मार्गसरात येतो. बार उडवतो तो म्हणाला. कोणी त्याला म्हणाला, अरे काही कामगार चार चार बायका करतात. त्यांचा पगार मिळावा म्हणून लग्न. द्यावा ओला सुका तुकडा, द्याव्या चिंध्या, आणि घ्यावा पगार. खेळाचा जुगार, बघावा सिनेमा, प्यावी दारू. स्पिरिट. तुला एक बायको मिळायला काय पंचाईत? रामा हसला. तो मुंबईस गेला. आणि म्होंरं माघाच्या महिन्यात पुन्हा मुलखात जाऊन नव्या नोवरीला पर्णून तिला मुंबईस घेऊन आला. तीही गिरणीत कामाला लागली. घाण्याला जुंपली गेली. ती पहिली सीताधरित्रीमाईच्या पोटात गेली. आता या दुस-या रमीचे काय होणार? दारुला नि जुगाराला माहित! आणि मुलांची काळजी घेणारे अनाथालय आहेत!!

खरेच नको ही दारू. करा तिला दूर.

 

मला दारु दे, स्पिरीट दे. म्हणे जेवायला चला. मला दारू लागते, समजलीस. ती पोटभर मला पाज. मिलमधून सारा पगार आण. याद राख. तो नशेत बोलला. तिचे अश्रू थांबत ना. ती थकली होती. परंतु तिला भाकरी खाववेना. ती तशीच निजली. सकाळी तीच शिळी भाकरी घेऊन दोघं कामाला गेली. सीतेचा पगार आला. त्याने ताब्यात घेतला. तिच्या नेसूचे फाटले होते. परंतु कोण घेणार लुगडे? मागती तर मार खाती. आणि मिलच्या रेशनशॉपमधून धान्य आणी. परंतु पैसे दारूला. हवेत म्हणून तो त्याचा  काळाबाजार करी. घरात भाकरीला.  पीठ नाही. भाताला तांदूळ नाही. तो हॉटेलात राइसप्लेट खाई. सीतेला घरी उपवास. आठवडयाला आरंभी दोन, तीन दिवस घरात धान्य असे. पुढे तो ते नेई.

तिला दिवस गेले होते. आता तिला रजा होती. परंतु इतक्यात रजेवर कशाला आलीस?’ तो म्हणे नि अंगावर धावे. ती गिरणीत जाऊन म्हणे, येऊ द्या मला कामावर! तेथील अधिकारी म्हणे, कायद्याप्रमाणे ठेवता येत नाही. हाल, अपमान, उपासमार, पोटात बाळ वाढणार कसा? ती रडे. बाळंतपणाला तिला मुलखात कोण पोचवणार? माहेरी कागद कोण लिहिणार?

एका इस्पितळात ती बाळंत झाली. तिला मुलगा झाला होता. परंतु बाळाला पाहून तिच्या पतीला आनंद वाटला नाही. कोण वाटणार पेढे? कोण करणार बाळाचे कौतुक? दहा दिवस झाले.  ती घरी आली.

मी हा मुलगा अनाथालयात नेऊन देतो. कशाला घरी ब्याद? त्याच्यासाठी पैसे कोठून आणायचे? माझ्या दारूच्या आड हे कारटे येईल. मी त्याला नेऊन देतो. घ्या, नाहीतर फेकून देईन असे सांगतो. ती संस्था घेईल तो म्हणाला.

काय बोलता तुम्ही? हे बाळ नेणार? सोन्यासारखे बाळ!  मग मी कोणाला पाजू, कोणाला पाहू? बाळाला नेणार असाल तर माझे प्राणही घ्या.

तुझे प्राण घेतल्यावर दारूला पैसे कोठले? पोराची कटकट गेली म्हणजे तू कामाला लौकर जाशील. मला पैसे होतील आणि त्या पोराला गुंडाळून. चल आण लक्कन त्याने पोर उचलले तिने आकांत मांडला. गप्प बस. ओराडायचे नाही. वरवंटा घालीन टाळक्यात. गप्प. तुझा पोर काही मरत नाही. जगात वाढेल. घरीच मरायचा, आजारी पडायचा. त्या संस्थेत वाढेल.

मुलाला घेऊन तो गेला. पहाटेची वेळ. माटुंग्याच्या बाजूला तो गेला. तेथे संस्थेच्या दारात गुपचूप मूल ठेवून तो गेला. देवाचे वारे बाळाला अंगाई गीत म्हणत होते. भूमातेच्या मांडीवर बाळ झोपले होते. अनाथालयाच्या चालकांनी सकाळी ते बाळ नेले.  बाळ चिमण्या डोळयांनी बघत होते. ते रडू लगले. कोण घेणार, पाजणार? परंतु संस्थेने काळजी घेतली. ते बाळ सर्वांचे प्रिय झाले, ते फार रडत नसे. जणू शहाणे होते. ती तरुण माता करूण दशेत होती. तिच्या मातृहृदयाच्या चिंधडया उडाल्या. तिला अन्न गोड लागेना. बाळाची आठवण येऊन पान्हा फुटे. ती झुरणीला लागली.

 

सीताचा नवरा गिरणीत होता. तीही गिरणीत काम करी. चिंचपोकळीजवळच्या एका जुनाट चाळीतील एका अंधा-या खोलीत त्यांचा चिमुकला संसार. प्रथम ती कोकणातून मोठया हौसेने आली. गावचे लोक म्हणाले, सीता, नव-याच्या रोजगारा वर चाललीस. जपून राहा मुंबईस. आता ये बाळंतपणाला. बाळंतपणाला मुलखातच यावे. सीता लाजली. ती मुंबईला आली.  कधी मुंबई तिने पाहिली नव्हती. इकडे तिकडे बघे. मुंबई पाहून तिला आश्चर्य वाटले. मुबंई कोकणचे मायपोट. प्रत्येक घरची दोनचार माणसे मुंबईला आहेत. मुबंई म्हणे कोणाची? मुबंई श्रमणा-यांची.

रामाचे सीतेवर खूप प्रेम होते. तो तिला सिनेमाला नेई. त्याने तिला राणीची बाग दाखविली, भुलेश्वर, मुंबादेवी दाखविली, बाबुलनाथ, महालक्ष्मी, हँगिंग गार्डन, सारे दाखविले. सुटटी्च्या दिवशी एकदा दोघे चौपाटीवर गेली. दोघे शिंपा गोळा करीत होती. कोणी मुले वाळूत किल्ले रचीत होती. सीता किल्ला करू लागली. रामा मदत करू लागला. असे दिवस जात होते. त्यांची ती लहानशी अंधारी खोली. तेथे प्रेमाचा प्रकाश होता.

परंतु रामाला आता निराळया लोकांची संगत लागली. तो जुगार खेळू लागला. पैसे जाऊ लागले. तुम्ही जुगार नका खेळू ती म्हणाली. मोठे मोठे खेळतात. त्यात पाप नाही. पैसे मिळतील. मुलखात कौलारू घर बांधू. तेथे राम-सीतेचा जोडा राहील. मग हसशील, खेळशील तो म्हणाला.

घर बांधतो की वनवास भोगतो, कोणाला माहीत? पगार तर पुरत नाही.

वेडी. अग, पेरल्याशिवाय उगवत नाही. पेरलेला दाणा फुकट गेला असे का म्हणशील? आधी मनुष्य गमावतो. अनुभवाने शहाणा होतो. मग गेलेले परत मिळते. तुला सोन्याने मढवीन. तुझी मुलं साहेबांच्या मुलांप्रमाणं राहतील.

आपली मीठभाकर बरी. साहेबाची ऐट आपल्याला कशाला? मुलखातले लोक आपल्यापासून दूर पळतील. तुम्ही माझं ऐका. नको जुगार गप्प बस.

तो उठून निघून गेला. ते तिरस्काराने उच्चारलेले गप्प बस शब्द तिला लागले. तिचे डोळे भरुन आले.

तू गिरणीत कामाला चल उद्यापासून. मी विचारले आहे.

मला येईल का काम?

तेथे शेकडो बाया आहेत. मनापासून काम कर. शंभर

पाऊणशे पगार मिळेल.

आणि तोही जुगारापायी जाईल.

बायकांनी चुरूचुरू बोलू नये.

सीता आज गिरणीत गेली. मुलखातल्या मोकळया हवेतून आलेली ती मुलगी. चिमुकल्या अंधा-या खोलीतही आनंदाने राहणारी ती आज गिरणीत गेली. जाताना त्याला भाकर दिलंन, स्वत:ची बांधून घेतलंन. इतर बाया कुजबुजू लागल्या. परंतु एकदोघींनी तिला काम शिकविले. सुट्टीत भाकर खायला ती गेली. जवळची चटणी, कांदा तिने जवळच्या बायांनाही दिला. ती अजून उदार होती. मोकळी होती. सायंकाळी ती दमून घरी आली. चूल पेटवून स्वयंपाक करुन ती पतीची वाट पाहत बसली. परंतु त्याचा पत्ता नाही. ती आडवी झाली. तो उशिरा आला. दार ठोठावलं त्यानं. ती उठली. तो शुद्धित नव्हता.  जेवायला चला ती म्हणाली.