शनिवार, जुन 06, 2020
   
Text Size

मधुरीची भेट

‘आज रात्री येशील? मग घरी परत जा. हळूच दार उघडून ये. दार उघडे राहील. येशील?’

‘भाऊ कामावरून दमून येतो. तो एकदा पडला म्हणजे मेल्यासारखा पडतो; परंतु आई म्हातारी व दमेकरीण. तिला सारखा खोकला येतो. तिला नीज लागत नाही. जरा दार वाजले तरी जाग येते. कसे यायचे?’

‘तुझ्या आईसाठी मी औषध देईन’

‘त्याने खोकला थांबेल? झोप लागेल?’

‘अगदी गाढ झोप.’

‘द्या तर ते औषध.’

‘उद्या सायंकाळी देईन.’

‘जाते हं मी. उद्या रात्री हं.’

मधुरी निघुन गेली. सैतान विकट हास्य करीत पुढे आला.

‘असा चावटपणा करशील तर बघ. हसायला काय झाले? प्रेम का उपहासाची वस्तू?’’ माधवाने रागाने विचारले.

‘प्रेम म्हणजे विलास, प्रेम म्हणजे क्षणिक भोग.’ सैतान म्हणाला.

 

पुढे जाण्यासाठी .......