शनिवार, मार्च 28, 2020
   
Text Size

*राजधानीत

‘मी माझ्या विचारात होतो. माझे लक्ष नव्हते. त्या हरवल्या वाटते ?’ त्याने विचारले.

‘इकडे ती पळत आली.’

‘उडी नाही ना घेतली नदीत ?’ त्याने गंभीरपणे म्हटले.

‘तुम्ही पाहा हो आमच्यासाठी,’ मैत्रिणी म्हणाल्या.

‘शोधतो हां.’

शिरीष मागे वळला. इकडे तिकडे खोटेच शोधू लागला आणि तो त्या झाडाजवळ आला. त्याने टाळ्या वाजवल्या. मैत्रिणी धावतच आल्या.

‘आहे का हो ?’

‘ह्याच का बघा.’

‘अहो हीच. हेमा, किती बाई शोधायचे तुला ? हे होते म्हणून सापडलीस.’

‘जातो मी.’

‘आभारी आहोत आम्ही.’

शिरीष निघून गेला. हेमा पुन्हा पळणार होती, परंतु मैत्रिणींनी तिला बळकट धरले.

‘धरता काय ? त्यांना काही द्यायला नको काय ? मी रस्ता चुकून घाबरुन उभी होत्ये. त्यांनी तुमची व माझी भेट करुन दिली. त्यांना काही द्यायला नको का ?’

 

पुढे जाण्यासाठी .......