मंगळवार, मे 26, 2020
   
Text Size

स्वातंत्र्याचा उष:काल

आणि ४२ चा ‘चले जाव’ लढा आला. भारतीय नारींनी बलिदान केले. तो अश्रूंचा नि रक्ताचा इतिहास आहे. चिमूरला कोण विसरेल ? चिमूरहूनही भीषण अत्याचार रामनंद जिल्ह्यात झाले. कोण विसरेल त्या गोष्टी ? स्त्रिया निर्भय झाल्या होत्या. पोलीस झडतीला आले तर “बघ मेल्या घरात आहे का ?” म्हणत. शेकडो स्त्रिया तुरुंगात होत्या. लहान मुली मिरवणुका काढीत. मामलेदाराने अडवले तर म्हणत, “चले जाव. तुमची सत्ता संपली.” नाशिकला एक गोरा सार्जंट रस्त्यावरुन जाऊ देत नव्हता. एक माळीण आली व “जा रे टोपडया” म्हणत निघून गेली. सार्जंट बघतच राहिला. आणि समाजवादी पक्षाच्या सरकारने सोडले. परंतु देवाघरी गेल्या. श्रद्धानंदांच्या त्या कन्या. त्यांचा त्याग, ज्वलंत वाणी, कोणी विसरेल ? असा हा देशभराचा इतिहास.

आणि तिकडे नेताजींच्या आझाद हिंद फौजेत मुली दाखल झाल्या. बंदुका घेऊन हिंडू लागल्या. कॅप्टन लक्ष्मीचे नाव कोणाला माहीत नाही ? २६ तास बाँब-वर्षाव होत असता त्या जखमी शिपायांची शुश्रूषा करीत राहिल्या. नेताजींनी अद्भुत केले.

आज देश स्वतंत्र आहे. आणि देवी सरोजिनी संयुक्त प्रांताच्या गव्हर्नर झाल्या. विजयालक्ष्मी वकील म्हणून गेल्या. हंसा मेहता जागतिक हक्कांच्या सनदेसाठी विचारविनिमयार्थ गेल्या. मध्य-प्रांतातील श्री. अनसूयाबाई काळे यांनी चिमूरबाबतीत केवढे कार्य केले ! सुचेता कृपलांनी नौखालीच्या आगीत गेल्या नि भगिनींना सोडवित्या झाल्या. मद्रासकडच्या सुब्बालक्ष्मी कोणाला माहीत नाहीत ? कमलाबाई चट्टोपाध्याय तर जगप्रसिद्ध ! कोठवरी नावे लिहायची ? आणि घटनासमितीत चमकणार्‍या चिरसेवक श्रीमती दुर्गाताई जोशी ! राजकीय दृष्ट्याच स्त्रिया पुढे येऊ लागल्या असे नाही, तर सामाजिक सेवेतही पुढे येऊ लागल्या.

 

२० ते ३० साल या काळात ठायी ठायी आश्रम निघाले. आश्रमवासीयांच्या पत्‍नीही त्यांत सामील झाल्या. अनेक भगिनींना सेवेची, साधेपणाची दीक्षा मिळाली. शिक्षणात संस्कृती येऊ लागली, लोकमान्य टिळक म्हणत, “जो दुस-याच्या सुख दुःखाचा विचार करु लागला, तो शिकला.” ते खरे शिक्षण स्त्रियांना मिळू लागले. आणि महात्माजींचा मिठाचा सत्याग्रह आला. भारतीय नारीही सरसावल्या. दारुच्या दुकानांवर, परदेशी मालावर निरोधन करायला त्या उभ्या राहिल्या. मिठाचा कायदा तोडू लागल्या. जंगलचे कायदे तोडू लागल्या. महर्षी कर्वे जगाची यात्रा करुन मुंबईस आले होते. पोलिसांच्या लाठयांना न भिता, स्त्रिया ‘नही रखनी नहीं रखनी, जालिम सरकार नही रखनी’ गाणे म्हणत बेकायदा मीठ करायला जात होत्या. अण्णा म्हणाले, “ते दृश्य पाहून माझ्या डोळ्यांचे पारणे फिटले !” स्त्रियांनी शिकावे असे अण्णांना का वाटे ? केव्हा त्यांच्या डोळ्यांचे पारणे फिटणार होते ? लहान संसार सो़डून त्या मोठया संसारातही पडतील तेव्हा. स्वतःचा संसार राष्ट्राच्या जीवनाशी, मानवजातीच्या जीवनाशी जोडतील तेव्हा. हिंदूस्थानभर स्त्रियांनी ३० नि ३२ साली अपूर्व तेज प्रकटविले. धारासना येथे उन्हात सरोजिनीदेवी सत्याग्रहात बसल्या होत्या. बोरसद येथे गु़डघे रक्तबंबाळ झाले तरी रस्त्यातून स्त्रिया उठल्या नाहीत. मुलींनी लाठीमार सहन करीत प्रभात फेर्‍या काढल्या. अनेक ठिकाणी मुलींनी झेंडे लावले. खेडयापाडयांपर्यंत ही चळवळ गेली. सत्याग्रहींचा सत्कार करण्यात येई. त्यात स्त्रियाही सामील होत. आरत्या ओवाळीत. तिकडे बोर्डोलीच्या लढयाच्या वेळेस सरदार म्हणायचे, “स्त्रियांनाही सभेला आणा. मग मी बोलेन. तुम्हांला पकडून नेले तर त्यांना लढावे लागेल.” देशभर शेकडो स्त्रिया तुरुंगात गेल्या. कलकत्त्याला स्त्रियांना मोटारीतून घालून पोलिसांनी रानात नेऊन सोडले. परंतु त्या भ्यायल्या नाहीत.

फैजपूर काँग्रेसच्या वेळेस महाराष्ट्रातून शेकडो भगिनी सेवादल सैनिक होऊन आल्या. पुण्याला त्या वेळेस त्यांचा उपहास करण्यात आला. खानदेशातील भगिनींनी गावोगाव काँग्रेस प्रचार केला. पायात न घालता प्रचार केला. गीताबाई झेंडावंदनास दहा मैल पायी जात. किती तरी भगिनी देशप्रेमाने पेटल्या होत्या. नवर्‍यांना पसंत पडेना. तेव्हा काडीमोडीही जातीच्या नियमाप्रमाणे झाल्या. परंतु भगिनींनी आत्मस्वातंत्र्य सांभाळले. पुढे काँग्रेसची मंत्रिमंडळे आली. स्त्रियांचे साक्षरतेचे वर्ग सुरु झाले. खानदेशातील खिरोदे गावी पाऊनशे बायका रात्री शिकायला जमत. दिवसा शेतात काम करीत. अमळनेरला एक ७० वर्षांची वृद्ध माता म्हणाली, “मला शिकायचे आहे.” राजेंद्रबाबू महाराष्ट्रात दौर्‍यावर होते. अमळनेर तालुक्यातील नांदेड गावी पुरुषांपेक्षा थोड्या अधिकच स्त्रिया असतील सभेला. शेकडो स्त्रिया. राजेंद्रबाबू म्हणाले, “असे दृश्य शहरांतही मी पाहिले नाही.” स्वातंत्र्याची चळवळ सत्याग्रह, आश्रम, अनेक गोष्टींमुळे. खालच्या थरापर्यंत जागृती गेली. हरिजन भगिनींतही त्यांच्या सत्याग्रहामुळे चैतन्य आले. नाशिकच्या राममंदिर सत्याग्रहात हरिजन भगिनी तुरुंगात आल्या ! महात्माजींच्या सभेला हजारो भगिनी जमायच्या. सामुदायिक प्रार्थना भगिनी चालवायच्या. स्वातंत्र्याच्या लढयाने ब्रिटीशांची गुलामगिरी जात होतीच; परंतु घरच्या गुलामगिरीचेही पाश तुटत होते.

 

देशात स्वराज्याच्या स्वातंत्र्याचे लढे सुरु होते, स्वदेशीच्या काळात ‘देशी बांगडयाच घालू’ म्हणून काही भगिनींनी शपथा घेतल्या. ‘सगळ्यांनी विणलेले गावटी लुगडेच वापरु’ अशा शपथा घेतल्या. लोकमान्य टिळकांमुळे महाराष्ट्रातील पांढररेशा स्त्रियांत थोडीफार जागृती आली. परंतु तात्पुरती. अजून हृदय हलले नव्हते. देशातील नवीन ध्येये स्त्रियांपर्यंत जाऊन पोचली नव्हती.

या सुमारास महात्माजी दक्षिण आफ्रिकेतून आले. दक्षिण आफ्रिकेतील हिंदी स्त्रियांनी नवीन इतिहास लिहिला होता. कडेवर मुले घेऊन हिंदी मायभगिनी त्या दूर देशात सत्याग्रहात सामील झाल्या होत्या, तुरुंगात गेल्या होत्या ; आणि त्यांनी बलिदानही केले होते. महात्माजी कस्तुरवांना म्हणाले, “तू तुरुंगात मेलीस तर जगदंबेप्रमाणे मी तुझी पूजा करीन !” भारतीय नारीचे तेज पुन्हा प्रकट होऊ लागले होते. देवी सरोजिनी, अ‍ॅनी बेझंट या इकडे व्याख्याने देत होत्या. सरोजिनींनी गोखल्यांच्या आज्ञेवरुन हिंदु-मुस्लिम ऐक्यार्थ दौरा काढला. गोखले त्यांना ‘हिंदचा बुलबुल’ असे म्हणत. सरोजिंनीनी इंग्रजीत अप्रतिम कविता लिहिलेल्या. यापूर्वी बंगालमधील तारुलता दत्त (तोरु दत्त) या तरुण मुलीने इंग्रजीत कविता लिहिल्या होत्या. तोरु अल्पवयात मरण पावली. तिला अनेक भाषा येत. फ्रेंच भाषेत ती पारंगत होती. ती जगती तर तिच्या प्रतिभेचा परिमल जगभर जाता. आणि पुढे सरोजिनी आली. अ‍ॅनी बेंझटबाईंनी नि टिळकांनी स्वराज्याची चळवळ सुरु केलेली. सरोजिनींनी त्यातही भाग घेतला. परंतु खेडयापाडयांत जाऊन जनतेची सेवा करणे, स्वयंसेवक होणे ही गोष्ट नवीन होती. आम जनतेत ही भावना अजून गेली नव्हती. स्त्रियांत तर नव्हतीच. परंतु महात्माजींनी हाक मारली. चंपारण्यातील शेतकर्‍यांचा प्रश्न सोडवायला ते गेले. परंतु महात्माजींचे सारे काम पायाशुद्ध. तेथील जनतेत त्यांना प्राण ओतायचा होता. त्यांनी स्वयंसेवक भगिनींचीही मागणी केली... ज्या शेतकरी मायबहिणींत जातील. आणि स्त्रिया पुढे आल्या.

श्रीमती अवंतिकाबाई गोखले त्या वेळेस बिहारमध्ये गेल्या. कस्तुरबांबरोबर काम करु लागल्या. अवंतिकाकबाईंनी गांधीजींचे पहिले चरित्र मराठीत लिहिले व लोकमान्यांनी त्याला प्रस्तावना लिहिली. असा हा आरंभ होता. राष्ट्राच्या जीवनात स्त्रियांनी समरस होण्याचा तो मंगल प्रारंभ होता. महात्माजींनी राष्ट्रव्यापक आंदोलनास सुरुवात केली. सत्याग्रह आला. असहकार आला. पिंकेटिंग आले. नेहरुंच्या, देशबंधूंच्या घराण्यांतील स्त्रिया जाडीभरडी खादी नेसून मिरवणुका काढू लागल्या. लाठीमार होऊ लागला. कलकत्याच्या विलायती मालावर निरोधन करायला वासंतीदेवी उभ्या राहिल्या. स्त्रियांचा आत्मा मुक्त झाला. हजारो वर्षांचे ग्रहण जणू सुटले. सतीचे तेज पुन्हा प्रकटले. अब्बास तय्यबजींच्या कुटुंबातील मंडळी, अल्ली बंधूंची माता बीअम्मा, अशा मुस्लिम भगिनींही सभांतून, सत्याग्रहांतून झळकू लागल्या.

   

परंतु स्त्रियांचे शिक्षण असे वाढू लागले, तरी खरी दृष्टी त्याच्या पाठीमागे नव्हती. अजूनही नर्सिंगचा कोर्स घेतला तर लग्न व्हायला अडचणी येतील, असे आईबापांना वाटते, पालकांना वाटते. लग्नासाठी सारे, अशीच वृत्ती आहे. मुलांना शिकवताना त्याचे लग्न व्हायचे आहे ही भावना नसते. मुलींना शिकवताना ती असते. “न शिकेल तर लग्न कसे होईल ?” असे म्हणतात. लग्नासाठी शिकायचे. स्त्रियांनी का शिकावे ? कोण म्हणतील, “लग्न व्हायला अडचण येऊ नये म्हणून.” दुसरे म्हणतील, “हिशेब ठेवील, दुकानातून माल आणील. धोब्याला कपडे किती दिले वगैरे लिहून ठेवील.” आणखी कोणी म्हणतील, “पतीबरोबर वादविवाद करील. काव्यशास्त्रविनोद करील. कलात्मक व साहित्यिक आनंद उपभोगायला पतीला बाहेर नको जायला. आपली बायको भुक्कड, नुसती चूल फुंकणारी, असे त्याला नको वाटायला.” अशा या नाना दृष्टी असतात. परंतु यांतील एकही खरी नाही. स्त्रियांनी का शिकावे ? त्यांना आत्मा आहे म्हणून, त्या मानव आहेत म्हणून. शिक्षणाचा इतर काय उपयोग व्हायचा असेल तो होईल, परंतु स्वतःच्या विकासासाठी शिकायचे. देहाला भाकरी हवी तशी मनाला विचाराची भाकर हवी. स्त्रियांची मनोबुद्धी का उपाशी ठेवायची ? ही दुष्टी शिक्षण घेणार्‍या  स्त्रियांत नव्हती, त्यांना शिक्षण देणार्‍यां मध्येही क्वचित असे.

इंग्रजी शिकलेल्यांची जशी एक स्वतंत्र जात झाली, तशीच सुशिक्षीत स्त्रियांचीही होऊ लागली. साहेबी पोषाख करावा, नटावे, मुरडावे, असे सुशिक्षित पुरुषांस वाटे, तसेच सुशिक्षित स्त्रियांना वाटे. सुशिक्षीत स्त्री-पुरुष परदेशी मालाच्या जिवंत जाहिराती असत ! स्वदेशी, परदेशी विचारच आमच्याजवळ नसे. देशी जनतेजवळ जणू संबंध राहिला नाही. आपल्याच कोट्यावधी बंधूंना तुच्छ मानणे हा आमच्या शिक्षणाचा परिणाम झाला. पुष्कळ वर्षापूर्वी एकदा एक मित्र मला म्हणाले, “मी आगगाडीतून प्रवास करताना टॉमीचा पोषाख करतो. डोक्यावर हॅट, हातात छडी, शॉर्ट खाकी पॅंट ; मग मला नेहमी जागा मिळे !” असे करण्यात सुशिक्षितांना प्रतिष्ठा वाटे. पुरुषांपेक्षा स्त्रियांत सजण्याची वृत्ती अधिकच असते. सुशिक्षित स्त्रियांचे समाज म्हणजे परदेशी मालाची प्रदर्शने वाटत !

 

हिंदी स्त्रिया थोडे फार शिकू लागल्या. अर्थात खालपर्यंत अजून शिक्षण गेलेच नव्हते. आजही नाही गेले, तर ३०-४० वर्षांपूर्वीची गोष्ट विचारायलाच नको. परंतु मुलींना शाळेत घातले पाहिजे याला फारसा विरोध आता राहिला नव्हता. स्त्रियांनीच स्त्रियांची उन्नती करायला पुढे यायला हवे होते. महर्षी कर्वे यांच्या संस्था वाढल्या. त्यांना चिपळूणकरांसारखे उत्साही सरकारी लाभले. चिपळूणकर अमेरिकेतून शिकून आलेले. अति उत्साही नि कळकळीचे. हिंगण्याचे प्रयत्‍न अविरत चालू होते. आणि पुण्यात सेवासदन निघाले. त्या वेळेस न्या. रानड्यांच्या पत्‍नी रमाबाई हय़ात होत्या. भारत सेवक समाजाचे थोर सेवक गोपाळ कृष्ण देवधर यांनी सेवासदनाचा पाया घातला. रमाबाईंनी त्या कामाला वाहून घेतले. सेवासदनाचा आज अपार पसारा आहे. अनेक ठिकाणी त्याच्या शाखा आहेत.

हिंदूस्थानातील मोठमोठया दवाखान्यांतून हिंदी परिचारिका नसत. गोर्‍या किंवा एतद्देशीय ख्रिश्चन किंवा ज्यू परिचारिका असत. या देशात शिक्षणच नव्हते. स्त्रियांनी निर्भयपणे काम करण्याची परंपरा नव्हती. संस्थांतून नोकरीचाकरी करण्याची रुढी नव्हती. दळण-कांडण, स्वयंपाक, भांडी घासणे हेच त्यांचे धंदे. परिचारिका होणे, डॉक्टर होणे, वकील होणे, शिक्षक होणे ; समाजातील अनेक क्षेत्रांत जाणे, स्वावलंबी होणे, स्वाभिमानाने भाकरी मिळवणे हे अजून नव्हते. सेवासदनाने ही कोंडी फोडली, सेवासदनाने परिचारिकांचा, सेविकांचा वर्ग काढला. विधवा हिंदी स्त्रियांना नवमार्ग दाखवला. त्यांच्या निराश, अंधारमय जीवनात प्रकाश आणला. हळूहळू हे वातावरण सर्वत्र. पसरले. दवाखान्यांत देशी परिचारिका नसत म्हणून आजारी स्त्रिया तेथे राहायला तयारच नसत. परंतु आता दवाखान्यांत रहायला त्या नाखूष नसतात.

अमेरिकेतील प्राथमिक शिक्षण स्त्रियांच्या हाती आहे. आपल्याकडे स्त्रिया शिक्षक होऊ लागल्या. सेवासदनाने स्त्रियांचे ट्रेनिंग कॉलेज काढले. पुढे आणखी निघाली. लहान मुलामुलींना स्त्रियांनीच शिकवावे. स्त्रियांचा स्वभाव प्रेमळ नि कोमल असतो. प्लेटो म्हणतो, “ज्याला मुलांविषयी प्रेम वाटत नाही, त्याने शिक्षक होऊ नये.” स्त्रिया उच्च शिक्षण घेऊ लागल्या. पदवीधर होऊ लागल्या. लेखन करु लागल्या. मुलींच्या शाळा चालवू लागल्या. कितीतरी प्रथितयश अशा साहित्यिक स्त्रिया डोळ्यांसमोर येतात.