मंगळवार, जुलै 23, 2019
   
Text Size

स्वर्गातील माळ

सखूने तीन केंळाची पाने मांडली. पानाभोवती तिने रांगोळी घातली. नंतर करंज्या, अनरसे, सांजोर्‍या, चकल्या, कडबोळी वगैंरे दिवाळीचे पदार्थ तिने वाढले. तिघी बहिणी खाऊ लागल्या. त्यांना खाताना पाहून सखूचे पोट भरून येत होते.

रुपी खाता खाता म्हणाली, 'पाऊस केव्हा थांबणार? आई केव्हा येणार?'

हिरी म्हणाली, 'थांबेल लवकरच. गावाबाहेरच्या देवळाजवळ बाबा थांबले असतील.'

माणकी म्हणाली, 'आईला, बाबांना देव सुखरूप आणो. भिजून गेली असतील. म्हणत असतील मनात की, पोरी भुकेल्या असतील. आपण तर बसलोसुद्वा चाऊमाऊ करायला.'

इतक्यात दारावर टकटक आवाज झाला. कोणी तरी आले. कोण आले?

रुपी म्हणाली, 'जा सखू, बाबा आले.'

हिरी म्हणाली, 'पावसातून आले. धाव सखू.'

म्हणाली, 'जरा खायचं थांबू या.'

सखू लगबगीने धावतच गेली. तिने दार उघडले. तो कोण होते तेथे? तेथे आईबाप नव्हते. गाडी नव्हती. मग कोणी मारली होती दारावर थाप? तेथे एक लहान मुलगा उभा होता. कंदिलाच्या अंधुक प्रकाशात त्याचे केविलवाणे तोंड दिसत होते.

'कोण रे तू बाळ?' सखूने मंजुळवाणीने विचारले.

 

पुढे जाण्यासाठी .......