शुक्रवार, मे 29, 2020
   
Text Size

श्यामची आई

इंदूने पत्र लिहिले व वर पत्ता लिहिला. पुरूषोत्तम ते पत्र पेटीत टाकून आला. इंदूचा मुलगा घरी उठला होता म्हणून इंदू निघून गेली.

'बाळ, पाणी दे रे!' आई माझ्या लहान भावाला म्हणाली. तो एकदम तोंडात ओतू लागला.

'चमच्याने घाल रे तोंडात, संध्येच्या पळीने घाल, चमचा नसला कुठे तर.' असे आईने सांगितले. तसे पुरूषोत्तमाने पाणी पाजले.

'या जानकीबाई, या हो, बसा.' जानकीबाई समाचाराला आल्या होत्या.

'पाय चेपू का जरा?' त्यांनी विचारले.

'चेपू बिपू नका. ही हाडे, जानकीबाई, चेपल्याने खरेच जास्त दुखतात. जवळ बसा म्हणजे झाले.' आई म्हणाली.

'आवळयाची वडी देऊ का आणून? जिभेला थोडी चव येईल.' जानकीबाईंनी विचारले.

'द्या तुकडा आणून.' क्षीण स्वरात आई म्हणाली.

'चल पुरूषोत्तम, तुजजवळ देत्ये तुकडा, तो आईला आणून दे.' असे म्हणून जानकीवयनी निघून गेल्या. पुरूषोत्तमही
त्यांच्याबरोबर गेला व त्यांनी दिलेली आवळयाची वडी घेऊन आला. आईने तोंडात लहानसा तुकडा धरून ठेवला. पुरूषोत्तम जवळ बसला होता.

'जा हो बाळ, जरा बाहेर खेळबीळ, शाळेत काही जाऊ नकोस. मला बरे वाटेल, त्या दिवशी आता शाळेत जा. येथे कोण आहे दुसरे?' असे त्याच्या पाठीवर हात फिरवीत आई म्हणाली.

पुरूषोत्तम बाहेर खेळावयास गेला.

तिसरे प्रहरी नमूमावशी आईकडे आली होती. आईची ती लहानपणची मैत्रीण. ती गावातच दिली होती. दोघी लहानपणी भातुकलीने, हंडी-बोरखडयाने खेळल्या होत्या. दोघींनी झोपाळयावर ओव्या म्हटल्या होत्या. दोघींनी एकत्र मंगळागौर पूजिली होती. एकमेकींकडे वसोळया म्हणून गेल्या होत्या. नमू मावशीला आईकडे वरचेवर येता येत नसे. तिचे घर होते गावाच्या टोकाला. शिवाय तिलासुध्दा मधूनमधून बरे नसे.

'ये नमू, कसं आहे तुझं? तुझ्या पायांना जरा सूज आली होती, आता कशी आई?' आईने नमूला विचारले.

'बरे आहे. चाफ्याच्या पानांनी शेकविले. सूज ओसरली आहे. पण, तुझं कसं आहे? अगदीच हडकलीस. ताप निघत नाही अंगातला?' नमूमावशी आईच्या अंगाला हात लावून म्हणाली.

'नमू, तुझ्याबरोबर पुरूषोत्तम येईल, त्याच्याबरोबर तांबलीभर तेल दे पाठवून. तेलाचा टाक नाही घरात. द्वारकाकाकू ओरडते. तुला सारे समजते. मी सांगायला नको. तू तरी का श्रीमंत आहेस? गरीबच तू, परंतु परकी नाहीस तू मला, म्हणून सांगितले.' आई म्हणाली.

'बरे, हो, त्यात काय झाले? इतके मनाला लावून घेऊ नकोस. सारे मनाला लावून घेतेस. तुझे खरे दुखणे हेच आहे. मुलांना हवीस हो तू. धीर धर.' नमू म्हणाली.

'आता जगण्याची अगदी इच्छा नाही. झाले सोहाळे तेवढे पुरेत.' आई म्हणाली.

'तिन्हीसांजचे असे नको ग बोलू. उद्या की नाही, तुला गुरगुल्या भात टोपात करून आणीन. खाशील ना?' नमूमावशीने विचारले.

'नमू! डोळे मिटावे हो आता. किती ग ओशाळवाणे, लाजिरवाणे हे जिणे?' आई डोळयांत पाणी आणून म्हणाली.
'हे काय असे? बरे होशील हो तू व चांगले दिवस येतील. तुझे श्याम, गजानन मोठे होतील. गजाननला नोकरी लागली का?' नमूने विचारले.

'महिन्यापूर्वी लागली. परंतु अवघा एकोणीस रूपये पगार. मुंबईत राहणं, तो खाणार काय, पाठविणार काय? शिकवणी वगैरे करतो. परवा पाच रूपये आले हो त्याचे. पोटाला चिमटा घेऊन पाठवीत असेल.' आई सांगत होती.

 

श्याम या नाना रंगाच्या खडयांकडे पाहत बसला. या लहान खडयांत किती सौंदर्य देवाने ओतले आहे, असा विचार मनात येऊन तो त्या खडयांना हृदयाशी धरीत होता. जणू सौंदर्यसागर परमात्म्याच्याच त्या मूर्ती. भक्ताला जिकडे तिकडे ईश्वराच्या मूर्ती दिसतात, ह्याचा अल्प अनुभव त्याला येत होता. एक प्रकारची कोमलता त्याच्या मुखावर शोभत होती.

गोविंदा, राम, नामदेव सारे त्याच्याजवळ आले.

'श्याम! काय आहे तुझ्या हातांत? फूल का?' रामने विचारले.

'अरे, फुलाला माझे मलिन व पापी हात मी कधी लावतो का? मी दूरूनच त्याला हात जोडीत असतो.' श्याम म्हणाला.

'मग काय आहे हातांत?' नामदेवाने विचारले.

'देवाच्या मूर्ती.' श्याम म्हणाला.

'तुमची गणपतीची मूर्ती तर तुम्ही देऊन टाकली ना बाबूला?' भिकाने विचारले.

'हो, पण माझ्याजवळ किती तरी मूर्ती आहेत.' श्याम म्हणाला.

'पाहू दे, कसली आहे?' असे म्हणून गोविंदाने श्यामचे हात धरले व मूठ उघडली. त्या मुठीतून माणिक-मोत्ये बाहेर पडली.

'हे माझे हिरे, हे माझे देव. लोक म्हणतात, समुद्राच्या तळाशी मोत्ये असतात व पृथ्वीच्या पोटात हिरे असतात. मला तर प्रत्येक नदीच्या वाळूत व प्रत्येक टेकडीच्या माथ्यावर हिरे व मोत्ये दिसतात. पाहा रंग कसे आहेत!' असे म्हणून श्याम दाखवू लागला.

'श्याम, आज बोलणार ना तू?' रामने विचारले.

'हो. त्या मुलांना मी सांगितले आहे. जेवून या म्हणून. त्यांनीच हे सुंदर खडे आणून दिले. त्यांनीच हा आनंद दिला व उत्साह. मी आता दोन ताससुध्दा बोलेन. प्रार्थनेची वेळ झाली असेल ना?' श्यामने विचारले.

प्रार्थनेची वेळ झाली होती. श्याम अंगावर पांघरूण घेऊन बसला होता. प्रार्थना झाल्यावर तो बोलू लागला.

जप्तीच्या वेळी आमची दूर्वांची आजी घरी नव्हती. ती कोठे गावाला गेली होती, ती परत आली. आई त्या दिवसापासून अंथरूणालाच खिळली. तिच्या अंगात ताप असे, तो निघत नसे. शुश्रूषा तरी कोण करणार? आजीला होईल तेवढं आजी करीत असे. राधाताई मधून मधून येत व आईला कधी मुरावळा वगैरे आणून देत. कधी पित्ताची मात्रा आल्याच्या रसात देत. जानकीवयनी, नमूमावशी वगैरे येत असत.

परंतु घरात आता काम कोण करणार? शेजारच्या शरदला न्हाऊ कोण घालणार? आई जे दोन रूपये मिळवीत होती, ते आता बंद झाले. वडील आले, म्हणजे दूर्वांची आजी रागाने चरफडे, बडबडे.

'मेला स्वयंपाक तरी कसा करावयाचा? चुलीत घालायला काडी नाही, गोवरीचे खांड नाही; भाजीला घालायला तेल नाही, मीठ नाही. का नुसता भाजीभात उकडून वाढू?' दूर्वांची आजी बोलत होती.

माझे वडील शांतपणे तिला म्हणाले, 'नुसते तांदूळ उकडून आम्हांला वाढ, द्वारकाकाकू! आमची अब्रू गेलीच आहे. ती आणखी दवडू नका.'

त्या दिवशी आई पुरूषोत्तमला म्हणाली, 'पुरूषोत्तम! तुझ्या मावशीला पत्र लिही. आता अखेरच्या वेळी तीच उपयोगी पडेल. तिला लिही, म्हणजे ती येईल. राधाताईंना एक कार्ड देण्यासाठी मी सांगितले आहे. जा, घेऊन ये; नाहीतर इंदूलाच मी बोलावत्ये, म्हणून सांग, तीच चांगले पत्र लिहील. जा बाळ, बोलावून आण.'

पुरूषोत्तमने इंदूला सांगितले व इंदू कार्ड घेऊन आली.

'यशोदाबाई! जास्त का वाटते आहे? कपाळ चेपू का मी जरा?' ती प्रेमळ मुलगी म्हणाली.

'नको इंदू, विचारलेस एवढेच पुष्कळ हो. कपाळ    चेपून अधिकच दुखते. तुला पत्र लिहिण्यासाठी बोलाविले आहे. माझ्या बहिणीला पत्र लिहावयाचे आहे. सखूला, तिला माझी सारी हकीकत लिही व मी बोलाविले आहे, म्हणून लिही. कसे लिहावे, ते तुलाच चांगले समजेल.' आई म्हणाली.

 

रात्र अडतिसावी

आईचा शेवटचा आजार

श्याम आजारी पडला. अंगात तापही होता. डोळे मिटून तो पडला होता.

"श्याम! पाय चेपू का?' गोविंदाने विचारले.

'नको, माझे पाय चेपून काय होणार! माझी सेवा नको करायला, तुम्ही आपापली कामे करा. त्या मोहन पाटलाचा ताका लौकर विणून द्या. जा, माझ्याजवळ बसून काय होणार! राम राम म्हणत मी शांत पडून राहीन.' श्याम म्हणाला.

'श्याम! कोणी आजारी पडले, तर आपण जातो. आपल्या आश्रमातील कोणी आजारी पडला, तर त्याच्याजवळ नको का बसायला?' रामाने विचारले.

'अरे, इतका का मी आजारी आहे! तुमचे माझ्यावर प्रेम आहे. मी कितीही जेवलो, तरी पोटभर जेवलो, असे तुम्हास वाटत नाही. मी बरा असलो तरी बरा आहे, असे वाटत नाही. मी आजारी नसलो तरी तुम्ही आजारी पाडाल. वेडे आहात, काही वातबीत झाला, तर बसा जवळ. तुम्ही कामाला गेलात, तरच मला बरे वाटेल. गोविंदा, जात तू. राम, तूही पिंजायला जा!' श्यामच्या निक्षून सांगण्यामुळे सारे गेले.

सायंकाळी श्यामला जरा बरे वाटत होते. अंथरूणात बसून तो सूत कातीत होता. तोंडाने पुढील गोड श्लोक म्हणत होता.

सुचो रू चो ना तुजवीण काही । जडो सदा जीव तुझ्याच पायी
तुझाच लागो मज एक छंद ।  मुखात गोविंद हरे मुकुंद ॥
तुझाच लागो मज एक नाद ।  सरोत सारेच वितंडवाद ।
तुझा असो प्रेमळ एक बंध ।  मुखात गोविंद हरे मुकुंद ।

'काय रे? आतासे आलात?' श्यामने विचारले.

'तुम्ही रात्री सांगणार का गोष्ट?' एका लहान मुलाने विचारले.

'हो, सांगेन. तुम्ही या.' श्याम म्हणाला.

'पाहा, तुम्हांला छान छान दगड आणले आहेत. आम्ही त्या टेकडीवर फिरावयास गेलो होतो.'

एक मुलगा म्हणाला व त्याने ते दगड श्यामजवळ ठेवले.

'खरेच किती सुंदर आहेत हे! या, आपण त्यांची चित्रे करू. मी पोपट करतो हं!' असे म्हणून श्याम त्या खडयांचा पोपट करू लागला.

मुले एकेक खडा देत होती.

'आता चोचीला लाल रंगाचा खडा हवा लहानसा,' श्याम म्हणाला.

'हा घ्या, हा पाहा चांगला आहे.' एक मुलगा म्हणाला. श्यामने तो खडा लाविला व सुंदर राघू तयार झाला.

'आता मोर बनवा मोर.' दुसरा एक मुलगा म्हणाला.

'तुम्हीच बनवा मोर.' श्याम म्हणाला.

'आम्हांला चांगला येत नाही.' तो म्हणाला.

'पण आता तुम्ही घरी जा. लौकर जेवून या.' श्यामने सांगितले.

'चला रे, जेवण करून येऊ.' एक मोठा समजूतदार मुलगा बोलला व ती पाखरे उडून गेली.

   

लहान भाऊ, त्याला काय समजणार? तो शेजारी जेवायला निघून गेला.

त्या दिवशी वडील जेवले नाहीत. त्यांनी स्नान केले. देवाची पूजा केली. लाज वाटत होती, तरी देवळात गेले. खाली मान घालून गेले व तसेच परत आले. ज्या गावात त्यांना सरदार म्हणत, ज्या गावात ते पंच होते, ज्या गावात त्यांना मान मिळे, त्या गावात त्या दिवशी कुत्रेही विचारीत नव्हते! ज्या गावात ते मिरवले, ज्या गावात त्यांच्या शब्दाला मान मिळे तेथेच लहान लहान पोरेही त्या दिवशी त्यांची टर उडवीत होती. जेथे फुले वेचली, तेथेच शेण वेचण्याची आईवर पाळी आली. आजपर्यंत आईने कसेबसे अब्रूने दिवस काढले होते; परंतु देवाला तिची कसून परीक्षा घ्यावयाची होती. मानाची शिखरे व अपमानाच्या खोल द-या, आईला दोन्ही प्रकार देव दाखवू इच्छीत होता. संपूर्ण सुख व संपूर्ण दु:ख दोन्ही कळली पाहिजेत. अमावस्या व पौर्णिमा दोन्हींचे दर्शन झाले पाहिजे. या संसाराचे संपूर्ण ज्ञान ती मोठी आई माझ्या छोटया आईला करून देत होती.

दुपारी पोलिस, कारकून, तलाठी, सावकार, साक्षीदार आमच्या घरी आले. घरात स्वयंपाकाची चार भांडी ठेवून बाकी सारी एका खोलीत त्यांनी अडकविली. आईच्या अंगावर दागिने नव्हतेच. मणिमंगळसूत्र काय ते राहिले होते. होते नव्हते, ते त्या खोलीत टाकून त्याला सावकाराने कुलूप ठोकले. सील केले. आम्हांला राहावयाला दोन खोल्या मोठया कृपेने देण्यात आल्या.

ती मंडळी निघून गेली. आई इतका वेळ उभी होती. केळीप्रमाणे ती थरथर कापत होती. अंगात ताप व आत मनस्ताप! आतून बाहेरून ती भाजून निघत होती. मंडळी निघून जातात आई धाडकन् खाली पडली. 'आई आई!' असे करीत पुरूषोत्तम रडू लागला. वडील आईजवळ गेले. तिला अंथरूणावर ठेवण्यात आले. थोडया वेळाने आईला शुध्द आली व म्हणाली, 'ज्याला भीत होत्ये, ते शेवटी झाले! आता जगणे व मरणे सारखेच आहे!'

 

रात्र सदतिसावी

अब्रूचे धिंडवडे

श्यामने आरंभ केला.

शेवटी आमच्यावर मारवाडयाने फिर्याद करण्याचे ठरविले. कोर्टात फिर्याद दाखल झाली. व्याज व मुद्दल मिळून चार हजारांची त्याने फिर्याद दिली. दावा सुरू झाला. कोर्टात सावकाराचे देणे योग्य ठरले व सारी होती नव्हती ती मिळकत जप्त करून तिचा लिलाव व्हावा, असा निकाल देण्यात आला.

त्या दिवशी गावात दवंडी पिटली जाणार होती! आईला दोन दिवस एक घासही गेला नाही. डोळयाला डोळा लागला नाही. 'आई जगदंबे! शेवटी या डोळयांदेखत अब्रूचे धिंडवडे होणार ना? या कानांनी ती दुष्ट दवंडी ऐकावयाची! माझे प्राण ने ना ग आई! नको हा जीव!' अशी ती प्रार्थना करीत होती.

पुरूषोत्तम शाळेत गेला होता. घरी आईला खूप ताप भरून आला व ती अंथरूणावर पडली. ती तळमळत होती व रडत होती.

सकाळी नऊ वाजायची वेळ होती. महार ढोलके घेऊन गावात दवंडी देत होता. तो ठिकठिकाणी उभा राहून 'आज भाऊराव यांच्या घराची दुपारी जप्ती होणार आहे.' वगैरे ओरडत सांगे व ढोलके वाजवी. दुस-याच्या मानहानीत आनंद मानणारे काही जीव असतात. त्यांना आनंद होत होता. खानदानीच्या घरंदाज लोकांस वाईट वाटत होते.

महार दवंडी देत चालला होता. शाळेजवळ येऊन त्याने ढोलके वाजविले. सारी मुले ऐकू लागली. त्याने दवंडी दिली व पुढे गेला. माझ्या भावाला मुले चिडवू लागली. पोरे त्या दवंडीची नक्कल करीत व माझ्या भावाच्या पाठीस लागत.

'पुर्षाच्या घराची जप्ती होणार, ढुमढुमढुम!' असे ती म्हणत व पुरूषोत्तम रडू लागे. त्याच्या डोळयांतून अश्रू येऊ लागले. तो मास्तरांजवळ गेला व म्हणाला,

'मी घरी जाऊ का?'

मास्तर म्हणाले, 'कोठे चाललास? बस खाली! अर्ध्या तासाने शाळाच सुटेल.' मास्तरांना त्या लहान भावाच्या हृदयाची कालवाकालव समजली का नाही?

दहा वाजले. शाळा सुटली. लांडग्यांनी कोकराची दशा करावी तशी माझ्या भावाची इतर मुलांनी केली. मुले त्याच्या 'ढुमढुमढुम' करीत पाठीस लागली. तो रडत रडत घरी आला व एकदम आईला बिलगला.

'आई! सारी मुले मला चिडवतात! का ग असे? म्हणतात, 'तुझ्या घराची जप्ती होणार, शेणाचे दिवे लागणार.' आई! सारी का ग माझ्या पाठीस लागतात? आपणांस येथून बाहेर काढणार का ग? काय ग झाले? असे आईला विचारू लागला.

'बाळ! देवाची मर्जी; मी तरी काय सांगू तुला?' असे म्हणून पडल्यापडल्याच या पोटच्या गोळयाला पोटाशी घेऊन आई शतधारांनी त्याला स्नान घालू लागली. मायलेकरे शोकसागरात बुडून गेली होती. शेवटी आई त्याला म्हणाली, 'जा बाळ; हातपाय धू; आज राधाताईकडे जेवायला जा. इंदूने तुला बोलावले आहे.'

   

पुढे जाण्यासाठी .......