बुधवार, जानेवारी 20, 2021
   
Text Size

गोड निबंध - २

२९ सत्य सोपें नाहीं

या जगांत जें जें आहे तें तें देवाचें आहे.  म्हणून त्यागबुध्दींने वाग.  गिधाडाप्रमाणें सारें एकटाच बळकावून बसूं नकोस.

-- ईशावास्योपनिषद

येत्या ऑगस्ट महिन्यांत अत्यंत महत्त्वाचीं बिलें असेंब्लींत येणार आहेत.  कुळकायदा, तहशील सुधारण कायदा व कर्जनिवारण कायदा यासंबंधीचीं शेतक-यांच्या जीवनांशी अत्यंत संबंध असलेली बिलें येणार आहेत.  आजच्या या लेखांत कर्जनिवारण या बिलासंबंधींच दोन शब्द मी लिहीत आहें.  इतर बिलांसंबंधीं पुढें केव्हा लिहीन.

मुंबई कां. सरकार जशा प्रकारचें बिल आणींत आहे तशा स्वरूपाचें बिल गेल्या दीडशें वर्षांत कोणी आणलें नाहीं.  कां. सरकार जनतेच्या हितासाठीं आहे.  असें क्रांतिकारक बिल काँग्रेसच आणूं शकेल.  प्रसिध्द झालेला बिलाचा आराखडा क्रांतिकारक नाहीं.  परंतु शेंकडों ठिकाणच्या सूचनांचा विचार होऊन सिलेक्ट-कमिटी बिलाला जें स्वरूप देईल तें क्रांतिकारक होईल अशी अशा आहे.

महाराष्ट्र प्रांतिक कां. कमिटीनें महत्त्वाच्या सूचना केलेल्या आहेत.  परंतु त्या सूचनांत एका गोष्टीबद्दल उल्लेख नाहीं.  बिलाच्या आराखडयांत लिहिलें आहे कीं १९३१ सालापूर्वीं व्याजाचा दर शेंकडा ६ धरावा व ३१ नंतर ९ धरावा.  हिशेब करतांना असें व्याज धरावें असें मूळ बिल म्हणतें.  हे व्याजाचे दर अन्याय्य आहेत.  या दरांबद्दल म. प्रांतिक कमिटी मुकी आहे.  परवा नाशिक जिल्ह्यांत जी व्यापारी व सावकार परिषद भरली तींत १२ रु. शेंकडा दर धरावा असा ठराव झाला.

ब्रि. सरकार ज्या वेळेस कर्ज काढतें त्या वेळेस शेंकडा ३ टक्क्यांहून कमी व्याजाचें दरानें कोटयवधि रु. कर्ज त्याला मिळतें.  पुणें म्यु. टीस शेंकडा ४ दरानें कर्ज मिळणार आहे.  परंतु सर्वांत दरिद्री जो शेतकरी त्याला महाग व्याजाचा दर.  वास्तविक उलट परिस्थिति हवी.  शेतक-यांस सर्वांत स्वस्त दरानें कर्ज मिळालें पाहिजे.  ज्या प्रचंड संस्था आहेत,  मोठमोठया मु. टया, मोठमोठे कारखाने, मोठमोठीं राज्यें, साम्राज्यें त्यांना महाग दर पाहिजे.  आज त्याच्या उलट स्थिति आहे.

आजच्या समाजरचनेंत हाच अन्याय होत आहे.  अधिक भुकेलेल्यांची अधिक उपासमार.  अधिक कष्ट करणा-यांस अधिक कष्ट.  पैशाकडे पैसा जातो ही म्हण खरी आहे.  एखाद्या दुकानांतून जो एकदम चार महिन्यांचा माल घेतो, त्याला स्वस्त भाव असतो.  आतां ४ महिन्यांनी रोख पैसे देऊन एकदम बेगमी, श्रीमंताशिवाय कोण करूं शकेल?  आणि पै पैशाचा माल किंवा उधार माल गरिबाशिवाय कोण घेणार?  गरिबाला सा-या वस्तू महाग.  श्रीमंताला सारें स्वस्त!  अशी विचित्र परिस्थिति जेथें दिसते तेथील सारी समाजरचनाच सडली आहे असें म्हणणें सत्याला धरून आहे.

 

अशा प्रकारचा स्पृश्यास्पृश्य धर्म आपण शेकडों वर्षें पोसला, हे पाप पोसलें ; हें पाप दूर करावयास संत झिजले.  परंतु त्यांचे फक्त तोंडी जयजयकार करीत हें पाप आपण उराशीं धरलेंच आहे.  वर्णाश्रम धर्म म्हणजे स्पृश्यास्पृश्य धर्म नव्हे.  वर्णाश्रम धर्म एवढेंच सांगतो :  तुझ्या आवडीचें कार्य कर.  तें सेवाकार्य कोणतेंहि असो, तें पवित्र आहें तें मोक्ष देईल.  सजन कसाई उध्दरला.  चोखा उध्दरला.  सेना न्हावी उध्दरला, सांवतामाळी उध्दरला.  कोणतेंहि सेवाकर्म तुच्छ नाहीं.  वर्णधर्म, आश्रमधर्म म्हणजे ब्रह्मचर्य पाळ, मग गृहस्थाश्रम कर, मग वानप्रस्थ होऊन पुढें केवळ जगाचें पहाणारा संन्यासी हो.  वर्णाश्रम धर्माचीं आज नांवे उरलीं, आणि हा गुलामगिरीचा जुलुमाचा धर्म मात्र राहिला आहे. 

आम्हीं इंग्रजांजवळ न्याय मागतों आहोत.  कोठल्या तोंडानें मागावा?  शेतकरी म्हणतात, सावकार छळतो.  परन्तु खेड्यांतील स्पृश्य शेतकरी हरिजनांची साधी माणुसकीहि मातींत मिळवीत आहेत.  श्रमणारा किसान आज कष्टी आहे.  खंडोगणती ज्वारी निर्मिणारा आज कण्या खात आहे, उडीद खात आहे हें खरें.  किसानांची कसायांच्या हातची मान वांचविली पाहिजे.  परन्तु त्याबरोबर स्पृश्य किसानांनी श्रमी हरिजनांची मान नको का उंच करायला?  तुम्ही जगाला गुलाम कराल, तर ती गुलामी शतपट वाढून तुमच्या बोकांडीं बसते,  हा अनुभव आपणांस येतच आहे.

लाखों खेडयांतील किसानांना खरा धर्म कामगारांनी नेऊन द्यावा.  शेती वाडी जाऊन बेकार होऊन, घरांदारांस मुकून शेतकरीच शहरांत येऊन कामगार बनला.  कामगार तेवढा एक हा मंत्र तो शिकत आहे.  हिंदुमुसलमान, स्पृश्यास्पृश्य कामगार एका झेंडयाखाली येऊन माणूसकीसाठीं लढत आहेत.  कामगारांनी आपल्या खेड्यांतील बंधूंस हा समता धर्म नेऊन शिकवावा.  त्यांचेंच ते ऐकतील.  आमचें कोण ऐकतो?  खरा धर्म एक दिवस माझे कामगार बंधूच जगाला देतील.  धनधान्य निर्मिणारे, सुंदर वस्तूं निर्माण करणारे कामगारच माणुसकीचा धर्महि निर्मितील.

हिंदुमहासभा लढायला हैद्राबादला गेली.  ठीक.  जेथें अन्याय आहे तेथें जा.  परन्तु आपण हिंदूच हिंदूला ७ लाख खेड्यांत खात आहोत.  हरिजनांना माणसें मानीत नाहीं.  येथें कोण प्रचार करणार?  तेजस्वी स्वातंत्र्यवीर सावरकरांचे ते थोर हरिजन-प्रेम किती जण उराशीं घेतील व खेड्यांतील स्पृश्यांचे शिव्याशाप व दगडधोंडे घेण्यास जातील?

आपणां सर्वांचेंच हें काम आहे.  सारे प्रचारक, कीर्तनकार, प्रवचनकार, सर्वांचे हें काम आहे.  पुण्याला मागें हिंदुमहासभा परिषद झाली होती.  तेथें अस्पृश्यता नष्ट करा सांगणारीं शेकडों व्याख्यानें खेडयांतून देण्याचे संकल्प   झाले.  परन्तु किती जणांनी संकल्प पार पाडले?

खेड्यांतील कष्टमूर्ति शेतकरी बंधो, नको हें पाप.  हरिजनांना प्रेम दे, माणुसकी दे.  त्यांना जवळ घे, त्यांना छळूं नको ; पिळूं नको.  त्याचा स्वाभिमान राख.  त्याला अशी मारहाण नको करूं.  त्याला दिलेली शिवी परमेश्वराला लागते.  त्याला मारलेली लाठी देवाच्या अंगावर उठते.  हरिजनांच्या छळानें त्या देवाच्या हृदयाचीहि चाळणी झाली असेल.  हरिजनांना पाणी दे.  विहिरीवर बसूं दे, ओटीवर सुपारी खाऊं दे.  ही गुलामगिरी दूर करशील तर तुझी गुलामगिरी दूर होईल.  उठ गडया, ख-या धर्माची कास धर.

पाणी फार गढूळ असेल तर त्यांत निवळ टाकावी लागते.  या सडलेल्या समाजाला शुध्द करण्यासाठीं हजारोंच्या प्राणार्पणाची का निवळ टाकिली पाहिजे?  राष्ट्रांतील ही घाण पाहून महर्षि सेनापतींच्या हृदयाची कशी तगमग होत असेल याची कल्पना येते.  हिंदु समाजा, जागृत हो.  खेड्यापाड्यांतील स्पृश्य समाजा, स्वधर्म व स्वकर्तव्य ओळख ; परन्तु लौकर न ओळखशील तर नवभारत त्यासाठी अनंत बलिदानसुध्दां उद्यां करील ! 

-- वर्ष २, अंक २७

 

२८ सडलेला समाज

हिंदुसमाज उच्चनीचपणाच्या कल्पनांनी सडून गेला आहे.  हें उच्च-नीचपणाचें पाणी झिरपत झिरपत खालपर्यंत गेलें आहें.  सा-या समाजांत सर्वत्र शिंवू नको धर्म झाला आहे.  परंतु शिवूं नको धर्माच्या आड आज केवळ आडदांडपणा उरला आहे.  आपल्या हुकमतीखालीं अस्पृश्यांनी राहावें असें स्पृश्यांना वाटतें.  अस्पृश्यांनी स्वाभिमानानें जगतां कामा नये, नीट-नेटकें राहता कामा नये; पाटलांचे हुकूम ऐकले पाहिजेत.  गांवांतील कोणी स्पृश्य सांगेल ते काम केलें पाहिजे.  अशी अनंत गुलामगिरी आहे.  अंमळनेर तालुक्यांतील अनेक गांवांच्या करुण कहाण्या कानीं येऊन स्पृश्य समाजाची   झोटिंगशाही पाहून लाज वाटते.  मुडी गांवी दिपा महाराचा छळ स्पृश्यांनी चालवला आहे.  सारबेंटैं येथील पो.पाटलाच्या चुलत्यानें महार कामगाराला उशीर झाला म्हणून पायांतील जोडयानें बेदम मारलें.  कामगारानें फिर्याद केली आहे.  एक अस्पृश्य फिर्याद करतो यानें चिडून तेथील पो. पाटलानें दडपशाहीं सुरू केली आहे असें कळतें.  टाकरखेड्यांस घरें बांधण्यांसाठीं हरिजनांना प्लॉट्स मिळावे म्हणून केलेल्या अर्जास सरकारची मंजुरी आली.  परंतु त्या नंबरावर मराठयांची खळीं असतात म्हणून त्यांचा हरिजनांवर म्हणे बहिष्कार.  शिरुडला मेलेल्या ढोरांचे कातडें स्पृश्य हक्काने परत मागतात.  तें न ऐकल्यामुळें आज ३॥ वर्षे बहिष्कार;  सर्व बलुतीं बंद.  मुडीच्या एका सुखी हरिजनाच्या शेतांत गुरें घालून मागील वर्षी नुकसान करण्यांत आले.  त्यानें तक्रार केली तर त्याला मारहाण.  केस चालली.  त्यांत मराठ्यांना दंड झाले.  म्हणून अधिकच छळ. हिंगणें खु॥ येथील पो. पाटलाच्या घोडयाची व्यवस्था परगांवाहून येऊन महारांना ठेवावी लागते, नाहीं तर त्रास.  कु-हे येथील मुलकी पाटलानें गांवकामगारास त्यानें पाय दुखत होता म्हणून एक दिवस बिनमोबदला म्हैस चारण्याचें नाकारलें म्हणून घरांत शिरून मारले म्हणतात.  व तक्रार कोठें करशील तर मरशील अशी धमकीहि म्हणे दिली.  आडींचे एका महार भगिनीचें शेत पाटलानें जबरीनें पेरलें.  तिनें मामलेदाराकडे तक्रार केली. मामलेदारानें पाटलास निर्दोष सोडून शेत पिकांसह परत देवविलें.  परन्तु या पाटलानें म्हणें माणसें लावून शेतांतील बाजरी खुडून नेली!  ती महारीण काय करील बिचारी?  मेहेरगांवला महारांनी ''तुमचें घाण पाणी आमचे घराजवळून जातें '' असें नम्रपणें सांगितलें, तर त्या महारांना मारहाण झाली.  त्या महार बंधूची बायको 'मारूं नका ' म्हणाली तर तिलाहि मार.  कराई गांवीं तर हरिजनांवर पक्की गुलामगिरी लादली आहे.  हरिजनांनी चांगले कपडे नाहीं घालता कामा, दागिनें नाहीं घालता कामा, शेती नाहीं करता कामा, घरें नाहीं बांधता कामा!  कोणी स्वाभिमान दाखविला तर जाच होतो. हिंगणें येथें रजपूत लोक आहेत.  खजगी कामें महारांकडून मोफत करवून घेतात.   एकानें नाकारलें तर त्याचा छळ.  जुन्नें खेडीं, पातोंडे येथे हरिजनांस पाणीं नाहीं.  डबकें आटलें म्हणजे स्पृश्यांजवळून पाणी विकत घ्यावें लागतें!

वरील हकिगती मजकडे लिहून आल्या आहेत. त्यांचेवर मी आरोप नाहीं करीत.  त्या शंभर टक्के ख-या कदाचित् नसतीलहि.  परंतु त्यांत कांही तरी तथ्य असलेंच पाहिजे.  जुलूम होत असलाच पाहिजे. अशा गोष्टींना पुरावेहि नसतात.  गांवातील हरिजनहि पुरावा देण्यास भितात.  कारण स्पृश्यांवर ते अवलंबून असतात बिचारे.

   

ज्या खैंबर खिंडीतून जुन्या काळीं परकी पारतंत्र्याचा हल्ला आला त्याच खिंडींतून आज देशभक्तीचा लोंढा येत आहे.  १७ हजार पठाण १९३० च्या लढयांत मिळाले.  ते कां?  सत्याग्रहानें स्वराज्य कां मिळाले नाहीं म्हणून कांहीजण विचारतील.  पण अंब्याच्या झाडाची कोय लावून लगेच फळें येत नाहींत.  ३५ कोटींच्या राष्ट्रालाहि तसाच कालावधि, झगड्यामागून झकडे करावे लागायचेच.

आज तुम्हीं मिरवणुकींतून सारेजण ' इन्किलाब झिंदाबाद भारतमें सैतानी राज, नामंजूर है हमको आज ' असें क्रांतिगीत गात आलांत - हेंच गीत गात तुम्हीं खेडयापाडयांत जा, खेडयांतील जनतेला भडकवा, भिंती रंगवा, एकहि भिंत रिकामी ठेवू नका कीं, जिच्यावर ब्रिटिश साम्राज्यशाहीचा नायनाट करा ; हिंदी संपूर्ण स्वातंत्र्याचा विजय असो असें लिहिलेलें नाहीं.  चीनमधील विद्यार्थांनी काय केलें?  त्यांनी खेडयातील जनतेसाठीं नाटयप्रयोग वगैरे कसले बसविले, त्याची माहिती करून घ्या आणि निदान दर रविवारीं तरी खेडयांत जा.  आतां बारीकसारीक मतभेद विसरा.

खेडयांतील निरक्षरता, अज्ञान, पिळवणूक, दारिद्रय, दैन्य हातीं घेऊन तो प्रश्न धसास लावण्यासाठीं आतां विद्यार्थी संघ घसरावला पाहिजे-जगाचे चाक फिरत आहे.  त्यांतून सुंदर समाजरचनेचें भांडे तयार होईल.  गेल्या महायुध्दांतून रशिया निघाला ;आतांचे महायुध्दांतून हिंदुस्थान निघेल! सर्व जगाला प्रचंड आदर्श निर्माण होईल.  याच क्रान्तिकारक कामासाठीं झटा  तुमची परिषद यशस्वी होवों.  नवी दृष्टी, नवा महाराष्ट्र, नवा हिंदुस्थान, नवें जग डोळयांपुढें ठेवा.  नवी समाजरचना निर्माण करण्यांसाठींच जगा.  स्वातंत्र्याच्या नवीन लढयांत तुम्हीं संपूर्ण भाग घेऊन त्याला प्रचंड यश मिळवून द्याल अशीच माझी श्रध्दा आहे.  वंदे मातरम्!

-- वर्ष २, अंक ३२

 

हिंदी आपली राष्ट्रभाषा.  पण तिच्या बाबतींतहि भांडणे चालू आहेत;  तिलाहि विरोध होत आहे.  ती ऊर्दूनिष्ठ असावी कीं, संस्कृतनिष्ठ असावी अशा भांडणांत काय अर्थ आहे!  हिंदुस्थान हें एक मोठें राष्ट्र आहे.  निरनिराळया लोकांना समजेल अशीच भाषा येथें बोलली गेली पाहिजे.  हिंदु संस्कृतज्ञ माणसापुढें संस्कृतनिष्ठ भाषा बोला. मुसलमान ऊर्दू जाणणा-यांपुढे ऊर्दूनिष्ठ बोला.  कुटुंबात कांही भाऊ असले तर वडील भावाला मान मिळतो खरा सर्वांत अधिक, पण स्वार्थत्यागहि अधिक करावा लागतो.  हिंदुस्थान हें मोठें राष्ट्र आहे.  त्यालाहि जगांत पुढें येण्यासाठीं अधिक स्वार्थत्याग करावा लागेल, तो सहन केला पाहिजे.

आतापर्यंत जनतेची धार्मिक विभागणीं होऊं शकत नाहीं, आर्थिकच होते हें सांगितलें.  तेव्हां कशासाठीं जगायचें व कशासाठी मरायचें हें ठरवून टाका!  दु:खी जनतेला सुखी करण्यासाठीं जगायचें की दु:खी जनतेच्या दु:खात अधिक भर टाकण्यासाठीं?  जगाचे दोन मोठे भाग आहेत. श्रीमंत दरिद्री! तुम्ही आपल्या मनाला विचारा.  बाबा रे तूं कोठल्या बाजूचा?

आज आपली काँग्रेस साम्यवादी नाहीं तरी तिकडे जराशी झुकते आहे.  तिला लाल रंग चढत आहे.  राष्ट्रांत कुणीच दु:खी नको म्हणून ती उभी आहे.  तिला पुढें नेण्याचे हें काम, तिला जोराने हातीं घ्यायला लावण्याचें काम विद्यार्थ्यांनो, तुमचें आहे.  काँग्रेसवर सर्व जण रागावतात पण म्हणून मला ती अधिक पूज्य वाटते.  -- ती सर्वांना सांभाळण्याचा प्रयत्न करते.  वर्ग समन्वयाचा महात्माजींचा महान् प्रयत्न फसला तर काँग्रेसपाशी दुसरा प्रयत्न सज्ज आहेच कीं - वर्गयुध्दाचा!  महात्माजी काँग्रेसला थोपवून धरतील तर आपण तिला पुढें नेली पाहिजे.  काँग्रेसवर रागावून कसें चालेल?

काँग्रेस मुसलमानधार्जिणी आहे म्हणे.  अरे, कसली धार्जिणी नि काय घेऊन बसला आहांत रे!  मुसलमान आमचेच ना? आपल्यांतलेच धर्मांतर करून गेले असें तुम्हीच म्हणतां ना मग ते वाईट कसे रे? तुमचाच भाग मग वाईट कां म्हणता?  प्रार्थनेवरून आपसांत भांडूं नका.  स्वातंत्र्यासाठीं परक्यांशी--ब्रिटिशांशीं भांडा--प्राथर्नेसाठीं कुठेहि तोंड करा पण स्वातंत्र्यासाठी सर्वांची तोंडे एकाच दिशेकडू वळूं द्या !  केमालपाशानें स्वातंत्र्याच्या आणि प्रगतीच्या मार्गात अडथळे होतात म्हणून धर्ममंदिरांचे उच्चाटन केले तर अहरार पक्षानें सर्वांच्या अगोदर स्वातंत्र्य-संग्रामाचें रणशिंग फुंकलें.

   

पुढे जाण्यासाठी .......