शनिवार, जुन 06, 2020
   
Text Size

सासूसासर्‍यांची समाधी

परंतु शिरीषचा मित्र आहे, प्रेमानंद आहे. करुणा प्रेमानंदाकडे प्रसन्न वदनाने निघाली. दुःखी कष्टी करुणा आज इतकी आनंदी का ते लोकांस कळेना. स्त्री-पुरुष तिच्याकडे पाहात होते.

‘प्रेमानंद,’ करुणेने हाका मारल्या.

‘काय करुणे ?’

‘प्रेमानंद-, आनंदाची वार्ता. मी त्या दोन समाध्या बांधीत होते ना ? त्या अकस्मात रात्री पु-या झाल्या. मला रात्री तेथे झोप लागली, स्वप्नात भूमाता आली व म्हणाली, ‘रडू नको, नीज. माझे नागोबा व वाघोबा तुझे काम पुरे करतील.’ प्रेमानंद, खरेच पु-या झाल्या आहेत. सुंदर समाध्या. येता बघायला ? चला.’

प्रेमानंद निघाला. गावात सर्वत्र ही बातमी गेली. सारा गाव निघाला. स्त्री-पुरुष, लहान-थोर सर्व निघाले. जणू मोठा उत्सवच होता. सर्व मंडळी त्या ठिकाणी आली. त्या सुंदर समाध्या पाहून सर्वांनी हात जोडले. सर्वांनी त्या समाध्यांवर फुले उधळली.

‘धन्य आहे ही करुणा,’ असे सारे म्हणाले.

करुणेचे कौतुक करीत गाव माघारा गेला. करुणा एकटीच हळूहळू घरी आली. ती एकटी बसली होती. आया-बाया आल्या. तिच्याभोवती जमल्या. तिची स्तुती करु लागल्या. ज्याच्यावर देवाची कृपा होते त्याच्यावर जगाची होते.

 

पुढे जाण्यासाठी .......