गुरुवार, सप्टेंबर 23, 2021
   
Text Size

*कलिंगडाच्या साली

“तुम अजून खरे गांधीवादी नाहीं झाले.” एक शेटजी म्हणाले.

“युद्धाच्या काळांत ऑस्ट्रेलियन लोजिरांनीं मुंबईत चावटपणा सुरू केला तेव्हा महात्माजींनीं लिहिलें कीं हिंसाअहिंसेचा सवाल नाहीं. सतित्वाच रक्षण झालच पाहिजे! मला गांधीवाद तुम्ही नको शिकवायला.” ते आदिवासी सेवक म्हणाले.

“जाऊं द्या. ते आदिवासी गेले ना ? त्यांना शंभर रुपये पांच हजारांच्या जागी आहेत. उगीच आपला वाद कशाला ? आतां आपण निघू सारे.” अधिकारी म्हणाले.

नमस्कार झाले. सलाम झाले. साहेबजी, प्रकार झाले.

शुक्री संचित असे. तिच्या तोंडावर अलिकडे कधीं हसूं दिसत नसे. गरीब लोक दु:खे उगाळीत कधीं बसत नाहीत. एकप्रकारें संपूर्ण जीवन ते जगत असतात. दु:खीचा बाऊ करण्याची शिष्ट लोकांची पद्धत असते. गरीब दु:खांना महत्त्व देतील तर त्यांना जगताच येणार नाहीं. साधें फूल पाहून, एखादा सुन्दर पक्षी पाहून, एखादा मासा मिळाला, एखादा ताडीचा द्रोण मिळाला तर लगेच दु:खें विसरून तें हसतील, आनंदतील. मग शुक्री अशी कां बरें ? वास्तविक तिचा स्वभाव आनंदी. ती अजून झाडांवर चढे. फांद्यांवर झोंके घेई. ती रानफुलें आणी आणि केंसांत गुंफी. परंतु अलिकडे हा सारा खेळकरपणा पार लोपला. काय झालें ? तिच्या जीवनचंद्राला कोणतें ग्रहण लागलें होतें?

त्या दिवशी तिचा नवरा खुचींत होता. मंगळ्या शुक्रीकडे पाहून हंसे. त्याला आनंद झाला होता. परंतु शुक्रीचें मुख खिन्न नि उदासच होतें. त्याच्या आनंदाचें प्रतिबिंब तिच्या तोंडावर उठेना, उमटेना, कां बरें असें?

“अग, हंस कीं जरा ! मी हंसतो आहे आणि तुझं तोंड कां कोणी मेल्यावाणी ? तुला किती दिवसांत मारलें नाहीं म्हणून का राग ?  दोन तडाके देउं म्हणजे हंसशील ? बायकांचे सारे न्यारे. त्यांना हंसवायला जावं तर त्या रडतात. त्यांना रडवायला जावं तर त्या हंसतात. माझ्या हातच्या थपडा तुला गोड वाटतात. होयना ? बोल की सटवे!”

शुक्री कांही बोलली नाहीं. ती झोपडींतून उठून बाहेर गेली. शून्य मनानें ती कोठे तरी पाहात होती. मंगळ्या पाठोपाठ आला. एका झाडाखाली ती पाठमोरी बसली होती. त्यानें हळूच जाऊन तिचे डोळे धरले.

“हें काय ? रडतेस तूं ? झालं काय तुला ? अग, तुझं पोट मोठं पाहून मला मघांसारखं हसूं येत होतं. माझा आनंद मनांत मावत नव्हता ! शुक्रीला बाळ होणार म्हणून मी खुशींत होतों. अशी रडतेस कां ? तुला कां चिंता वाटते ? त्या पाद्याच्या इस्पितळांत तुला नेऊन ठेवूं कां ?  शुक्री, काळजी नको करूं या झाडाला बाळासाठी झोंका बांधू. त्याला आपण गाणीं गाऊं, नको रडूं.”

 

“अहो, दंड एक रुपया कीं हजार हा प्रश्न नाहीं. पुष्कळ वेळां श्रीमंतांना एक पै दंड केल्याची उदाहरणे आहेत. त्या पैनेंहीं त्यांची प्रतिष्ठा जाते. त्यांच्या कृत्यावर कांही पांघरून घालीत नाहीं आपण, काय धनजीशेट?” अधिकार्‍यांनी एटींत विचारलें.

“मी तो बिलकुल निरपराधी. पाप नाहीं केला. सो रुपये द्या म्हणतां देते. परंतु ती शुक्रीच चावट. जंगलांत मला म्हणायची, नवरा ठोकतो, ताडी पितो. तुम्ही सांभाळा. मी पीडा नको म्हटलें. तरी आली. तिला नेऊन सोडून दिलें. या लोकांना खरेंखोटें काहीं नाहीं. रानटी जात. !” धनजीशेट म्हणाले.

“जपून बोला.” बुधा म्हणाला.

“काय जपून बोला ?” धनजीशेट उसळून म्हणाला.

“रानटी आम्हीं नाहीं; तुम्ही आहांत. गरीबांच्या रक्तावर जगणारेंस, बायामाणसांची अब्रू घेणारे. तुम्हांला न्यायनीत नाहीं, दिल्या शब्दाची किंमत नाहीं, केलेल्या वायद्याची, कराराची कदर नाहीं. तुम्हीं रानटी. बंगल्यात राहाणारे, ब्रँडी पिणारे तुम्ही रानटी. आम्ही नाही रानटी. आम्ही देवाला भिऊन वागतो.” बुध्या बोलला.

“जाऊं द्या. झालें गेलें विसरा. मग मजुरीचा नवा दर ठरला ना? धनजीशेट, तुम्ही शंभर रुपये शुक्री किंवा मंगळ्या यांच्याकडे पाठवा. मंगळ्या वगैरे सारे सोडून देण्यांत येतील. संप थांबवा. शान्ति राखा.” अधिकारी म्हणाले.

आदिवासी गेले. बडी मंडळी बसली होती. खादीचा कार्यक्रम होता. चहा, फळफळावळ, बिस्किटें, चिवडा, सारें होते.

“न्याय शेवटीं वर्गदूषितच असतो,” आदिवासी सेवक म्हणाले.

“तुम्हीसुद्धा वर्गयुद्धाची भाषां बोलू लागलांत ? आश्चर्य.” अधिकारी म्हणाले.

“धनजीशेटनीं स्त्रीवर अत्याचार केला. तुम्ही त्यांना शंभर रुपये दंड करतां. गरिबांच्या बायकांची तुमच्या न्यायदेवतेसमोर हीच का किंमत? सर्वत्र हाच प्रकार. अमेरिकेंत एखाद्या नीग्रोनें गोर्‍या स्त्रीला हात लावला तर त्याला जिवंत जाळतात. परंतु नीग्रो स्त्रियांवर गोर्‍यांनीं अत्याचार केलें तर ? त्यांना होईल का फाशीची शिक्षा? निदान तुरुंगात ५।१० वर्षें तरी पाठवतील का? ज्यांच्या हातांत पैसा, त्याच्यासाठी न्याय असतो. कायद्यासमोर सारें समान, हें झूट आहे. श्रीमंत पुन्हा वकीलबॅरिस्टर देईल. वाटेल ते सिद्ध करील. गरिबाला कायद्याचा सल्ला द्यायलाही कोणी नसतें. हें सारें फोल आहे.” ते सेवक म्हणाले.

 

आणि शुक्री कुठें होती ? एके दिवशीं धनजीभाईनें तिला पकडून आणलें. त्याच्या कोंडवाड्यांत ती गाय सांपडली. लांडग्याच्या तावडींत हरिणी सांपडली.

“तूं माझ्याकडे राहा. तो मंगळ्या तुला मारी, ताडी पिई. तूं इथें राहा. तूं माझी राणी तुला कांहीं कमी नाहीं पडणार, पोटभर खायला, सुंदर पातळ, गुलाबाचीं फुलें. राहा येथें शुक्री. “असें तो म्हणाला. तिनें त्याच्या हाताला कडकडून डांस घेतला. धनजी ओरडला. परंतु तो उंची दारू प्यायला होता. त्याच्या पशुतेंत तिच्या सतित्वाचा बळी घेतला.

दिवस जात होते. दंगल वाढणार असें वाटूं लागलें. सरकारनें मध्यस्थी करावी, असें कोणी म्हणूं लागले.

त्या दिवशीं एक सभा होती. सरकारी अधिकारी, जमिनदार, व्यापारी, यांचे पुढारी, आदिवासींचे पुढारी, सारे एकत्र जमले होते. काहीं उदार वृत्तीचे सज्जनहि होते. आदिवासी मंडळीत निरपेक्षपणें सेवा करणारेहि कांहीं होते. बोलणीं सुरू झालीं. मजुरीचा दर काय असावा, याविषयीं चर्चा झाली. तो प्रश्न सुटला.

“आमच्या मायबहिनींची अब्रूहि यांनी घेतली आहे, त्याचें काय? म्हातार्‍या बुध्यानें विचारलें.
“पुरावा आहे का?” सरकारी अधिकारी म्हणाले.
“पोर झाल्यावर पुरावा.” एक आदिवासी गंभीरपणें दु:खसंतापानें बोलला.

“या धनजीशेटनें पाप केलें कीं नाहीं विचारा. मंगळ्याची शुक्री याच्या पठाणानें पळवून नेली आणि एके दिवशीं रानांत तिला त्यांनी सोडलें. ती रडत होती. जीव देऊं पहात होती. मंगळ्या तुरुगांत. असे हें इंग्रजी राज्य. आमची अब्रू सुरक्षित नाहीं. आम्हीं का जनावरें ?” म्हातारा बुध्या बोलत होता.

“मग आतां म्हणणें काय?” एक जमीनदार म्हणाला.
“न्याय हवा.” बुध्या म्हणाला.
“शुक्रीला शंभर रुपये दंडाचे म्हणून धनजीशेटनें द्यावे.” अधिकारी म्हणाले.

“एखाद्या आदिवासीनें जमीनदाराची बायको पळवली असती तिला भ्रष्ट केलें असतें, तर त्या जमीनदाराच्या बायकोला शंभर रुपये दंड म्हणून आदिवासीनें द्यावे असें तुम्हीं म्हटले असतें का?  त्या आदिवासीला तुम्ही पांचसात वर्षांची शिक्षा दिली असती. आदिवासी भगिनींची अब्रू म्हणजे का चार दिडक्या?” एक आदिवासी सेवक म्हणाला.

   

मंगळ्यानें धांवून धनजीशेटच्या थोबाडींत मारली. बाकीचे घाबरले. त्यांनीं मंगळ्याला आंवरले, शुक्री धांवून आली ती संतापून म्हणाली, “कां त्यांना आवरतां? त्या पापी चांडाळाचे डोळे फोडूं दे त्यांना. सोडा त्यांना हा शेट म्हणजे मांग आहे मांग.”

इतक्यांत शिट्या आल्या. पोलिस बंदूक घेऊन येत होते. लाला होता. आदिवासी पळाले. पोलिस का गोळीबार करणार ? का पकडणार ? सारे आपापल्या झोंपड्यांत जाऊन बसले. धनजी पोलिसांना सामोरा गेला. त्यांना तो तिखटमीठ लावून हकीगत सांगत होता, त्यांना घेऊन तो आदिवासींच्या हंगामी झोपड्यांकडे आला.

“आधी याला पकडा, हा माझा खून करणार होता. बायकोलाहि हाच मारतो. हाच मुख्य आहे. हाच आग लावणारा.” धनजी मंगळ्याकडे बोटें करून म्हणाला. पोलिसांनीं त्याला हातकड्या घातल्या.

“मलाहि पकडा. मी कशी राहूं ?”
“तूं माझ्या बंगल्यावर काम कर. घाबरूं नको.” धनजी म्हणाला.
“शेण पडो तुझ्या तोंडांत !” ती म्हणाली.
“गप्प” एक पोलिस म्हणाला.
“तुम्हांला येथें काम करायचें कीं नाहीं ? अधिकार्‍यानें विचारलें.
“ठरल्याप्रमाणें आधी मजुरी द्या.”
“ते देतील ती मजुरी घ्या.”
“आम्ही घेणार नाहीं.”
“मग चालते व्हा येथून.”
“हे चाललों. याद राखा मात्र.”
“इंग्रजांचे राज्य आहे अजून. आग विझवूं आम्हीं.”

ते आदिवासी गेले. पोलिसांनीं दोघाचौघांना पकडलें. मडकीं, गाडगीं घेऊन ते आदिवासी निघाले आणि गांवोगांव बातमी गेलीं. सर्वत्र संप सुरू झाला. गवताला कोणी हात लावीना. कापलेलें बांधीना. पाऊस पडला तर आधींच कमी असलेलें गवतहि नाहींसें होईल. कापून बांधलेलें गवत घेण्यासाठीं बैलगाड्याहि मिळेनात. कांहीं ठिकाणी आगी लागल्याच्याहि बातम्या आल्या.

जमीनदार. गवताचे व्यापारी, हेहि स्वस्थ बसले नव्हते. पठाणांना हाताशीं धरून पोलिसांना हाताशीं धरून एकदम एखाद्या गावीं ते जात. तुला पैसे दिले होते, कामाला येतोस कीं नेऊं पकडून अशा धमक्या येत. पोलिस, पठाण मारहाण करीत.

 

“ठीक. पोलिस आ जाय तो अच्छा होगा. मैं जल्द जाऊं और पोलिस लेकर आऊं. आप सो जाईये. फिकीर नहीं करना शेटजी. लाला जिन्दा है तो सब ठीक है.”

शेटजी पलंगावर पडले. लाला तंबूबाहेरच्या खाटेवर पडला. मोठ्या पहांटे उठून तो जवळच्या पोलिसठाण्याकडे जायला निघाला. आतां उजाडलें. आदिवासी उठले. परंतु कामाला जायचें लक्षण दिसेना. आठ वाजले तरी तेथेंच होते. धनजीशेट आले. ते म्हणाले,

“काम नहीं करते ? मस्ती आली ?”

“शेट, शिवी देऊं नका. कबूल केल्याप्रमाणें आमची मजुरी आधीं चुकती करा. मग कामाचे बघूं.”
“कामांत कसूर नि ठरलेली मजुरी मागते ?”

“मजुरी द्या.”

“आधीं कामावर जा.”

“आधीं मजुरी. तेवढी मजुरी तुम्हांला परवडत नसेल, तर आम्हीं येथून जातों. परंतु झालेल्या कामाची मजुरी चुकती करा. नाहींतर सार्‍या जिल्ह्यांत संप पसरेल. तुमचेंच नाहीं, तर कोणाचेंच गवत कापलें जाणार नाहीं. बसा बोंबा मारीत.”

“आणि साले तुम्हीं खाल काय ?”

“त्याची तुम्हांला नको काळजी.”

तिकडे शुक्री उभी होती. रानांतील फुलें तिनें केंसांत घातली होतीं. काळीसांवळी तेजस्वी शुक्री. धनजीशेट तिच्याकडे पाहात होता.

“ती शुक्री तुझी बायको ना रे ?  ती बघ जणुं मुंबईवाली झाली आहे गवत कापणारी ; परंतु ऐट बघा तिची. केंसांत फुलें –” धनजीशेट बोलले.

“मग का तुमच्या बायकांनींच फुलांनीं सजावें ?” मंगळ्या म्हणाला.”

“साला आमच्या बायकांचें नांव काढतो ? याद राख दांत पाडीन. मस्ती लई आली तुला होय? तुरुंगात घालीन. तूंच म्होरक्या आहेस. ताडी पितोस, शुक्रीला मारतोस म्हणे. अधिक मजुरी हवी. तुझ्यासारख्या कुत्र्याला शुक्रीची काय किंमत ? ती बंगल्यांत हवी. तिला गुलाब मिळतील. मस्त राहील.”

   

पुढे जाण्यासाठी .......