असें बोलत आम्ही चाललो होतो. आणि लहान लहान झोंपड्या दिसू लागल्याय एका झोंपडीजवळ आम्ही आलो. झोंपडीचे दोन भाग होते. एका भागांत बकर्या बांधलेल्या होत्या. दुसर्या भागांत माणसे राहत. एकीकडे बकर्यांची पोरें, दुसरीकडे आदिवासींचीं मुलें. निजायला शिंदीची चटई कपडे फारसे दिसले नाहींत. मातींची मडकी हीच इस्टेट. एक तरुण तेथें तापानें आजारी होता. मीं त्याच्या अंगाला हात लावला. ताप पुष्कळ असावा. ना पांघरूण ना औषध. ना फळ ना दूध. त्या झोंपडींत निराशा, दारिद्र्य, दैन्य यांचेच राज्य होते.
तेथें एक म्हातारी होती. अस्थिचर्ममय केवळ ती होती. लहानशी चिंधी नेसून होती. तिच्यासमोर एक पाटी होती. पाटींत चिरलेला पाला होता.
“कशाला हा पाला ?” मीं विचारलें.
“हा शिजवतो नि खातो” ती म्हणाली.
“नुसताच पाला ? त्यांत डाळ, तांदूळ, कण्या, कांही तरी मिसळीत असाल.”
“नाही रे दादा. आम्हांला कुठले डाळतांदूळ ? आमची का शेतीवाडी आहे ? थोडी शेती खंडानें करतो. तें भात किती दिवस पुरणार. मजुरी मिळाली तर करावी आणि हा पाला खावा. शेळ्याबकर्या पालाच नाहीं का खात ? आम्ही तशीच, पाला थोडाफार मिळतो हीच देवाची कृपा. उद्या पालही घेऊं नका म्हणून जमीनदार म्हणायचा. मग तर हवा खाऊनच राहावें लागेल.”
त्या म्हातारीचें ते शब्द बंदूकींच्या गोळीप्रमाणें हृदयात घुसत गेले. मी खाली मान घातली. क्षणभर तेथे उभा राहून दुसर्या झोपडीकडे मी निघालो. तेथेंही तसेच दृश्य. तेथें दोन मायबहिणी कसले तरी कंद विळीवर निशीत होत्या. कसले होते ते कंद ? ती रताळी नव्हती, तो बीट नव्हता. ते बटाटे नव्हते, कांदे नव्हते. ती कणगरें नव्हती, ते करांदे नव्हते. कसले होते ते कंद ?
“कसले हे कंद ?” मी विचारले.
“रानांतून आणले.”
“गोड आहेत वाटतें ? बंघू”
त्या कंदाचा एक तुकडा मोडून मी तोंडात टाकला. तो कडूकडू लागला.
“हे कडू कंद तुम्ही खातां ? रताळी, बटाटे कां नाहीं आणीत ?”
मित्र निघून गेला. गंगू खिडकींतून शून्य मनानें कोठेतरी पाहात होती. परंतु काय असेल तें असो. तिचें आजारीपण गेले. तिची पाठ दुखेनाशी झाली. जयन्ता कां तिचें आजारीपण घेऊन गेला ? गंगू आता नोकरी करते. घरी सर्वांना मदत करते.
जयन्ता जाऊन आज वर्ष झालें होतें, गंगूनें एक सुरेखशीं आंगठी आणली होती.
‘आई, तुझ्या बोटांत घालूं दे.’
‘मला कशाला आंगठी ? तुम्ही मुलें सुखी असा म्हणजे झालें.
‘आई, जयन्ताची ही शेवटची इच्छा होती.’
‘त्याची इच्छा होती ? त्याची इच्छा कशी मोडूं ?’ मातेनें बोटांत आंगठी घातली. डोळ्यांतून पाणी आलें. मातेनें मुलाचें श्राद्ध केलें.
कांही वर्षांपूर्वीचा तो अनुभव. चारपांच वर्षे त्या गोष्टीला झाली. मी बोर्डीला गेलो होतो. तेथील सुंदर समुद्रशोभा रोज बघत होतो.
“तुम्हीं जवळचीं आदिवासींचीं गांवे बघायला याल ? चला, नाही म्हणूं नका.” एक मित्र म्हणाले.
“जाऊं.” मीं म्हटले.
आणि आम्हीं दोघे गेलो. पावसाळा नुकताच संपला होता. आजूबाजूला हिरवीं पिवळीं शेते. मधूनमधून नाले होते. बांधाबांधानें जात होतों. एका बाजूला गवताळ भाग दिसला.
“हें कां कुरण आहे ?” मीं विचारलें.
“ही खरें म्हणजें शेतीची जमीन आहे. परंतु गवताला भाव आहे म्हणून मालक गवतच करीत आहे.
पुन्हां गवताला खर्च नाहीं. एक राखोळी ठेवला म्हणजे झालें.” मित्र म्हणाला.
“तिकडे अधिक धान्य पिकवा मोहीम आहे आणि इकडे गवत वाढवलें जात आहे. हे कसें काय ?,”
“अधिकार्यांची मूठ भरली म्हणजे सारे चालते.”
“ही जमीन आदिवासींना का देत नाहीं ?”
“आदिवासींना कां शेती करायला येईल ? उद्यां स्वराज्यांत त्यांना मिलिटरीत पाठवावें.”
“आदिवासी का माणसें नाहींत ? तुमच्या शेतांतून तेच राबतात. तुमच्या वाड्या तेच करतात. त्यांना सारे येईल. मिलिटरींत वेळ आली तर सर्वांनी जायला हवें. देशाच्या रक्षणासाठीं उभे राहायला हवें. आदिवासींनींच कां जांवे ? पारश्यांनीं कां नये जाऊं ? तुम्हीं आम्हीं का नये जाऊं ?