शुक्रवार, मे 29, 2020
   
Text Size

पैलागडची रमी

“आई, हा गांधी आला आहे बघ.”

“कोण रे बाबा तू ?”

“मी सेवादलातला मुलगा. आम्ही खेड्यातून पाळीपाळीनं औषध वगैरे घेऊन हिंडायचं ठरवलं आहे. काय होतंय मुलीला ?”

“ताप, भारी ताप ! आणि डॉक्टर कोठून आणू ? आज पोराचे पैसे आले होते. म्हटलं की डॉक्टर आणीन सोनगावचा. परंतु पैसे मिळाले नाहीत.”

“का नाही मिळाले ?”

“सही करता येत नाही. साक्षीला माणूस भेटेना. गावात शाळा नाही. मास्तराची साक्ष घेई. हा नवा माणूस. पैसे येऊनही मिळाले नाहीत.”

“आई. मी डॉक्टर घेऊन येईन. बरी होईल मुलगी. परंतु तुम्ही सर्वांनी शिकलं पाहिजे.”

“कधी शिकायचं दादा ?”

“रात्री घटकाभर. मी येथे रात्रीची शाळा काढीन. तुम्ही याल ?”

“मी येईन, माझी पोरं येतील. आम्ही सारी शिकू. माझ्या पोराला मग मी कागद लिहीन. तोही मुंबईला शिकतो आहे. पैसे येऊन मिळाले नाहीत ! शिक्षण नाही म्हणजे सारं फुकट!”

रमेश दुसर्‍या दिवशी डॉक्टरांना घेऊन आला. औषध मिळू लागले. बाबी बरी झाली. रमेश त्या गावीच येऊन राहिला. लहानसा गाव. त्याने तेथे शाळा काढली. सायंकाळी मुलांना शिकवी. रात्री मोठ्यांना. एके दिवशी पुरुष मंडळी येत; एके दिवशी आय़ाबाया. बाबी आणि तिची आई सगळ्या बायकांना बोलवायच्या. गावात सेवादल आले; स्वच्छता आली; साक्षरता आली. छोटे उद्योग येऊ लागले. रमेशला सारे दुवा देत. सेवादलाला दुवा देत. परंतु रमेश म्हणायचाः “बाबीच्या आईला सारं श्रेय ! ती म्हातारी शिकायला उभी राहिली. तिच्यामुळं गाव तयार झाला. शिकल्यावाचून गती नाही, म्हातारीला पटलं. ज्ञान म्हणजे भगवान ! लिहिणंवाचणं हवं. नाही तर पदोपदी अडतं. लिहिता-वाचता येणं म्हणजे आजकाल मोठा आधार असतो.” असे म्हणून रमेश गाऊ लागे व मुलेही म्हणू लागत-

शिकू शिकू
शिकू शिकू
स्पर्धेमाजी आम्हि टिकू।।
जो न शिके
जो न शिके
आनंदा तो मूर्ख मुके।।
शिका शिका
शिका शिका़
संसारी मिळवाल सुखा।।

गाणी गात मुले नाचू लागत.

 

“पोरानं का चोरानं मला नाही माहीत.”

“तो पूर्वीचा टपालवाला मला ओळखी. तुम्ही नवीन आलात वाटतं !”

“तो गेला बदलून. सही करा.”

“मी कोठून सही करणार? आम्हांला का लिहिता येतं, दादा ?”

“आंगठा घ्या. इथं कोणाची तरी साक्ष हवी. कोणाला बोलवा.” रमीने शेजारी इकडे-तिकडे पाहिले. कोणी चिटपाखरु नाही.

“दादा, सारे कामाला गेलेले. कोणाला आणू ? द्या पैसे. माझेच आहेत. पोर तापानं फणफणली आहे. मोठ्या डॉक्टरला आणीन; त्याला देईन हे पैसे.”

“साक्षीशिवाय कसे देऊ? मी चाललो.’

“उद्या आणाल का भाऊ?”

“या खेड्यात दोनदा येतं टपाल आठवड्यातून. उद्या कसा मी येणार? आता चार दिशी. मी जातो. मला तुझंच एकटीच घर आहे का म्हाता-ये?”

तो टपालवाला निघून गेला. त्याला आणखी गावे घ्यायची असतील. रमी रडू लागली. पोराने पोटाला चिमटे घेऊन पैसे पाठवले. परंतु मिळत नाहीत ! आपले असून मिळत नाहीत. म्हणे सही कर, आम्हांला का लिहावाचायला येते ? असे मनात म्हणत ती पोरीजवळ जाऊन बसली.

तिसरा प्रहर झाला. तो कोण आला मुलगा ? त्याच्या भोवती ती पाहा लहान मुलांची गर्दी. कोणाला चित्रे देत आहे. कोणाला खाटीमिठी लिमलेटची वडी. तो एकाला म्हणाला-

“अरे तुझ्या हातांना ही खरुज आहे. थांब, हे मलम चोळतो. रोज हात धुवून ते लावीत जा.”

“माझे डोळे बघता का?”

“बघू? लाल झाले आहेत. पुढच्या वेळेस औषध आणीन हं.”

“त्या रमीकडे येता ? तिची मुलगी बाबी फार आजारी आहे.”

“दाखवा घर.”

रमेश रमीच्या घरी आला. मुलीजवळ माय बसली होती.

 

ती पाहा अंधारी खोली. कोण राहते त्या खोलीत ? कोण राहणार ? गरिबाशिवाय कोण राहणार ? रमी राहते तिथे. तिचा एक मुलगा तिकडे मुंबईला गिरणीत काम करतो. तो रमीला पैसे पाठवतो. परंतु त्या पाचदहा रुपयांवर थोडाच संसार चालणार ? घरात आणखी चार मुले आहेत. नवरा मरुन दोन वर्षे झाली. रमीवर सारा भार. वडील मुलगा मुंबईला गेला. फार मोठा का तो ? मोठा कुठला ? सतरा-अठरा वर्षांचा असेल. परंतु आईला म्हणालाः “जातो मी. तेवढंच एक तोंड पोसायला कमी होईल. या भावंडांना काही पाठवीन.” आणि तो खरेच पाठवी.

रमी मजुरी करी. शेतात जाई. खानदेशातील तो उन्हाळा. परंतु गरिबाला ना उन्हाळा; ना हिवाळा. थंडीत त्याने कु़डकुडावे, उन्हात त्याने करपावे. रमीची दहाबारा वर्षांची मुलगी. तीसुद्धा कामाला जात असे. गरिबाच्या मुलांना लवकर मिळवते व्हावे लागते.

घरी मुलांना भाकरतुकडा करुन ठेवून रमी कामाला जायची. ती असे कामात; परंतु लक्ष पोरांक़डे असायचे. एके दिवशी कामावरुन आली तो तिची मोठी मुलगी तापाने फणफणलेली; फाटकी घोंगडी पांघरुन पडून होती.

“बाबी काय गं होतं?” रमीने विचारले.

“ताप भरला आई. कामावरुन कशी तरी घरी आले. बस माझ्याजवळ.” ती म्हणाली.

आठ दिवस झाले. बाबीचा ताप हटेना. रमीला कामाला जाता येईना. घरात विष खायलाही दिडकी नाही. तिकडे वडील मुलाची नोकरीही सुटली होती. कोठून पाठविणार तो पैसे ? कसे दवापाणी करावे ? कोठून मोसंबे आणावे ? गरिबांची दैना आहे.

त्या भागाला पैलाड म्हणत. सारी गरिबांची वस्ती. सकाळी सातनंतर कोणी घरात नाही सापडायचे. लहान मुले, कुत्री ही असायची गावात. बाकी गेली सारी कामाला.

आज दुपारच्या वेळेला एकदम टपालवाला आला. “रमी- कोण आहे रमी?” म्हणत आला. रमी मुलीच्या डोक्यावर हात ठेवून बसली होती. डोळ्यातून पाणी घळघळत होते.

“मी रमी, भाऊ.” ती म्हणाली.

“किती शोधायचं. नीट पत्ता नाही. मनिऑर्डर आहे. पैसे आले आहेत.”

“पोरानं पाठवले, होय ना!”