बुधवार, डिसेंबर 02, 2020
   
Text Size

ती काळरात्र

‘पण काय? ऊठ.’

‘माझ्या हदयातील सदसद्विवेकबुध्दीचा पोलीस कसा दूर होणार? कोठे पाताळात गेल्ये तरी हे मनातील विंचू दंश करीत राहाणारच. नको आता जाणे नको. आता मरणेच श्रेयस्कर. पश्चाताप झाला आहे. मरणाने मी मुक्त होईन! प्रभू मला जवळ घेईल, मी तुमची तेथे वाट बघत बसेन. माझ्या पश्चातापाने तुम्हीही पवित्र होऊन याल. तेथे भेटू.’

‘मधूरी, ऊठ.’ तो तिची बकोटी धरून म्हणाला.

‘नको, खरेच नको.’ ती म्हणाली.

बहेरून सैतान हाका मारू लागला.’ लौकर या बाहेर. वेळ संपत आली. कोंबडा आरवेल. आटपा झटपट.’

‘चल, मधुरी ऊठ. वेळ नाही. ऊठ.’

‘नको, खरेच नको.’

‘लौकर या. वेळ भरत आली. चला झटपट नाही तर अडकाल.’

‘मधुरी!’

‘जा तुम्ही. मी वर वाट बघेन.’

‘चलो. वेळ झाली. चलो.’

‘मधुरी!’

‘स्वर्गात आता मधुरी भेटेल. तेथे सारे गोड होईल.’

‘चलो. कोंबडा आरवणार. एक क्षण. चलो.’

‘नही येत तर नाही. मर जा.’ असे म्हणून माधव झटपट बाहेर निघून गेला. पहारेकरी जागे झाले. चाराचे ठोके पडले. ‘आलबेल बराबर है.’ अशा गर्जना झाल्या.

‘काय माधव?’

‘चल, कोठे तरी लांब ने.’

सैतान हसला. माधव काही बोलला नाही.

 

पुढे जाण्यासाठी .......