रविवार, जुलै 21, 2019
   
Text Size

प्रकरण ६ : नवीन समस्या

इंग्लंड हिंदुस्थानात आले.  राणी एलिझाबेथने ईस्ट इंडिया कंपनीला इ.सन १६०० मध्ये सनद दिली तेव्हा शेक्सपिअर हयात होता, लिहीत होता.  इ.सन १६११ मध्ये बायबलची अधिकृत अशी इंग्रजी भाषेतील प्रत प्रसिध्द झाली.  १६०८ मध्ये मिल्टन जन्मला, आणि हॅम्पटन्, क्रॉमवेल आणि राजकीय क्रांती यांचा काळा आला.  १६६० मध्ये शास्त्राची वाढ होण्यास कारणीभूत झालेली रॉयल सोसायटी ऑफ सायन्स स्थापन झाली.  त्यानंतर शंभर वर्षांनी १७६० मध्ये धावत्या धोट्याचा शोध लागला आणि मग भराभरा सूत कातण्याचे यंत्र, वाफेचे एंजिन, यांत्रिक माग यांचे शोध लागले.

या दोन इंग्लंडपैकी कोणते इंग्लंड हिंदुस्थानात आले? शेक्सपिअर आणि मिल्टनचे इंग्लंड, उदात्त वाङ्मय यांचे इंग्लंड, शौर्यधैर्याचे इंग्लंड, राजकीय क्रांती आणि स्वातंत्र्यार्थ लढा करणारे इंग्लंड, ज्ञानविज्ञानाचे आणि औद्योगिक प्रगतीचे इंग्लंड येथे आले की, रानटी फौजदारी कायदेकोड करणारे, पशूसम वागणारे, मिरासदारीचे व वतनदारीचे रक्षण करू पाहणारे प्रतिगामी सरंजामशाही इंग्लंड इकडे आले? कारण दोन इंग्लंडे आपणांस दिसतात.  कोणताही देश घेतला तरी तेथे संस्कृतीची राष्ट्रीय चारित्र्याची ही दोन रूपे आपणांस दिसून आल्याशिवाय राहात नाहीत.  एडवर्ड थॉम्प्सन लिहितो : ''इंग्लंडमध्ये उच्च संस्कृती आणि सामान्य संस्कृती यांत नेहमी अपरंपार अंतर आहे.  कोणत्याही देशाशी तुलना केली तरी या बाबतीत आपल्याकडील अंतराइतके अंतर आढळणार नाही; आणि हे अंतर इतक्या आस्ते कदमांनी कमी होत आहे की ते कमी होत आहे असे वाटतही नाही.'' *

-----------------------
*  एडवर्ड थॉम्प्सनच्या ''Making of Indian Princess.'' 'हिंदी संस्थानांची निर्मिती' (१९४३), सर पुस्तकातील उतारा, पृष्ठ २६४.

ही दोन्ही इंग्लंडे शेजारीशेजारी राहतात, एकमेकांवर परिणाम करीत असतात.  ती अलग करता येणार नाहीत.  दुसर्‍या भागाला अजिबात विसरून एकच भाग हिंदुस्थानात येणे शक्य नव्हते.  परंतु कोणत्याही महत्त्वाच्या गोष्टीत एकाच भागाला प्रामुख्याने भाग घेता येतो; दुसर्‍या भागावर तो कुरघोडी करतो, आणि इंग्लंडमधील प्रतिगामी आणि अनिष्ट असा जो भाग, त्यानेच या देशात सत्ता गाजवायला येणे हे अपरिहार्यच होते.  असे करीत असताना या देशातीलही प्रतिगामी व अनिष्ट भागाशी त्याने अधिक संबंध ठेवणे, त्यांना उत्तेजन देणे ही गोष्ट क्रमप्राप्तच होती.

अमेरिकेने स्वातंत्र्य मिळविले व हिंदुस्थानचे स्वातंत्र्य गेले ह्या घटना जवळजवळ एकाच वेळी घडल्या.  गेल्या शेदीडशे वर्षांत अमेरिकेने केलेली अवाढव्य प्रगती पाहून आणि आपल्या देशात जे काही झाले आहे, आणि जे काही होऊ शकले नाही त्याचे विचार मनात येऊन हिंदी मनुष्य उत्कंठेने, आशाळभूताप्रमाणे अमेरिकेशी आपली तुलना करीत बसतो.  अमेरिकेजवळ पुष्कळ गुण आहेत, आणि आपणांत अनेक उणिवा आहेत ही गोष्ट खरी आहे.  अमेरिकेचा नवी विटी, नवे राज्य असा प्रकार होता. नवीन सारा आरंभ होता, कोर्‍या पाटीवर लिहायचे होते.  जुनी बंधने, अडथळे नव्हते.  हिंदुस्थानात किती प्राचीन आठवणी, परंपरा आणि भानगडी, सारा बुजबुजाट होता.  गोंधळ होता.  तरीही असे वाटते की, ब्रिटनने हिंदुस्थानचा प्रचंड बोजा स्वत:च्या शिरावर जर घेतला नसता, आणि त्यांचे लोक म्हणतात त्याप्रमाणे लोकशाही कारभारात अडाणी असणार्‍या या देशाला लोकशाही कारभाराची कला शिकविण्याची इतकी वर्षे जर धडपड केली नसती तर, शक्य आहे की हिंदुस्थान अधिक स्वतंत्र व अधिक भरभराटलेला झाला असता, इतकेच नव्हे, तर जीवन जगण्यालायक करणार्‍या ज्ञानविज्ञानादी क्षेत्रांत, कलात्मक क्षेत्रातही कितीतरी पुढे तो गेला असता.

 

स्वातंत्र्याच्या इतिहासात अमेरिकन स्वातंत्र्याची घोषणा म्हणजे एक प्रगतीचा टप्पा आहे.  १७७६ मध्ये ही घोषणा केली गेली, आणि नंतर सहा वर्षांनी या वसाहती इंग्लंडपासून स्वतंत्र झाल्या.  त्यांनी मग आपले खरे बौध्दिक, आर्थिक, सामाजिक क्रांतिकार्य सुरू केले.  ब्रिटिशांच्या प्रेरणेने जी जमीनपध्दती अस्तित्वात आली होती, जी इंग्लंडमधील नमुन्याबरहुकूम होती, तिच्यात आमूलाग्र बदल करण्यात आला.  कितीतरी मिरासदारी व वतनदारीचे हक्क नष्ट करण्यात आले; मोठमोठ्या इस्टेटी जप्त करण्यात आल्या आणि त्या वाटून देण्यात आल्या.  एक नवीन जागृती येऊन अननुभूत नवचैतन्य संचारून बौध्दिक आणि आर्थिक चळवळीही मागोमाग आल्या.  सरंजामशाहीच्या अवशेषांपासून आणि परकी सत्तेपासून मुक्त झालेली अमेरिका प्रचंड पावले टाकीत झपाट्याने पुढे निघाली.

फ्रान्समध्येही क्रान्ती होऊन जुन्या व्यवस्थेचे प्रतीक असणारा बॅस्टिलचा तुरुंग शतखंड झाला व राजेरजवाडे, सारी सरंजामशाही निकालात निघून मानवी हक्कांची घोषणा जगासमोर केली गेली.

आणि इंग्लंडात काय होते ?  अमेरिका आणि फ्रान्स या देशांतील क्रांतिकारक घडामोडींनी घाबरून जाऊन इंग्लंड अधिकच प्रतिगामी झाले व रानटी आणि भेसूर फौजदारी कायदे अधिकच रानटी करण्यात आले.  १७६० मध्ये तिसरा जॉर्ज जेव्हा गादीवर आला तेव्हा १६० गुन्हे असे होते की, त्यांच्यासाठी स्त्री-पुरुष, मुलेबाळे सर्वांना देहान्तशिक्षा असे.  तिसर्‍या जॉर्जची दीर्घ कारकीर्द १८२० मध्ये संपायच्या वेळेस या १६० गुन्ह्यांच्या यादीत आणखी शंभर गुन्हे घालण्यात आले होते.  ब्रिटिश सैन्यातील सामान्य सैनिकाला पशूहूनही पशू समजून वागविण्यात येई, ते इतके क्रूरपणे की, अंगावर शहारे येतात.  देहान्तशिक्षा म्हणजे रोजचा प्रकार आणि फटके मारणे तर विचारूच नका.  फटके सार्वजनिक जागी देण्यात येत.  कधी कधी शेकडो फटक्यांची सजा असे; फटके खाता खाताच अपराधी कधी मरून जाई किंवा त्या यमयातनांतून तो दुर्दैवी जीव वाचलाच तर त्याचे ते शीर्णविदीर्ण शरीर ती अमानुष कथा मरेपर्यंत सांगत राही.

या बाबतीत, त्याचप्रमाणे माणुसकी, व्यक्तीची व समूहाची प्रतिष्ठा ज्यात ज्यात म्हणून असे त्या सर्वच बाबतीत हिंदुस्थान कितीतरी पुढे गेलेला होता, सुधारलेला होता.  त्या काळात इंग्लंडमध्ये किंवा युरोपमध्ये जेवढी साक्षरता होती, त्याहून अधिक साक्षरता या देशात होती.  अर्थात येथले शिक्षण परंपरागत असे असे.  इंग्लंड किंवा युरोपातल्यापेक्षा अधिक सुखसोयीही येथे होत्या व अधिक चांगल्या नागरिक चालीरीती होत्या.  युरोपातील बहुजनसमाजाची सर्वसाधारण स्थिती फार मागासलेली आणि दीनवाणी अशीच होती.  तिच्याशी तुलना करता हिंदुस्थान कितीतरी सुखी व सर्वसाधारणपणे पुढारलेला होता.  परंतु एक महत्त्वाचा प्राणभूत असा फरक होता. पश्चिम युरोपात नवीन शक्ती, नवीन जिवंत प्रवाह यांचा न कळत का होईना उदय होत होता, आणि त्याच्याबरोबर नवीन फेरबदलही येत होते.  परंतु हिंदुस्थानातील परिस्थिती साचीव व गतिहीन अशी झाली होती.

 

हिंदी धंदेवाले आणि व्यापारी जरी श्रीमंत होते, देशभर पसरलेले होते, आर्थिक व्यवस्थेवर जरी त्यांचे नियंत्रण होते, तरी राजकीय सत्ता त्यांच्या हातात नव्हती.  हिंदी राज्यकारभार जुलमी व बव्हंशी सरंजामशाही होता.  हिंदी इतिहासाच्या प्राचीन काळात कधी नसेल इतका सरंजामशाही वृत्तीचा राज्यकारभार त्या वेळेस येथे होता, त्यामुळे काही पाश्चिमात्य देशांत घडले त्याप्रमाणे येथे राजसत्ता हाती घेण्यास सज्ज असा मध्यम वर्ग नव्हता.  येथे तशी जाणीवच नव्हती.  प्रजा उदासीन व सारे मुकाट्याने सहन करणारी लाचार झाली होती, एक प्रकारची गुलामी वृत्ती वाढली होती.  क्रांतिकारक फरक होण्या पूर्वी मध्ये पडलेला हा मध्यम वर्गाचा खळगा भरून काढण्याची जरूर होती, कारण एकीकडे अनियंत्रित सत्ता व दुसरीकडे लाचार प्रजा अशी स्थिती होती.  हिंदी समाजरचनेतील प्रगतिहीनतेमुळे हा खळगा बहुधा पडला असावा.  बदलत्या युगात बदल करायला ही समाजरचना तयार नव्हती, आणि जी संस्कृती फेरबदल करायला विरोध करते ती मरते- पूर्वपरंपरागत जी समाजरचना आली होती तिच्यातील निर्माणशक्ती संपली होती.  केव्हाच तिच्यात फरक व्हायला पाहिजे होता.

त्या वेळेस ब्रिटिश लोक राजकीय दृष्ट्या बरेच पुढारलेले होते.  त्यांच्या देशात राज्यक्रांती पूर्वीच होऊन राजावर पार्लमेंटची अधिसत्ता स्थापन झाली होती.  नवीन मिळालेल्या सत्तेने मध्यमवर्ग संस्फूर्त झाला होता.  सर्वत्र जायला, पसरायला अधीर झाला होता.  वाढत्या आणि प्रगतिपर समाजात उत्साह, शक्ती यांचा जोर असतो, आतिण तत्कालीन इंग्लंडात आपणास या गोष्टी दिसून येतात.  कितीतरी क्षेत्रांत त्यांची उत्साहशक्ती दिसू येते, विशेषत: औद्योगिक क्रांतीचा उष:काल आणणार्‍या शोधबोलात त्यांनी चांगलीच अपूर्वता दाखविली.

परंतु अशा त्या काळी सत्ताधारी ब्रिटिश वर्ग कसा होता ?  अमेरिकेतील प्रसिध्द इतिहासकार चार्ल्स व मेरी बिअर्ड आपल्या पुस्तकात लिहितात, ''अमेरिकन क्रांती यशस्वी झाली आणि अमेरिकेतील ब्रिटिश राज्यसत्तेखालील प्रदेशातून तो सत्ताधारी ब्रिटिश वर्ग एकाएकी नाहीसा झाला.  नादान सत्ताधारी वर्ग, त्यांचे फौजदारी कायदे किती रानटी; त्यांची ती संकुचित आणि असहिष्णु विद्यापीठ-पध्दती, सरकार म्हणजे नोकर्‍याचाकर्‍या मिळविणार्‍यांचे, हक्कदारांचे, मिरासदारांचे कडबोळे, एक प्रचंड कंपू; शेताभातात कष्ट करणार्‍या स्त्रीपुरुषांविषयी, लहानसहान दुकानधंदा करणार्‍यांविषयी तिटकारा; बहुजनसमाजाला साक्षर करायला नकार; प्रस्थापित धर्म कॅथोलिकांवर, तसेच तो पसंत नसणार्‍यांवर लादणे; खेड्यापाड्यांतून जमीनदारांचे व धर्मोपदेशकांचे वर्चस्व; लष्करात व आरमारात निष्ठुर पशुता; जमीनदारांची सत्ता मजबूत ठेवण्यासाठी मोठ्या मुलाकडेच सर्व वारसा जाण्याचा कायदा; नोकरीचाकरी मिळावी म्हणून राजाची खुशामत करणारांचे पोटार्थी थवे; काही जबाबदारी किंवा काम न पडता फुकट मानसन्मानाची जागा मिळावी, किंवा आमरण पोटगी मिळावी म्हणून राजदरबारी गोंडे घोळणारे लोक, आणि शासनतंत्र किंवा धर्मतंत्र यांची अशीच घटना की या सर्व घमेंडनंदरांचा, लुटारूंचा बोजा कायमचा बहुजनसमाजावर राहील; अशा प्रकारच्या ब्रिटिश सत्ताधारी वर्गापासून, या पर्वतप्राय दडपणापासून अमेरिकन क्रांतिकारकांनी ब्रिटिश राज्यसत्तेखाली वसाहतवाल्या जनतेस मुक्त केले. या मुक्ततेपासून दहा-वीस वर्षांच्या आतच कायद्याच्या व राजकीय धोरणाच्या बाबतीत अमेरिकेने इतक्या सुधारणा केल्या की मूळच्या मातृभूमीत- इंग्लंडमध्ये तशा सुधारणा व्हायला अनेक चळवळी करूनही शंभर वर्षे लागली.  आणि त्या सुधारणा व्हाव्या म्हणून ज्यांची चळवळ केली, त्या मुत्सद्दयांना इंग्लिश इतिहासात अजरामरत्व मिळाले. *

-----------------------
*  'Rise of American civilisation'-'अमेरिकन संस्कृतीचा उदय', खंड पहिला, पृष्ठ २९२

   

हिंदी माल उत्कृष्ट असे आणि युरोप त्याचे मोठे गिर्‍हाईक असे म्हणून तर साहसी नाव काढू पाहणारे लोक प्रथम या देशाकडे वळले.  ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीचे पहिले पहिले काम हिंदी माल नेऊन युरोपात विकणे हेच होते, आणि हा धंदा चांगलाच किफायतशीर असल्यामुळे कल्पनातीत नफा वाटला जाई.  इंग्लंडमध्ये उत्पादनाची नवीन उच्च तंत्रे वापरण्यात येऊ लागली तरीही हिंदी कलावंतांचे व कारागिरांचे कसबही इतके अपूर्व होते.  इंग्लंडमध्ये प्रचंड यंत्रयुग सुरू झाले तरीही हिंदी मालाचा पूर इंग्लंडमध्ये येतच होता.  कायद्याने भरमसाट जकाती बसवून आणि काही काही बाबतीत तर प्रत्यक्ष बंदी घालून हिंदी माल इंग्रजांना बंद करावा लागला.

प्लासीच्या लढाईचे जे वर्ष, त्याच वर्षी १७५७ साली क्लाईव्हने मुर्शिदाबादचे पुढील प्रमाणे वर्णन केले आहे.  ''लंडन इतकेच हे शहर विस्तृत, घनदाट, आणि श्रीमंत आहे.  फरक इतकाच की लंडनमधील लोकांजवळ जी काही मालमत्ता असेल, तिच्याहून अनंत पटींनी अधिक मालमत्ता जवळ असलेले येथे कितीतरी लोक आहेत.''  पूर्व बंगालमधील डाक्का शहर मलमलीसाठी प्रसिध्द होते.  ही दोन्ही शहरे महत्त्वाची असली तरी हिंदुस्थानच्या जवळजवळ एका बाजूला, पूर्व टोकाला होती.  सर्व देशभर याहून मोठी अशी कितीतरी शहरे होती, प्रचंड व्यापाराची, अवाढव्य देवघेवींची मोठमोठी केंद्रे ठायी ठायी होती.  बातम्या पोचविण्याची, किंमती, भाव कळविण्याची शीघ्रगामी परंतु कार्यक्षम पध्दती त्यांनी निर्माण केलेली होती.  ईस्ट इंडिया कंपनीच्या अधिकार्‍यांना अधिकृत अहवाल पोचण्यापूर्वीच सर्व बातम्या लढाईच्याही- मोठमोठ्या औद्योगिक केंद्रांना, मोठमोठ्या पेढ्यांना आधी येऊन मिळत.  औद्योगिक क्रांती होण्यापूर्वी जितकी वाढ होणे शक्य, जितकी प्रगती करणे शक्य तितकी येथे झाली होती.  आर्थिक वाढींची बीजे तिच्यात होती की नाही, किंवा प्रगतिहिन सामाजिक रचनेशी तीही पक्की जखडलेली होती की काय ते सांगणे कठीण आहे.  परंतु असे वाटते की, अडथळे न येते, उत्पात न होते, अघटित घटना न होत्या, तर नवीन औद्योगिक परिस्थितीशी हिंदी उद्योगधंद्याने आपल्या विशिष्ट पध्दतीनुसार जुळवून घेतले असते, स्वत:त फरक करून घेतले असते.  हिंदी उत्पादनपध्दती इतकी परिपक्व झाली होती की, तिच्यात काही बदल झालाच पाहिजे होता, परंतु तो बदल व्हायलाही तिच्यातच क्रांती होण्याची जरूर होती.  तो फरक घडवून आणायला कोणातरी त्रयस्थाची कदाचित जरूर असेल.  औद्योगिक क्रांतीपूर्व काळात हिंदी आर्थिक व्यवस्था कितीही परिपूर्ण आणि परिणत झालेली असती तरी औद्योगिक क्रांती झालेल्या देशातील उत्पादनाशी तिला फार दिवस टक्कर देता आली नसती.  स्वत:च्या देशात औद्योगिक क्रांती करून घेणे भाग होते, नाहीतर परदेशी आर्थिक व्यवस्था मान्य करावी लागली असती; म्हणजेच पुढे राजकीय भानगडींना तोंड द्यावे लागले असते.  परंतु झाले असे की, हिंदुस्थानात आधी राजकीय प्रभुत्व आले आणि त्यामुळे तेव्हापर्यंत उभारलेली आर्थिक व्यवस्था झपाट्याने नष्ट झाली.  तिच्या ऐवजी नवीन निर्मिती मात्र झाली नाही.  जुने गेले आणि नवे मात्र मिळाले नाही.  ईस्ट इंडिया कंपनी ब्रिटिशांच्या राज्यसत्तेची, त्याचप्रमाणे त्यांच्या भांडवलदारांच्या आर्थिक सत्तेची दोहोंची प्रतिनिधी होती.  ती सार्वभौम होती, आणि व्यापार्‍यांची कंपनी असल्यामुळे पैसा हे तर तिचे मुख्य ध्येय होते. ईस्ट इंडिया कंपनी आश्चर्यकारक गतीने कल्पनातीत पैसा मिळवीत असतानाच, अ‍ॅडम स्थिम या अर्थशास्त्रज्ञाने 'राष्ट्रांची संपत्ती' या आपल्या ग्रंथात १७५६ मध्ये पुढीलप्रमाणे लिहिले आहे, ''एखाद्या देशाचा राज्यकारभार केवळ बनियेगिरी करणार्‍या व्यापार्‍यांच्या कंपनीच्या हाती असणे म्हणजे दुर्दैव होय.  सर्वात वाईट असा तो राज्यकारभार असणार.''

 

जयपूर शहर त्यानेच बांधले.  नगर-रचनेचा त्याला नाद होता.  तत्कालीन युरोपातील अनेक नगरांचे नकाशे गोळा करून स्वत:च्या नगरीचा नकाशा त्याने स्वत: तयार केला.  जयपूरच्या संग्रहालयात जयसिंगाने गोळा केलेले युरोपियन नगरांचे नकाशे अद्यापही दिसून येतील.  जयपूर शहराची रचना इतक्या सुंदर रीतीने करण्यात आली होती की, आजही ते शहर आदर्श नगर-रचनेचा नमुना म्हणून मानण्यात येते.

तसे पाहिले तर जयसिंग काही फार वर्षे जगला नाही, परंतु थोड्याशा काळात त्याने कितीतरी केले.  आणि आजूबाजूला सदैव लढाया-खडेजंगी; नाना कारस्थाने आणि कारवाया.  तोही कधी कधी त्यात गुंतून जात असे.  त्याच्या मृत्यूच्या आधी चारच वर्षे नादिरशहाची ती टोळधाड येऊन गेलेली.  अशा धामधुमीच्या, अशांत, अस्थिर काळात जयसिंगने हे सरे केले.  तो कोठेही आणि कोणत्याही काळी जन्मता तरी नामवंत झाला असता.  परंतु लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट ही की, हिंदी इतिहासातील एका अतिअंधारमय कालखंडात, सर्वत्र उत्पात, विनाश आणि प्रक्षोभ यांचा धिंगाणा चालू असताना; आणि रजपुतान्यासारख्या सरंजामशाही कल्पनांच्या बालेकिल्ल्यात जयसिंग शास्त्रज्ञ म्हणून पुढे आला आणि कार्य करून दाखविता झाला.  यावरून एकच गोष्ट दिसून येते की, शास्त्रीय जिज्ञासा वृत्ती या देशात सर्वस्वी मेलेली नव्हती; तिचीही धडपड चालू होती; आणि संधी मिळती, वाढावयाला अवसर मिळता तर शास्त्रीय शोधबोधांचे भरगच्च पीक येथेही आले असले.  जयसिंग भलत्या काळात होऊन गेला, किंवा त्यालाच हे विचार येत, आसपासचे कोणीही तिकडे ढुंकून पाहावयाला किंवा आस्थेने विचारपूस करावयाला तयार नव्हते असे मुळीच नव्हे.  स्वत:च्या काळाचे तो अपत्य होता व स्वत:बरोबर काम करायला कितीतरी शास्त्रीय सहकारी त्याने गोळा केले होते. त्यांच्यातील काहींना त्याने पोर्तुगालकडे पाठविलेल्या शिष्टमंडळात धाडले.  तेव्हा परदेशात लांब आपले लोक कसे पाठवायचे असे त्याच्या मनातही आले नाही व सामाजिक रूढी त्याच्या इच्छेच्या आड आल्या नाहीत. असे वाटते की, त्या वेळेस तत्त्वदृष्टीने व व्यावहारिक तंत्रदृष्टीने शास्त्रीय शोधबोधाचे कार्य करायला देशात पुष्कळच अनुकूलता होती, फक्त कार्य करण्याची संधी मिळायला हवी होती.  परंतु कितीतरी काळ ती संधी मिळालीच नाही, आणि देशातील अव्यवस्था व गोंधळ संपल्यावरही, ज्यांच्या हाती सत्ता होती त्यांनी शास्त्रीय संशोधनकार्यास कधी उत्तेजन दिले नाही.

भारताची आर्थिक पार्श्वभूमी : दोन इंग्लंडे

हे दूरगामी राजकीय फेरबदल देशात होत असता येथील आर्थिक परिस्थिती कशी बरे होती ?  तिची पार्श्वभूमी कशी होती ?  व्ही. अ‍ॅन्स्टेने लिहिले आहे की, ''अठराव्या शतकापर्यंत तरी हिंदी उत्पादनपध्दती आणि हिंदी औद्योगिक व्यापारी संघटन जगातील कोणत्याही भागाशी तुलना केली असता समबल ठरली असती.''  हिंदुस्थान माल तयार करण्याच्या बाबतीत चांगलाच पुढारलेला देश होता.  युरोपाला व आणखी इतर देशांना तो स्वत:चा तयार माल पाठवी.  पेढ्यांची पध्दती परिपूर्ण होती आणि सर्व हिंदुस्थानभर ती पसरली होती, व मोठमोठ्या पेढीवाल्यांच्या, व्यापार्‍यांच्या हुंड्या देशात कोठेही वटविल्या जात असत.  हिंदुस्थानातच नव्हे, तर इराण, काबूल, हिरात, ताश्कंद आणि मध्य आशियातील अन्य शहरे येथेही या हुंड्या स्वीकारल्या जात.  व्यापारी भांडवल उत्क्रांत होत होत, आणि दलाल, अडत्ये, मुकादम इत्यादींचे एक भरगच्च नीट संघटन उभे राहिलेले होते.  गलबते बांधण्याचा धंदा चांगलाच भरभराटलेला होता आणि नेपोलियनजवळच्या आरमारी लढाईतील एका इंग्रज दर्यासारंगाचे मुख्य गलबत हिंदुस्थानात बांधलेले होते, एका हिंदी व्यापारी संधाने हे बांधून दिलेले होते.  औद्योगिक क्रांती होण्याच्या आधी इतर कोणत्याही देशाइतपत हिंदुस्थानही व्यापारी दृष्ट्या, औद्योगिक दृष्ट्या, आर्थिक दृष्ट्या पुढारलेला देश होता.  स्थिर आणि निर्वेध असा राज्यकारभार दीर्घकाल मिळाल्याशिवाय.  तसेच दळणवळणासाठी, व्यापारासाठी खुष्कीचे त्याचप्रमाणे दर्यावरचे मार्ग मोकळे असल्याशिवाय अशी वाढ करून घेता आली नसती.

   

पुढे जाण्यासाठी .......