गुरुवार, ऑक्टोबंर 01, 2020
   
Text Size

लिलीची भेट

'हो. कारण तुम्हाला निजायला पलंग दिला, गादी दिली. तुमची राजाप्रमाणे व्यवस्था ठेवली.'

'तुम्हाला एक विचारू का?'

'विचारा ना.'

'ही लिली तुमची मुलगी नाही. तिचे आईबाप नाहीत. तिला मी नेऊ का? तुम्हालाही ती जड आहे.'

'तुम्ही नेणार असाल तर न्या. परंतु तिच्या बाबतीत आमचे आजपर्यंत जे पैसे खर्च झाले ते तुम्ही दिले पाहिजेत.'

'काही वर्षं तिची आई पाठवीत होती ना पैसे? आणि ती मुलगीही घरी काम करते.'

'अहो, काम तर आता कुठं थोडं थोडं करते; परंतु सांडते, हरवते. तिची आई पैसे पाठवी, परंतु काही वर्षांत एक पैही आली नाही. म्हणतात, ती मेली म्हणून.'

'बरं. जो काय हिशेब होईल तो सांगा. पैसे मी देऊन टाकतो.'

'मी हिशेब आणून देतो.'

'लिलीला जरा वर पाठवा.'

'पाठवतो.'

मालक खाली गेला. त्याने लिलीला वर पाठवले.

'लिल्ये, येतेस ना माझ्याबरोबर? त्यांची परवानगी आहे.'

'हो येत्ये.'

'हा झगा बघ तुला होतो का? का हा परकर नेसतेस?'

'मला झगा आवडतो.'

'घालून बघ बरं.'

लिलीने तो सुंदर रेशमी झगा घेतला. नंतर तिने तो अंगात घातला. अगदी बेताचा झाला.

'आजोबा, बघा छान झाला.'

'मी का आजोबा?'

'मग काय म्हणू?'


'आजोबाच म्हण.'

 

पुढे जाण्यासाठी .......