मंगळवार, आँगस्ट 04, 2020
   
Text Size

प्रवेश बारावा

प्रवेश बारावा

(बालवीर शिक्षक)

बा. शि. -  आतां लक्ष्मीधरपंतांकडे जाऊन त्यांना सांगितलं पाहिजे. कारण नारायणाची प्रकृति जास्तच बिघडत आहे. लक्ष्मीधरपंतांकडे जाण्यास मन मात्र जरा कचरतें. त्यांनीं जरी माझा पूर्वी अपमान केला असला, तरी त्यांच्याकडे जाणं हें माझं कर्तव्यच आहे. मानापमान कांहीं वेळ बाजूस ठेवून, वैयत्किक भांडणें दूर करून सत्संमत व सदसद्विवेकबुध्दीस आवडणा-या गोष्टी करण्यास सदैव सज्ज असणं, हें तर या बालवीर चळवळीचं आध्यात्मिक रूप आहे. लक्ष्मीधरपंत तरी मनुष्यच आहेत. त्यांच्या ह्रदयांतील कोमल भावना जागृत झाल्याशिवाय राहणार नाहींत. सात्विक आशा मात्र ठेवावी. चला.