बुधवार, सप्टेंबर 22, 2021
   
Text Size

लिलीची भेट

कोण चालला आहे तो मुशाफिर? काठीला अडकवलेले एक गाठोडे त्याच्या पाठीवर आहे. त्याची दाढी वाढलेली आहे. तो का पठाण आहे? तो जरा वाकलेला का दिसतो? वयाने का जरा वाकला? त्याचे डोळे पाहा. जरा पिंगट आहेत, नाही? परंतु त्यांत प्रेमळपणा आहे. आपल्याच तंद्रीत आहे. चालला आहे काही गुणगुणत.

संध्याकाळ होत आली. तो जरा झपझप जाऊ लागला; परंतु वाटेत अंधाराने त्याला गाठलेच. रात्र झाली. चांदणे नव्हते. आजूबाजूला झाडी होती. आमचा प्रवासी चालला होता. मधूनमधून शीळ घालीत होता. त्याला दूर दिवे दिसले. गावाजवळ आला. त्याला पाहिजे होता तोच गाव होता. ते दिवे दिसताच त्याच्याही डोळयांत जरा प्रकाश आला.

जवळ का ओढा वाहात होता? पाणी पडावे तसा आवाज येत होता. लहानसा का धबधबा होता तिथे? आमच्या प्रवाशाला तहान लागली होती. तो शीळ घालीत पाण्याच्या आवाजाच्या अनुरोधाने चालला. तो एकदम उभा राहिला. का बरे? काय त्याला दिसले?

'घाबरू नकोस मुली. मी भूत नाही. पिशाच्च नाही. मी माणूस आहे. वाटेचा वाटसरू आहे. तू रात्रीची एकटी कुठं जातेस? त्याने तेथे दिसलेल्या लहान मुलीला विचारले.'

'तुम्ही मारणार नाही मला? तुम्ही चोर नाही?' तिने विचारले.

'लहान मुलीला कोण मारील बेटा?'

 

पुढे जाण्यासाठी .......