सोमवार, सप्टेंबर 27, 2021
   
Text Size

अभिप्राय

दै नवशक्ती, १५ जुलै २०११

गुरुपौर्णिमा ऑनलाईन !

- सचिन परब
काल गुरुपौर्णिमा देशभर साजरी झाली. कोणी उपवास केला होता. कोणी आपल्या गुरूची पाद्यपूजा केली होती. कुणाच्या अंगातच आलं होतं. कोणी घसघशीत गुरुदक्षिणा पेटीत टाकून वर्षभर पुन्हा पापं करायला मोकळं झालं. कुणी नव्या रीतीनं ग्रीटिंग कार्ड पाठवलंय, तर कुणी फुलांचे बुके. कुणी एसेमेसवर समाधान मानून घेतलं असेल. पण हे करताना कुणालाच माहीत नसेल की महाराष्ट्राची खरी गुरुपौर्णिमा आधीच साजरी झालीय. थिंक महाराष्ट्र या ऑनलाईन व्यासपीठाने साने गुरुजींचं समग्र वाङ्मय इंटरनेटवर आणून नव्या महाराष्ट्राच्या ख-या गुरूलाबावनकशी गुरूदक्षिणा सगळ्यांच्या आधीच सादर केलीय.
http://parabsachin.blogspot.com/2011/07/blog-post_18.html