शनिवार, फ़ेब्रुवारी 29, 2020
   
Text Size

सोन्यामारुति

''भाऊ! मोठ्या भाऊ! तुला वाचण्याची जरूरी नाही. जे येथे सांगितलेंस तें सर्वत्र सांग. हीं सोन्यामारुतींची मंदिरे सर्वाना दाखव. एका प्रखरमय भावनेनें मनुष्य एका क्षणांत सारे शिकतो, जें भावनाहीनास तपेंच्या तपें अध्ययन करुन पूर्णपणें समजत नाही! जा! भाऊ जा! महाराष्ट्रभर जा! तुझा आमचा झेंडा एक. तूं आमच्या झेंड्याच्या खाली आलास. आम्हांला किती आनंद होईल! किती उत्साह चढेल आतां! आम्हीही नाचूं, कूंदूं, गांवोगाव जाऊं. पेटवूं खेडीपाडी. पेटवू महाराष्ट्र पेटवूं विशाल भारत! पेटणार्‍या जगात पेट घेणारा भारतहि शोभूं दे! कोट्यावधि सोन्यामारुति जागे होऊं देत. या प्रंचड घंटा घणणणणण वाजूं देत. चला, आपण या घंटा वाजवू! अनंत सोन्यामारुतींच्या मंदिरांतील प्रचंड घंटा.'' भाऊ भराभरा भावना शब्दांत ओतीत होता.

तेथें तो लाल झेंडा होता. धाकट्या भावानें तो हातांत धरला, मोठा भाऊ तेथें उभा राहिला. सारी मुलें उभीं राहिली. ''खर्‍या सोन्यामारुतीचा जयजयकार असो! अनंत सोन्यामारुतींचा जयजयकार असो !'' असे जयध्वनि झाले व त्या नदीतीरावर, त्या ओंकारेश्वराच्या भोंवतीं, त्या स्मशानांत, त्या रस्त्यांत, त्या गल्लीत, सर्वत्र ते दुमदुमु लागले. जयध्वनीचे प्रतिध्वनि आपटत आपटत सार्‍या महाराष्ट्रभर गेले, हिदुंस्थानभर गेले, सर्वत्र गेले.

 

''माझा असल्या गोष्टींवर विश्वास नाहीं. तरीहि आपण भाऊच आहोंत. आपण सारे भाई भाई आहोंत. आमच्या झेंड्याखालचे लोक एकमेकांस भाई वसंता दिवसभर भटकत होता. भाऊ भेटल्यामुळे त्यांचे पोट भरून आलें होते. त्याला आनंद होत होता. टेंकडीवर जाऊन तो कुदला. झाडावर वानराप्रमाणे तो खेळत राहिला. त्याला कशाचेंहि भान नव्हतें. त्याला ऊन लागत नव्हते. त्यांचे पाय भाजत नव्हते. वीस वर्षांनी भाऊ भेटला या आनंदात तो होता.

सायंकाळ झाली. फर्ग्युसन कॉलेजच्या टेकडीवर तों बसला होता. एकटाच बसला होता. आपल्याला रात्रीं जावयाचें आहे . मारुतीसमोर बोलायाचें आहे . त्याला एकदम आठवण झाली. विचाराने मी भाऊ नाही ठरलों तर ? चिन्मय नातें बौध्दिक नाते नाही जडलें तर ? जगांत केवळ का बुध्दि सत्य आहे ? या हृदयाच्या हांका, या हृदयाच्या  भुका, ह्या का असत्य, मिथ्या ? मनुष्याच्या डोक्यालाच तेंवढें महत्त्व आणि हृदयाला नाहीं का ? परंतु शुध्द बुध्दि व शुध्द हृदय यांत भेद उत्पन्न होणारच नाही. शुध्द भावना व शुध्द विचार हीं अविरोधच असणार, एकरुपच असणार! कापराला पाठपोट का आहे ? जेथे खरी सत्यता आहे, तेंथे अंतर्बाह्य नातीं एकरुप असणार, हो असणार !

वसंता निघाला. उशीर होऊं नये म्हणून निघाला. पळत निघाला. वार्‍या प्रमाणें तो निघाला. आला ओंकारेश्वराजवळ. मारुतीच्या भोंवतीं लहान लहान सोंन्यामारुति बसले होते. त्यांच्यांत तो तेजस्वी भाऊ उभा होता. वसंतानें त्याच्याकडे पाहीले. वसंताच्या स्फूर्तीला पल्लव फुटले, हृदयाला पाझर फुटले. वसंता बोलावयास उभा राहीला. तो हृदय ओतीत होता, का बुध्दि ओतीत होता ? हृदयाच्या रसांत रंगवून बुध्दि ओतीत होता, व बुध्दित बुडवून हृदय ओतीत होता. ती मुलें तन्मय झाली होती. पिंपळाचीं सदैव नाचणारीं हालणारीं चंचल पाने, तींही स्थिर राहून ऐकत होती.

वेळ किती झाला कोणाला कळेना. सारे दिक्कालातीत वातावरणांत होते. केवळ अनंताच्या वातावरणांत सारे होते. अनंत भावना व अनंत विचार! अनंत सोन्यामारुतींची दर्शने! वसंता विचारांच्या व भावनांच्या कुंचल्यांनीं भराभरा जळजळीत चित्रे दाखवीत होता. मुलें कधीं डोळे मिठीत, डोळे वटारीत. कधीं त्यांच्या मुठी वळत, कधीं अश्रु गळत.

थांबला. वसंता थांबला. भाऊ धावत येऊन वसंताला मिठी मारता झाला. ''आपण दोघे भाऊ. पूर्वींचे एका आईच्या पोटचे भाऊ व आतांचे विचारानें भाऊ.'' तो म्हणाला.

''पण मी वैचारिक भाऊ शोभेन का ? मीं वाचलें नाही, अभ्यासिलें नाही. माझ्याजवळ हृदय आहे, बुध्दि नाही. वाचण्याचा मला उत्साह नाही. वैचारिक प्रक्रिया, नवीन नवीन दर्शनें अभ्यासण्याला मजजवळ जिज्ञासा नाही. भाऊ! तुझा हात मी हातांत घेऊ का ?'' वसंताने विचारलें.

 

पहाटेची कोकिळा ओरडली, ''होय. आहे तुझ्यांत श्रध्दा.'' कोकिळा सांगत आहे असें त्याला वाटलें. वसंता तेथें घाटावर बसला. आकाशगंगेंत स्नानें करून निवालेल्या सप्तर्षीकडे तो पहात होता. ध्रुवाला प्रदक्षिणा घालणारे सप्तर्षि! लहान बाळ ध्रुव! परंतु सत्याचा, तपस्येचा, निश्चयाचा तो महामेरु होता. महर्षि त्याच्याभोंवतीं प्रदक्षिणा घालूं लागले. नवीन तरुण जर नवध्येयानें पेटतील, निश्चयानें नटतील, त्यागाने शोभतील, अविरत अखंड श्रध्देनें झिजतील तर सारे लोक, म्हातारे म्हातारे पुढारीहि-त्यांच्याभोंवतीं प्रदक्षिणा चालूं लागतील. बाळ ध्रुवाचा विजय असो! युवकाचा विजय असो !

वसंता पहात राहिला. त्याच्या शेजारी येऊन कोण उभें राहिलें आहे ? वसंताचें लक्ष नव्हतें. आकाशांतील ध्रुवाकडे त्याचें लक्ष होतें. परंतु एकदम त्यानें वळून पाहिलें. दोघे एकमेकांकडे पाहात राहिले.

वसंतानें हांक मारली ''भाऊ !''

भाऊ म्हणाला ''काय ?''

''काय ? तूं खरेंच माझा भाऊ आहेस ?'' वसंताने विचारलें.

''होय. मी भाऊ आहें'' -तो म्हणाला.

''एकोणीसशें सतरांतील तुझा जन्म -'' वसंतानें विचारलें.

''हो. ''- तो आश्चर्यानें म्हणाला.

वसंता या तरुणाकडे सारखा टक लावून पाहूं लागलां. शेवटीं तो एकदम उठला व त्यानें त्या तरुणाला मिठी मारली व ''भाऊ भाऊ! वीस वर्षांनीं माझा भाऊ पुन्हा भेटला'' असें तो वेंडयासारखें बोलूं लागला. तो तरुण बुचकळ्यांत पडला.

''असें काय करतां ?'' त्यानें विचारलें.

''तूं माझा भाऊ. १९१६ च्या सप्टेंबर महिन्यांत माझा भाऊ पुण्यास प्लेंगने मेला. त्याला लहानपणापासून मीं वाढवलें होतें. आई आजारी असे. मीं त्याच्यावर अपार प्रेम केलें. तो येथें पुण्यास मामांकडे आला होता. प्लेगनें त्याचा बळी घेतला. त्याच्या मरणाची वार्ता कळल्यावर दोन दिवस मी भ्रमिष्ट झालों होतों. मरतांना तो माझी आठवण करून मेला. तूंच तो. तो माझा भाऊ म्हणजेच तूं. तुझ्यासारखाच तो दिसे. तो तुझ्यासारखाच तेजस्वी व तरतरीत दिसे. असेच डोळे, सारें असेंच. तूं माझा तो भाऊ आहेस. संशयच, नाहीं. एकदम माझ्या हृदयांत एवढें प्रेम एकाएकीं कां उसळलें असतें ? ये, आपण पुन्हां भेटूं. वीस वर्षांचें भेटून घेऊं.'' वसंतानें त्याला पुन्हां घट्ट मिठी मारली. बारा वर्षांनीं रामहि भरताला इतक्या प्रेमानें भेटला नसेल !

   

अशा या सोन्यामारुतींच्या समोर कोण येत आहे ? या जिवंत देवदेवतांची कोण पूजा करील ? या देवांजवळ दिवा नाहीं, या देवांच्या अंगावर वस्त्र नाहीं, या देवांना नैवेद्य नाहीं, या देवांभोंवतीं सारे उकिरडे आहेत, घाण आहे-असें जगाला जळजळींतपणें सांगण्यासाठीं कोण भेरी वाजवणार, कोण नगारे वाजवणार, कोण दुंदुभि घुमघुमवणार, कोण कर्णे वाजवील, कोण शंख फुंकील, कोण शिंगे त्राहाटील ? ह्या घंटा वाजवायला या. ह्या घंटा वाजवायला विरोध होईल. सरकार, सावकार, सनातनी-सारे एक होऊन या खर्‍या खुर्‍या  सोन्यामारुतीच्या पूजेसाठीं जर कोणी घंटा वाजवून जगाला बोलावूं पाहील तर विरोध करतील. परंतु हे सारे विरोध अगस्ति ऋषींप्रमाणे तुम्हीं गिळून उरलें पाहिजे. अपमान, कष्ट, आपत्ति यांचे खारट कडूकडू समुद्रच्या समुद्र हंसत हंसत प्यायला तुम्हीं तयार झालें पाहिजे. वसंता! असेल नसेल तेवढी शक्ति एकवटून गर्जना करून लोकांना सांग ''बंधूंनो! इकडे या. सोन्यामारुति तिकडे लक्ष्मीरोंडवर नाहीं. तांबोळी मशिदीजवळ नाहीं. सोन्यामारुतीची मंदिरें गल्लींगल्लींत, रस्तोरस्ती, गांवोगांवी, शहरोशहरीं--जगभर आहेत, हे सोन्यामारुति तुमची वाट पाहात आहेत या. लौकर या. ह्या सोन्यामारुतींची अन्न, वस्त्र, ज्ञान वगैरे षोडशोपचारांनी पूजा करण्यासाठी या सारे धावत. जर न याल तर सोन्यामारुति एक दिवस संतापेल, प्रचंड हांक फोडील व सर्वांचें भस्म केल्याशिवाय राहणार नाहीं. सर्वांचें लंकादहन केल्याशिवाय राहणार नाहीं.'' वसंता! मी जातों. निर्मळ दृष्टि घे, निर्भय व नि:शंक वृत्ति घे, व ह्या अनन्त सोन्यामरुतींच्या सेवेसाठीं लाल झेंडा हातांत घेऊन आपल्या सर्व असेल नसेल त्या अंतर्बाह्य शक्तीनें सिध्द हो.

वसंता : वेदपुरुषा! तुझे अपार उपकार.

काय वानूं या मी संतांचे उपकार !
मज निरंतर जागवीती !


दुसरें मी काय म्हणूं ? प्राण देऊनहि तुझें ऋण फिटणार नाहीं. जन्मोजन्मीं हे प्राण तूं दाखवलेल्या ध्येयासाठीं अर्पंण करीत जाईन.

वेदपुरुष : अडीच हजार वर्षांपूर्वी जगताला ललामभूत झालेले भगवान् बुध्द म्हणाले ''एकाहि जीवाचे थोडे दु:ख दूर करतां येत असेल तर मी पांचशें वेळांहि जन्म घेईन, हरणार नाहीं, हटणार नाहीं, निराश होणार नाहीं.'' ते शब्द कधीं विसरूं नको व वाग. जातों. संघटना कर, सहकार्य कर, भ्रातृसंघ वाढव. आशेनें रहां. देव तुझें कल्याण करो !

वेदपुरुष गेला अदृश्य झाला. त्याचे शेवटचे थोर शब्द वातावरणांत घुमत होते. वसंता कोठें होता ? तो आजूबाजूला पाहूं लागला. त्याला समोर नदी दिसली. तिच्या तीरावर प्रेतें जळत होतीं. तो का स्मशानभूमींत होता ? वसंता घाबरला. परंतु पुन्हा निर्भयता आली. स्मशानांत तर शिवशंकर राहतो. शिवशंकर हा योगियांचा राणा! ज्ञान्यांचा मुकुटमणि म्हणजे शिव! मृत्युंजय शिव! मृत्यूच्या घरांत राहून तो मृत्युंजय आहे. वेदपुरुष येथेच अदृश्य झाला. तें शिवाचें का रूप होतें ? शिवस्वरूपी व सहस्त्ररूपी भगवंताचें का तें रूप होतें ?

वसंतानें वर पाहिलें. तिकडे घाट होता. घाटावर देवालय होतें. प्रचंड पाषाणमय मंदिर! अरे हा तर ओंकारेश्वर! हें पुणें कीं काय ? लोकमान्यांचें पुणें! सोन्यामारुतीच्या सत्याग्रहाचें पुणें !

परंतु कोठे आहे खरा सोन्यामारुति ? हा येथील सोन्यामारुति म्हणजे प्रतीक आहे. वेदपुरुषानें दाखवलेल्या कोट्यवधि सोन्यामारुतींच्या मंदिरांपुढें कोण येईल ? कोण तेथें डंका वाजवील ? मला मिळालेला संदेश मी देऊं शकेन का ? आहे का माझ्यांत शक्ति, आहे का तेज, आहे का निर्भयता, आहे का श्रध्दा, आहे का वीर्य, शौर्य, धैर्य ? वसंता मनांत म्हणूं लागला.

 

वसंता : अडाणी जातींत स्त्रियांचे जास्तच हाल होत असतील नाहीं ?

वेदपुरुष : सुसंस्कृतहि कांही कमी नाहींत. चांगले शिकले सवरलेले लोकहि पत्नीवर बडगा उगारतात. विलायतेंत जाऊन स्त्रीदाक्षिण्य शिकून आलेलेहि स्वत:च्या पत्नीस मारतात! पशू बेटे !

वसंता : कां बरें हे मारतात ? अपराधासाठीं मारतात का ?

वेदपुरुष
: लहर म्हणून मारतात आणि कांहीं लोक कामुकतेची तृप्ति होण्यासाठीं म्हणूनहि मारतात. ''नका ना मारूं, खरेंच नका हो! असें काय करतां ?'' असे पत्नीचे ते करुण उद्गार. ते तिचे हावभाव-तें सारें पाहण्यांत, अनुभविण्यांत, पतीची एक विशिष्ट कामुकता तृप्त होत असते. याला लाथाळें प्रेम किंवा गर्दभी प्रेम अशी संज्ञा आहे. असे हे पशू पत्नीला मारतां मारतां मग एकदम तिला मुक्यांनीं गुदमरवून टाकतात !

वसंता : समाजांतील ही विराट् घाण कशी जावयाची ? हें सारें जगत् कसें सुधारावयाचें ?

वेदपुरुष
: या गोष्टी चुटकीसरशा होणार नाहींत. परंतु प्रखरतेनें ही सारीं दु:खे, हा सारा चावटपणा, हा सारा छळवाद, ही पिळवणूक गाडून टाकण्यास तुम्हीं तडफडून उठलें पाहिजे. जळणारे आगीचे लोळ व्हावं सारें खळमळ जाळून टाका. उठा सारे, उठा सारे तरूण. ज्याला ज्याला हृदय व बुध्दि म्हणून कांही असेल त्यानें त्यानें उठलें पाहिजे आणि भांडलें पाहिजे. पिळले जाणारे शेतकरी, भरडले जाणारे मजूर, मारले जाणारे हरिजन यांना कोण मुक्त करणार ? स्त्रियांचे अपार अश्रु कोण पुसणार ? मुलांची मारलीं जाणारीं मनें कोण वाचंविणार ? नरकासारखे तुरुंग कोण सुधारणार ? रूढि कोण पुरणार ? भंगी, झाडू, सारे श्रमजीवी वर्ग यांची हायहाय कोण दूर करणार ? कोण त्यांना पुरेसं चांगलें खायला देणार, रहायला स्वच्छ घर देणार, अंगावर घालायला नीट कपडा देणार, थंडींत पांघरूण देणार, उन्हांत पायतण देणार, पावसांत घोंगडी-छत्री देणार ? कोण त्यांना ज्ञान देणार, विचार देणार, करमणूक देणार, कला देणार ? छापखाने, हॉटेलें, खानावळी-एक का दोन? जेथें जेथें मजूर आहेत तेथें तेथें दु:खें आहेत. अपार विपत्ति व अनन्त अन्याय आहेत, सर्वत्र उपासमार व बेकारी, अन्याय व अपमान! येऊं दे, त्याची चीड येऊं दे! आपण माणसें असून आपल्या कोट्यवधिं भावांबहिणींस आपण कीड-मुंगीप्रमाणें चिरडीत आहोंत याची शरम वाटूं दे, खंत वाटूं दे. हिदुस्थानांत कोट्यवधि लहान लहान जीर्णशीर्ण शेणामातीच्या झोंपड्या आहेत. तेथे हवा नाहीं, प्रकाश नाहीं, ज्ञान नाहीं, अन्न नाहीं, वस्त्र नाहीं. दहा दहा वीस वीस जीव वीतभर जागेंत कबुतरांसारखे नांदत आहेत. खेड्यांतून गांवठाणाच्या बाहेर सरकार घरें बांधूं देत नाहीं. त्यामुळें वेगळे होणारे भाऊबंद खरोखरच बिळांत उंदीर राहतात त्याप्रमाणें तेवढ्याच त्या परंपरेनें आलेल्या घरांत नांदतात! अन्याय! सर्वत्र अन्याय! वसंता! या ज्या अशा निरानंद, निर्जीव, निरुत्साह, नि:प्रकाश झोंपडया-यांतून कोट्यवधि देवाचीं लेकरें राहात आहेत. हीं खरीं सोन्यामारुतीचीं मंगल मंदिरें! हे पडलेले लाखों जीव, यांच्यात मारुतीप्रमाणें बुध्दिमान होण्याची, आकाशांतील सूर्याला बचकेंत धरण्यासाठीं उवण मारण्याची शक्ति आहे. हे पडलेले जीव दशमुखी शतमुखी रावणांना भारी होतींल. त्यांचीं साम्राज्यें मोडून तोडून फेंकून देतील. ही तुम्हांला माकडें वाटत आहेत. परंतु या माकडांतून जगद्वंद्य सोन्यामारुति निर्माण होण्याची सुप्त शक्ति आहे. त्यांच्यावरचीं दडपणें काढा, त्यांच्या विकासांतील अडथळे दूर करा. हे पडलेले जीव परब्रह्माप्रमाणें शोभूं लागतील.

   

पुढे जाण्यासाठी .......