शनिवार, जुलै 11, 2020
   
Text Size

तीन मुले

‘मला येत नाही. तुला का येईल?  मंगा म्हणाला.
‘हो, येईल.’ तो म्हणाला.
‘दे बांधून.’ माधुरी म्हणाली.
‘आपण दोघे मिळून बांधू.’ मंगा त्या मुलाला म्हणाला.
‘चालेल.’ तो म्हणाला.
‘पण तुझे नाव काय.’ मधुरीने विचारिले.
‘बुधा.’ तो म्हणाला.
‘माझे नाव मधुरी.’ ती म्हणाली.
‘माझे नाव मंगा.’ मंगाने सांगितले.
‘ये मंगा, किल्ला बांधू.’ बुधा उत्साहाने म्हणाला.

‘दोघें मिळून माझ्यासाठी किल्ला बांधा.’ मधुरी म्हणाली.
‘तू जणू किल्ल्याची राणी. मंगा म्हणाला.
‘आणि आपण?’ बुधान विचारले.
‘आपण राणीचे चाकर, रडवणा-या राणीचे नोकर.’ मंगा म्हणाला.
‘आता बोलू नका. बांधा लौकर किल्ला.’ मधुरीने सांगितले.
आणि फारच सुंदर किल्ला त्यांनी बांधला. त्या किल्ल्याकडे तिघं पहात होती. परंतु एकदम किल्ला ढासळला!  पडला!  तिघांना वाईट वाटले.

‘वाळूचे किल्ले टिकत नाहीत.’ बुधा बोलला.
‘आपण रोज नवीन बांधू.’ मंगा म्हणाला.
‘रोज नवा खेळ’ मधुरी म्हणाली.
‘मी रोज तुमच्यात खेळायला येत जाईन.’ बुधा म्हणाला.
‘ये.’ मधुरी म्हणाली.
‘तुझे मित्र नाहीत का?’ मंगाने विचारले.
‘मला कोणी नाही मित्र. मी एकटाच येतो किना-यावर.’ बुधाने सांगितले.
‘तुझे घर कोठे आहे?’ मधुरीने विचारले.
‘तिकडे लांब आहे: मोठे तीन मजली घर.’ बुधा म्हणाली.

 

पुढे जाण्यासाठी .......

तीन मुले