बुधवार, आँगस्ट 12, 2020
   
Text Size

*कलिंगडाच्या साली

पुढें मॅट्रिकच्या परीक्षेचा निकाल लागला. जयन्ता पास झाला. त्याला शेकडा ७० मार्क मिळाले. कोणत्याहि कॉलेजांत त्याला शिष्यवृत्ति मिळाली असती. त्यानें कॉलेजांत नांव घातलें. सकाळी कॉलेजांत जाणार होता, दुपारी नोकरी करणार होता. पंधरा वर्षांचा जयन्ता तासन् तास रेशनिंगचें काम करी. तो दमून जाई. शरिराची वाढ होण्याचें ते वय; परंतु त्याच वेळेस आबाळ होत होती. काय करायचें ?

जयन्ता घरी आईलाहि मदत करी. रविवारी घर सारवी. इतर भावंडांचे कपडे धुई, तो क्षणभरहि विश्रांति घेत नसे. घरांत विजेचा दिवा नव्हता, रॉकेल मिळायचे नाहीं. जयन्ता एका मित्राच्या घरीं अभ्यासाला जाई.

कॉलेज सुटल्यावर तो आता घरी येत नसे. तिकडेच राईस प्लेट खाऊन नोकरीवर जाई. परंतु जयन्ता अशक्त होत चालला.

“जयन्ता तुला बरं नाहीं वाटत ?” गंगूने विचारलें.
“बरें वाटतें तर ? तूंच जप. तुला इन्जक्शनें घ्यायला हवींत. त्यासाठी मी पैसे साठवून ठेवले आहेत. तू आमची एकुलती एर बहीण. मी देवाकडे गेलो तरी इतर भाऊ आहेत; परंतु तूं गेलीस तर दुसरी बहीण कुठें आहे ?”

“असें नको बोलूं, तूं शीक. हुषार आहेस. तूं मोठा होशील, खरेंच जयन्ता!”
“मला खूप शिकावें असें वाटतें.”
“शीक हो; परंतु प्रकृतीस जप.”

गंगू आता इंजेक्शने घेऊं लागली. जयन्ताचा शब्द तिला मोडवेना. परंतु जयन्ता मात्र खंगत चालला. “जयन्ता तुला काय होते ?” आईने विचारलें.

“परीक्षा जवळ आली आहे. रात्रीं अभ्यास करतो. म्हणून तुम्हाला मी असा दिसतो. शरीर थकले तरी मनाला खूप उत्साह आहे. परिक्षा संपली कीं तीन महिने मग अभ्यास नाही. प्रकृति सुधारेल. आई; काळजी नको करूं.”

“तो तिकडे तुरुंगांत; तुझी ही अशी दशा.”
“आई सार्‍या देशांतच अशी दशा आहे. त्यांतल्या त्यांत आपण सुखी नाहीं का ?”
“तूं शहाणा आहेस बाळ.”

आईच्या डोळ्यांत पाणी आलें. जयन्ता पुस्तक घेऊन निघून गेला. परीक्षा जवळ आली होती. गंगू, जयन्ता, दोघे त्या दिवशीं फिरायला गेलीं होतीं.

“गंगू, तुला आता बरें वाटतें ?”
“मला तुझी काळजी वाटते.”

 

“जयंता, तूं पास होशीलच; पुढें काय करणार तूं ? तुझा मोठा भाऊ तर चळवळींत गेला. तुझ्या मनांत काय आहे.” वडिलांनीं विचारलें. चळवळीचा भर ओसरला आहे. माझे तिकडे लक्ष नाहीं. मी लहान मुलगा कोठें जाणार ? परंतु मला खूप शिकायची इच्छा आहे.”

“कॉलेजचा खर्च कसा भागवायचा, बाळ ?”

“बाबा, मला नोकरी मिळेल. मला चांगले मार्क्स मिळतील. कॉलेजमध्ये शिष्यवृत्तीहि कदाचित् मिळेल. कॉलेजच्या शिक्षणाचा तुमच्यावर भार पडणार नाहीं.”

“तुझ्या शिक्षणाचा खर्च मला करावा लागणार नाहीं असें धरलें तरी तुझ्याकडून घरसंसार चालवायला मदत थोडीच होणार आहे ? अरे, मी एकटा किती काम करूं ? मी थकून जातों. सरकारी नोकरी. शिवाय सकाळीं खासगी नोकरी; महिनाअखेर दोन्ही टोकं मिळायला तर हवींत ? घरांत तुम्हीं पाचसहा भावंडें. तो मोठा गेला देशसेवेला. बी.ए. होईल, मदत करील, अशी आशा होती. परंतु घरीं न सांगता गेला. जांऊ दे. देशासाठीं कोणी तरी जायला हवेंच. परंतु तुम्हांला कसें पोसूं ? जयन्ता, तूं नोकरी धर. रेशनिंगमध्ये मिळेल; मी बोलून ठेवले आहे.” वडील म्हणाले.

“मी पंधरा वर्षांचा; मला कोण देईल नोकरी ?”

“तेथें वयाची अट नाहीं. मॅट्रिक पास असलास म्हणजे पुरे. अरे कोंवळ्या मुलीहि काम करतात.”

इतक्यांत जयंताची बहीण तेथें आली ती म्हमाली, “बाबा, मी करूं कां नोकरी ? जयन्ताला शिकूं दे. तो हुषार आहे. मला द्या ना कोठें मिळवून.”

“अग, तूं मॅट्रिक नापास; शिवाय तुझी प्रकृति बरी नसते.”
“नोकरी करून सुधारेल. आपला कांहीं उपयोग होत आहे असें मनांत येऊन समाधान वाटेल.”
“असें नको बोलूं. तूं शीक. हुषार आहेस. तूं मोठा होशील, खरेंच जयन्ता!”
“मला खूप शिकावेंसें वाटतें.”
“शीक हो; परंतु प्रकृतीस जप.”

“नको गंगू, तूं नको नोकरी करूं. आम्हा भावांना तूं एक बहीण तूं बरी हो. तुझें वजन वाढूं दे. मी करीन नोकरी. सकाळी कॉलेजात जाईन. हजारों मुलें असे करीत आहेत.”
“परंतु तूं अशक्त; तुला एवढा ताण सहन होईल का ?”
“मनांत असलें म्हणजें सारें होतें.

 

कुSठें राहातोस, कुSठें झोपतोस ?”

“असाच कुठेंतरी राहातों नि झोंपतों. स्टेशन हेंच घर. सकाळी एखाद्या सार्वजनिक नळावर अंघोळ करतों, कपडे वाळवतो. स्टेशनांत बाकावर येऊन पडतों. कधीं राणीच्या बागेंत बसतो. कारण स्टेशनांत तरी कोण निSजूं देतो! अशीं मोठीं माणसे येतात. हजारों रुपयांची त्यांना जागा हवी. या मुलाला रात्रपाळी असेल, झोपायला जागा नसेल, थकून-भागून येथें झोपला असेल, असा विचार कोण करणार, दादा ?”

तो मुलगा कसें बोलत होता म्हणून सांगूं ! साधें सरळ सत्यकथन ! जगावर राग ना रुसवा. स्टेशनांत एक केळेविक्या बसला होता. पटकन् गेलो नि दोन आण्यांची केळी घेऊन आलो.

“घे.” मी त्याला म्हटलें.
“कशाला आणलींत ?”
“दुसरें काय देऊं ?”

तुम्ही त्या दिवसीं ते चार आणे दिलेत, तेच लाखांच्या ठिकाणीं. त्या दिवशी मी गळून गेलो होतो. तुम्ही अन्नदाते भेटलांत. तुम्ही सारें काहीं दिलेंत. सहानुभूति दिलीत. खरें ना ? गरिबाबद्दल कुणाला आहे आस्था ? कोण करतो त्यांच्या सुखदु:खाचा विचार! कधी संपतील हे गरिबांचे हाल ?”

“जेव्हा समाजवाद येईल तेव्हां.”
“कधीं येईल ?”

तुम्ही आणाल तेव्हां. तो का आकाशांतून पडणार आहे ? तुझ्यासारख्या तरुण मुलांनी अभ्यास करायला हवा, संघटनेत सामील व्हायला हवें. कधीं गांवी गेलास तर तेथेहि हे विचार न्यायला हवेत. आपल्यासाठी दुसरा कोण काय करणार ? “तुम्ही मला सोपी सोपी पुस्तके द्याल ?”
“तूं किती शिकलास ?”
“चार बुकें शिकलों. वाचता येतें.”
“जनवाणी वाच, साधना वाच.”
“तुम्ही कुठें भेटत जाल ?”
मी त्याला माझा पत्ता दिला. इतक्यांत गाडी आली.
“मी जातों. तुझें नांव काय ?”
“रामकृष्णा.”
“जातों, रामकृष्ण. सुखी रहा.”
“तुमचा समाजवाद येईल तेव्हां खरा सुखी होईन. कारण मग सर्वांच्या सुखाचा प्रश्न सुटेल.” तो मजकडे पाहून म्हणाला.

   

“उपकार कसले बाळ ? ज्याच्याजवळ आहे त्यानें दुसर्‍याला देणें हा धर्म आहे. सारें विश्व म्हणजे कुटुंब ही भावना व्हयला हवी. तुझ्यासारखी सुंदर उमदी मुलें, त्यांची अशी आबाळ व्हावी याहून अधर्म तो कोणता ? कामाला तयार असणार्‍यास जेथे काम मिळत नाहीं तेथें कोठून सुखसौभाग्य येणार ? ही सारी समाजरचना बदलायला हवी. समाजवाद आणायला हवा.” मी बोलत होतो. “समाजवाद म्हणजे थोतांड । ”ते गृहस्थ म्हणाले. “समाजवाद म्हणजे सद्धर्म, म्हणजेच खरी संस्कृती. बाकी सारा फापट पसारा आहे.” मी म्हटलें. “येतों, दादा.” असें म्हणून तो तरुण गेला.

दोनतीन महिने गेले. दुपारची वेळ होती. मी चिंचपोकळी स्टेशनांत गेलों. एका बाकावर एक तरुण निजला होता. तोच फाटका सदरा अंगात. तेंच करुण मुखमंडल. मी त्या मुलाला ओळखले. मी त्याच्या जवळ बसलों, त्याला थोपटावें असें वाटलें. हा जेवला असेल का, असा मनांत विचार आला. आणि जेवला नसेल तर ? मी माझ्या खिशांत हात घातला. फक्त दोन आणे खिशांत होते. मला वाईट वाटत होतें.

इतक्यांत एक जाडजूड गृहस्थ आले. तलम धोतर ते नेसले होते.

अंगात स्वच्छ लांब कोट-गळपट्टीचा कोट. डोक्यावर एक श्रीमंती टोपी. हातांत सिगारेट. बोटातून अंगठ्या झळकत होत्या. पायातील बूट नुकतेच पॉलिश केलेले चकाकत होते. गृहस्थ बाकाजवळ आले. त्यांच्या ऐसपैस देहाला बसायला बाकावर जागा नव्हती. कडेला त्यांना बूड टेकता आले असते. परंतु त्यांच्या प्रतिष्ठेचा तो अपमान झाला असता.

“ऊठ. ए सोनेवाला, ऊठ जाव. ही का झोपायची वेळ आहे का ? खुशाल झोपला आहे. ऊठकर बैठो.” तो रुबाबदार मनुष्य गर्जला.

“निजूं दे त्याला, तुम्ही येथे बसा.” मी म्हटलें.

“अहो, ही का झोपायची वेळ ? रात्रीं चोर्‍या करतात नि दिवसा झोंपा काढतात. ही बाकें जणुं यांच्या बापाची इस्टेट!” ते गृहस्थ बसल्या बसल्या बडबडत होते.

तो मुलगा उठून बसला. त्यानें माझ्याकडे पाहिलें. तो उभा राहिला.
“दादा , बसा तुम्ही.” तो प्रेमानें म्हणाला.
“मी त्याच्याजवळ बसलो. त्याचे डोळे भरून आले होते.
“आज कांहीं खाल्लें आहेस का ?” मीं विचारलें!

“होय, दादा. मला एका गिरणीत काम मिळालें आहे. रात्रीं जातो कामाला. हळुहळू येथें शिकेन. सध्या  थोडेंफार मिळतें. घरीही दहा रुपये पाठविलें. ज्या दिवशीं मनिऑर्डर पाठवली, त्या दिवशीं मला किती आनंद झाला होता म्हणून सांगूं!”

 

सायंकाळची वेळ होती. महालक्ष्मी स्टेशनांत मी होतों. गाड्या भरून येत होत्या. जागा मिळेना घुसायला. दार धरून उभें राहायला मला धैर्य होत नव्हतें. जेव्हां मोकळी जागा मिळेल तेव्हांच गाडींत बसेन असें ठरवून मी एका बांकावर बसलों होतो. इतक्यांत पंधरासोळा वर्षांचा एक तरुण मुलगा माझ्याकडे आला. त्याच्या अंगावर चिंध्या होत्या. त्याची ती उंच देहयष्टी कृश दिसत होती. त्याच्या डोळ्यांत करुणा होती. त्याचे ते ओठ थरथरत होते. मी त्याच्याकडे बघत राहिलो. तो माझ्याकडे बघत होता. आम्ही एकमेकांच्या हृदयाला जणुं भेटू पहात होतों. तो माझ्या डोळ्यांत सहानुभूति शोधीत होता. मी त्याच्या डोळ्यांत प्रामाणिकता शोधीत होतो.

“दादा...” त्यानें शब्द उच्चारला.
“काय पाहिजे तुला ? का डोळ्यांत अश्रू ?”
“मी बेकार आहें. मुंबईत पोटाला मिळावें म्हणून मी आलों. चार दिवस झाले. मी उपाशी आहे. चार आणे द्या. थोडें खाईन.”
“तूं कुठला, कोण ?”
“मी दूरचा आहें. धामणी माझें गांव. घरी आईबाप आहेत. लहान भावंडे आहेत. परंतु खायला नाही. ना धंदा, ना मालकीची जमीन. नेहमीं मुंबईला जा’ पोटाला मिळव. उरलें तर घरीं आम्हांला पाठव. असें बाप म्हणायचा. अखेर गांव सोडलें नि मी येथें आलो. येथे ना ओळख ना देख. भटकत असतो.”
त्याला बोलवेना. मीं चार आणे काढून त्याला दिले.

“अहो, फसवतात हे लोक” शेजारी उभा असलेला एक गृहस्थ म्हणाला.

“फसवूं द्यात मोठेमोठे कारखानदार फसवीत आहेत. व्यापारी फसवीत आहेत. बडीं बडीं माणसें फसवीत आहेत. या मुलानें चार आण्यासाठीं फसवलें तर फसवलें.” मी म्हटलें.

“अहो, दान सत्पात्रीं करावें, शास्त्र सांगतें.” ते गृहस्थ धर्म सांगू लागले. त्या मुलाचे डोळे त्या गृहस्थाला उत्तर देत होते. मला खलिल जिब्रानचे शब्द आठवले. ईश्वरानें आयुष्याची थोर देणगी द्यायला ज्याला पात्र ठरविलें तो तुझ्या दोन दिडक्या घ्यायला पात्र नाहीं का ?  या जगांत ज्याचा उपयोग नसेल, त्याला ती विश्वशक्ति येथें राखील तरी कशाला ?

“तुमचे उपकार.” तो मुलगा म्हणाला.

   

पुढे जाण्यासाठी .......