शुक्रवार, जुलै 03, 2020
   
Text Size

संध्या

“बघूं दे. सांग त्याला, कीं दिली होती विश्वासला; इतका भित्रेपणा काय कामाचा ?”
विश्वास हरिणीची सायकल घेऊन निघाला. हरिणी वरून पाहात होती व विश्वासनेंहि वर पाहिलें.

“नाहीं हो नेत, हरणे.” तो खालून म्हणाला.

“ने आतां विश्वास, ने हो.” ती वरून म्हणाली.

परंतु सायकल न घेतांच विश्वास निघाला. तो दरवाजापर्यंत गेला आणि पुन्हा परत आला. शेवटीं सायकल त्यानें घेतली व गेला एकदांचा.

हरिणी संध्येजवळ बसली होती. संध्या थकली होती. टांग्यांतून जरी ती गेली होती, तरी ती हालचाल तिला सहन झाली नाहीं.

“हरणे, माझं जरा अंग हळूहळू चेपतेंस ?” तिनें विचारलें.

“चेपतें हो, संध्ये.” हरिणी म्हणाली.

“परंतु संध्ये, आधीं इन्जेक्शन् घेतेस ना ?” कल्याणनें विचारलें.

“संध्याकाळीं घेईन.” ती म्हणाली.

“हरणे, सायंकाळी येशील ?” कल्याणनें विचारलें.

“येईन.” तिनें उत्तर दिलें.

संध्येचें अंग हरिणी हलक्या हातांनीं चेपीत होती. तोंडानें गाणें गुणगुणत होती. ती आनंदात होती.

“हरणे ! तुझ्या परीक्षेचा निकाल कधीं ? संध्येनें विचारलें.

“परवा ! “ती म्हणाली.

“तुला काळजी नाहीं ना पास होण्याची ?”

“संध्ये, मला आंतून निकाल कळला आहे.”

“पास झालीस ना ?”

“हो. परंतु वर्तमानपत्रांत येईल तेव्हां खरं. शाळेंत नांव लागेल तेव्हां खरं. संध्ये, तूं बोलूं नको हो कुणाजवळ.”

“पुरे हो, हरणे. जा आतां तूं घरीं. संध्याकाळीं ये इन्जेक्शन् द्यायला.”

हरिणी गेली. दुपारीं बाळ आपल्या आईला घेऊन आला होता. ती अनुभवी प्रेमळ वृध्द माता संध्येजवळ बसली. तिच्या
केसांवरून तिनें हात फिरविला.

“संध्ये, घाबरूं नकोस, सारं नीट होईल.” ती धीर देत म्हणाली.

“आई, हे भाईजी हो.” बाळनें ओळख करून दिली.

“तुमचं एक व्याख्यान मीं ऐकलं आहे.” बाळची आई म्हणाली.

“कधीं बरं ?” भाईजींनीं आश्चर्यानें विचारलें.

“गीतेवर होतं. मला आवडलं होतं. तुम्हांला स्वयंपाक चांगला येतो असं बाळ सांगत होता.” ती माता म्हणाली.

“लहानपणीं आईनं शिकवला होता. ती विद्या कामाला येत आहे.” भाईजी म्हणाले.

बाळ व त्याची आई निघून गेली.


 

१७

करुण प्रसंग

ताराचंद रामनाथ दवाखान्यांत संध्येच्या बाळंतपणाची सोय करून ठेवण्यांत आली होती. संध्येची आई तिकडे हिंवतापानें आजारी होती. माहेरीं तरी कोण करणार बाळंतपण ? शिवाय खेडेगांवांत डॉक्टर वगैरे लागलाच तर एकदम कोठून मिळणार ? हें पहिलें बाळंतपण; शिवाय संध्या कल्याणच्या जवळ राहूं इच्छित होती. त्याला सोडून कोठेंहि जावयास ती तयार नव्हती. म्हणून पुण्यालाच व्यवस्था करून ठेवण्यांत आली होती.

एके दिवशीं कल्याण संध्येला घेऊन त्या दवाखान्यांत गेला. संध्येची प्रकृति वगैरे पाहण्यांत आली.

“अद्याप कांहीं दिवस जातील.” मुख्य सूतिका म्हणाली.

“इंजेक्शन्स वगैरे कांहीं द्यायला हवींत का ?” कल्याणनें विचारलें.

“दिलीं तर बरं; अंगांत रक्त जरा कमी आहे. कांहीं इंजेक्शन्स द्यावीं. मी नांवं लिहून देतें. तीं इंजेक्शन्स द्या.” ती सूतिका म्हणाली.

कल्याण व संध्या टांग्यांत बसून निघालीं. वाटेंत कल्याणनें तीं इंजेक्शन्स विकत घेतलीं.

“उगीच खर्च.” संध्या म्हणाली.

“या वेळीं नाहीं करायचा, तर केव्हां ?” तो म्हणाला.

“कोण देईल इंजेक्शन् ?” तिनें विचारलें.

“हरणी देईल. तिचा हात हलका आहे.”

“तिला येतं देतां ?”

“हो; ती आपल्या आजीला नेहमीं देत असे.”

“हरणीला भय नाहीं वाटत ?”

“भय कसचं ? धरायचा हात व सुई हळूच टोंचायची.”

“माझ्यानं नाहीं होणार हो असलं काम ! “

“तूं इन्जेक्शन् देणार नाहींस, परंतु घेशील ना ?”

“हवीं घ्यायला म्हणतोस, तर घेईन.”

टांगा घराजवळ थांबला. संध्या हळूहळू जिना चढत होती. एके ठिकाणीं ती बसली. थोडया वेळानें पुन्हां उठून वर आली. ती अंथरुणावर पडून राहिली.

विश्वासनें हरिणीची आज बरीच वाट पाहिली. शेवटीं तो बोलवायला निघाला. इतक्यांत दारांत हरिणी उभी.

“कुठं निघालास, विश्वास ?”

“तुलाच बोलवायला येत होतों. तूं आलीस. एक काम झालं. परंतु दुसरं एक काम आहे. हरणे, तुझी सायकल घेऊन मी जातों
हं. लौकरच येईन.”

“माझी नको सायकल नेऊं. माझ्यां दादानं ती पाहिली, तर तो मला बोलेल. नको नेऊं हं, विश्वास.”

“दादा का रस्त्यांतून सर्वांच्या सायकली बघत जातो ?”

“परंतु तुझी बघेल.”

 

“पुणं आणि ढेंकूण नसणं अशक्य गोष्टी आहेत. पुण्याला काल बांधलेलं जरी घर घेतलंत, तरी तिथं ढेंकूण असतील. पुण्यांतील मुलांना जन्मतांच ज्याप्रमाणं राजकारण मिळतं, त्याप्रमाणं पुण्यांतील घरंहि जन्मतांच ढेंकूण घेऊन येत असतात. पुणं कशासाठीं प्रसिध्द, तर ढेंकणासाठीं असे भूगोलांत कां देत नाहींत, कुणाला ठाऊक ?” विश्वास म्हणाला.

“ढेंकणांना पुण्यांतील लोक फार आवडतात. ढेंकणासारखाच त्यांचाहि स्वभाव आहे. सर्वांना ते चिमटे घेतील. पुन्हां गनिमी काव्यांत तरबेज, ढेंकूण का पटकन सांपडतो ? बचावासाठीं तो वाटेल तिथं घुसेल.” कल्याण म्हणाला.

“कल्याण, पुण्याला नांवं नको हो ठेवूं.” विश्वास म्हणाला.

“न्यायमूर्ति रानडयांना पुण्याची आठवण येऊन रडूं येत असे; पुण्याशिवाय त्यांना चैन पडत नसे. पुण्याला कोण नांव ठेवील ? पुण्याला पूर्वींच्या पुण्यस्मृति आहेतच, परंतु हल्लींच्याहि आहेत. लोकमान्य पुण्याचे, नामदार गोखले पुण्याचे, न्यायमूर्ति पुण्याचे, कर्मवीर कर्वे पुण्याचे, पहिले रँग्लर पुण्याचे; महात्मा ज्योतिबांची पुणं हीच कर्मभूमि, आणि थोर अण्णासाहेब शिंदे यांची हीच कर्मभूमि. निबंधमाला इथूनच निघे. केसरी इथूनच गर्जे. इथंच इतिहास संशोधकमंडळ; इथंच मोठमोठया शिक्षणसंस्था; इथंच स्त्रियांत स्वावलंबन व स्वाभिमान उत्पन्न करणारं थोर सेवासदन; पुण्याला प्रणाम करावा.” भाईजी म्हणाले.

“भाईजी, पुण्याचं जागतिक आंवळेल तेल राहिलं ना ?” विश्वास म्हणाला.

“भाईजींची यादी संपते कीं नाहीं म्हटलं ! “संध्या म्हणाली.

“परंतु या यादींत आपलं घर घालायचं राहिलं.” कल्याण म्हणाला.

“आपलं घर कुठं घ्यायचं तें कुठं अद्याप ठरलं आहे ?” विश्वास म्हणाला.

“तें आपण हरणीला विचारूं. ती सर्वत्र हिंडते. ती आतां मॅट्रिक होईल. तिला नोकरी मिळेल. तिच्या शब्दाला अधिक किंमत दिली पाहिजे. सारे प्रश्न आर्थिक असतात.” संध्या हंसून म्हणाली.

“संध्ये, खरंच मिळणार आहे हरणीला नोकरी. तिचे पेपर्स चांगले गेले आहेत. ती पास तर होणारच. निकाल लागला कीं दुस-या दिवशीं नोकरी. चाळीस तरी देतील ?” विश्वास म्हणाला.

“आशेचे खेळ, कल्पनांचे खेळ ! “संध्या म्हणाली.

“घर बांधायच्या आधीं संध्ये, प्लॅन करावा लागतो, नकाशा करावा लागतो. प्रत्यक्षाच्या आधीं मानसिक क्रिया असते. आधीं कल्पना, मग प्रत्यक्ष सर्जन, प्रत्यक्ष निर्मिति.” विश्वास म्हणाला.

“मींहि तेंच सांगितलं. मीं कानडींत सांगितलं वाटतं ? सर्जन, निर्मिति शब्द घातलेस म्हणजे कांहीं नवीन सांगितलंस असं नाहीं होत, विश्वास. आशेचे सारे खेळ.”

“मनुष्यप्राणी सुधारेल या आशेवरच ईश्वराचाहि विश्वखेळ चालला आहे. आशेनंच तो फुलं फुलवीत आहे, मुलं वाढवीत आहे.” भाईजी म्हणाले.

   

“भाईजी, आमची सारी फजिती.” विश्वास म्हणाला.

“काय झालं, विश्वास ?” संध्येनें प्रश्न केला.

“ती सव्वाशें रुपयांची ऑर्डर देणारा तो तरुण निघून गेला घरीं.” विश्वास हंसून म्हणाला.

“आणि ऍडव्हान्स ?” संध्येनें विचारलें.

“कसला ऍडव्हान्स ? अग, तो गप्पाडया होता. त्यानं केली आमची थट्टा. तेव्हांच जरा वाटलं कीं, एवढं कापड याला कशाला ?

परंतु वाटलं, हवं असेल. आम्ही आशाळभूत होतों. परंतु चांगलीच फजिती झाली.” कल्याण म्हणाला.

“विश्वास, तुझा पायगुण असा कसा ?” भाईजींनीं विचारलें.

“परंतु कालपासून आजपर्यंत चोवीस तास त्या आनंदांत तर होतों कीं नाहीं ? मोठया ऑर्डरीचा आनंद उपभोगला. पुष्कळ झाला. विश्वास, वाईट नको रे वाटून घेऊं.” संध्या हंसून म्हणाली.

“रंगाचं म्हणणं एकंदरींत खरं ठरलं.” कल्याण म्हणाला.

“कल्याण, उद्यां कुठं जायचं हिंडायला ? कांहीं तरी ऑर्डरी मिळवायला हव्यातच. थोडे पैसे हवेत. हल्लीं आपण भाईजींचे पैसे संपवून राहिलों आहोंत.” विश्वास म्हणाला.

“माझे पैसे म्हणजे तुमचेच, त्याला संकोच कशाला ?” भाईजी म्हणाले.

“कोण करतो संकोच ? नीट जेवत आहोंत. तुम्हांला राबवीत आहोंत. तुम्ही का मागच्या जन्मींचे आमचे देणेकरी आहांत ?” विश्वासनें विचारलें.

“मागचा जन्म तूं मानतोस, विश्वास ?” संध्येनें विचारलें.

“संध्ये, तूं अगदीं मला शब्दांत पकडायला तयारच असतेस.” विश्वास चिडून म्हणाला.

“चिडला, विश्वास चिडला ! “संध्या टाळया वाजवून म्हणाली.

“कल्याण, आपण हें घर बदलायचं ना ?” भाईजींनीं विचारलें.

“काय घाई आहे ?” कल्याण म्हणाला.

“परंतु मालक घाबरला आहे.” संध्या म्हणाली.

“कल्याण, आपण आतां जागा पाहूं ती चांगली पाहूं. जरा मोठी. चार खोल्या तरी हव्यात. एका खोलींत संध्येची खाट, पाळणा.
एका खोलींत स्वयंपाक. छान पाहूं जागा.” विश्वास म्हणाला.

आपण पुढं सारीं एकत्र राहणार. हरणीहि राहायला येणार. अशा सा-या बेतानंच जागा घेऊं. म्हणजे पुन्हां पुन्हां बदलायला नको. आणि दुसरी गोष्ट म्हणजे उजेड हवा.” कल्याण म्हणाला.

“परंतु भाडं बरंच पडेल; तें कुठून द्यायचं ?” भाईजी म्हणाले.

“भाईजींना उगीच काळजी. रंगाला सहा रुपये मिळतात. कल्याण व विश्वास यांना रोज सव्वाशें दीडशेंच्या ऑर्डरी, म्हणजे रोज दहा रुपये कमिशन पडलं. पैशाची काय चिंता ? कल्याण, चांगला बंगलाच घ्या हवेशीर.” संध्या हंसून म्हणाली.

“संध्ये, थट्टा करतेस आमची, होय ना ?” विश्वास म्हणाला.

“अरे गंमत, आशेवर जगावं, कल्पनेंत रंगावं. मी तरी हल्लीं आशेवर जगायला शिकत आहें. स्वप्नसृष्टींत रमायला शिकत आहें. स्वप्नसृष्टींत ना अडचण, ना आडकाठी. खरं ना भाईजी ?” संध्या म्हणाली.

“सारं जगच आशेवर चाललं आहे. क्रान्तिकारक आज उपासमारी काढतात, हालअपेष्टा काढतात, त्या तरी आशेच्याच जोरावर. भविष्यकालीन भव्य दर्शन त्यांना शक्ति देत असतं. पुढं जी सुंदर, वर्गहीन, अविरोधी समाजरचना त्यांच्या डोळयांसमोर दिसते. तीमुळं ते सारे कष्ट सहन करतात. आशा म्हणजे अमृत; आशा म्हणजे जीवनाचं जीवन.” भाईजी म्हणाले.

“संध्ये, कोणत्या बाजूला जागा घ्यायची ?” कल्याणनें विचारलें.

“तिकडे पर्वतीच्या बाजूला.” ती म्हणाली.

“तिकडे मलेरिया आहे. डांस आहेत. “विश्वास म्हणाला.

“परंतु ढेंकूण नाहींत ना ?” भाईजींनीं विचारलें.

 

“त्याचं काय करणार आहें, सांगा.”

“काय बरं ?”

“लहान आंगडीं-टोपडीं नकोत का करून ठेवायला ? आधींपासून तयारी हवी, भाईजी. देवाच्या पूजेची आधींपासून तयारी लागते.”

“लहान मूल म्हणजे देवच. देवाची ती आशा. देवाघरचं तें खुशालीचं, आनंदाचं, आशेचं, आशीर्वादाचं पत्र नाहीं का ?”

“भाईजी, तुम्ही चिमण्या करा हां व बाळाच्या पाळण्यावर टांगून तें “हंस रे माझ्या मुला” गाणं म्हणा हां. त्या गाण्यांत चिमण्यासुध्दां आहेत. नाहीं ?”

“हो आहेत.

“चिमणी येऊन
नाचून बागडून

काय म्हणे मला

चिंवचिंव करीन
चिंता हरीन

हंस रे माझ्या मुला”

असे आहेत ते चरण. म्हणेन तुझ्या बाळाला. लहानपणापासून बाळाला हंसण्याचा मंत्र शिकूं दे. सृष्टीचं मंगल स्वरूप त्याला दिसूं दे. संध्ये, स्पेन देशांत यादवी चालली. होती, तेव्हां मुलांच्या दृष्टीला भीषण दृश्यं पडूं नयेत म्हणून तिथं किती जपत. जमिनीखालीं तळघरांतून तीं मुलं आनंदांत राहात. तिथं गाणं, बोलपट, खेळ सारं असे. आणि वर बाँब पडून लोक मरत होते ! वरती मरण व खालीं भूमातेच्या हृदयाजवळ त्या तळघरांतून मानवजातीचं भविष्यकालीन हृदय नाचत असे. त्या मुलांचं मनोरम जीवन त्या तळघरांतून चालू असे. मुलांच्या डोळयांसमोर मांगल्य ठेवा; फुलं, फुलपांखरं ठेवा. संध्ये, ही बघ झाली नाही छान चिमणी ? तिच्या चोचींत दिले आहेत हे दोन लाल चिमणे धागे. जण्ूं कांहीं तरी नेत आहे ! पिलांसाठीं घरटं बांधायला धागेदोरे नेत आहे. नाहीं ?”

“भाईजी, कसलं हें काम करायला मीं तुम्हांला लावलं ?”

“संध्ये, हें का कमी प्रतीचं काम ? लहान मुलांचीं खेळणीं निर्माण करणारा मनुष्य मला देवाचा सहकारी वाटतो. ईश्वर ज्याप्रमाणं या सर्व मानवी लेकरांसाठीं फुलं, पांखरं, झाडंमाडं, चंद्र, तारे, नाना रंग, आकाशांतील शोभा अशीं अनंत खेळणीं निर्माण करतो, त्याप्रमाणं आपणहि आपल्या लहान मुलांसाठीं हीं खेळणी करतों. संध्ये, देव आपणांस आशीर्वाद देत असेल. तुझ्या-माझ्या बोटांत त्याची कला येऊन बसली असेल.”
संध्येनें लहानसें टोपडें शिवलें.

“भाईजी, बघा; हें लहान होईल ना हो ?”

“जरा वाढत्या अंगाचंच संध्ये, शिवून ठेव. मोठं झालं तरी चालेल; परंतु फार लहान होऊन घांलतां नाहीं आलं, तर फजिती ! “

अशा आनंदांत वेळ जात होता. आशेचे खेळ चालले होते.

इतक्यांत जिन्यांत पावलें वाजलीं.

“भाईजी, पटकन् ट्रंकेंत भरा सारं.” संध्या म्हणाली.

घाईघाईनें सा-या चिंध्या ट्रंकेंत भरण्यांत आल्या. आणि विश्वास व कल्याण आले.

“काय कल्याण, लौकरसे आलेत ?” भाईजींनीं विचारलें.

   

पुढे जाण्यासाठी .......