शुक्रवार, मे 29, 2020
   
Text Size

भारत-चित्रकला-धाम

रंगा तिच्या मांडीवर डोकें ठेवून पडून राहिला. दोघें परम सुखसागरांत डुंबत होतीं.

''नयना, मी देवाघरीं गेलों तर भारतचित्रकलाधाम तूं चालव.''

''परंतु तूं बरा होशील. मी तुला घेऊन जाईन.''
''कोठें नेशील मला ?''

''जेथें बरा होशील तेथें.''
''देवाघरीं बरा होईन.''

''तेथें नेईन तुला.''

''वेडी हो तूं.''
''कलावान् सारे वेडेच असतात. तूं नाहीं वेडा ?''

''नयना,  माझी चित्रें पाठव. युध्द थांबेल. भारत स्वतंत्र होईल. जागतिक प्रदर्शन भरेल. स्वतंत्र भारतांतील चित्रांचा जयजयकार होईल. मला विश्वास वाटतो. मी नसतों तरी तूं असशील. आणि भारतमाता तर अनाद्यनन्त आहेच. तिचा महिमा वाढावा. तिची कीर्ति वाढावी, म्हणून तर हीं शरीरें, या कला, ही बुध्दि, खरें ना ?

 

पुढे जाण्यासाठी .......