शुक्रवार, ऑक्टोबंर 30, 2020
   
Text Size

सती

'आता मी सुखाने मरेन. राम राम ऐकव. गीता ऐकव.'
मैना गीता म्हणत होती. गीता ऐकता ऐकता वासुदेवराव देवाकडे गेले. सर्व पापातून, दोषातून, रोगातून ते मुक्त झाले.
'या, यांना खाली घेऊ,' मैना बाहेरच्या मंडळीस म्हणाली,
वासुदेवरावांचे प्राण शरीरातून बाहेर गेले. त्यांचा मृत देह नेण्यासाठी

सूचना :- पान नं. १८३-१८४ मिळाले नाही
पान नं. १८५ पासून
ज्वाळा जास्तीत जास्त उंच जात होत्या. 'ती पहा लाल खूण. लाल प्रकाश. मैनेचीच ही खूण. होय, मैनेचीच. आज प्रेमाची पौर्णिमा फुलली आहे. मैनेने आज खूण दाखविली. केवढा  प्रकाश!' असे म्हणून गोपाळ टेकडीवरून धावत निघाला. धावत धावत तो आला. त्या चितेकडे धावत धावत आला.

'माझ्या मैनेची खूण. प्रेमाचा प्रकाश. लाल लाल दिवा. आलो, मैने आलो. दाखव, प्रकाश दाखव. दिवा दाखव. मैने, आलो!' असे म्हणून  गोपाळाने त्या चितेत उडी घेतली. मैनेच्या पायावर तो पडला.

'अरेरे!' लोक म्हणाले.

'चंदन घाला आणखी.' कोणी म्हणाले.

'त्यांची जीवनेच चंदनाहून सुगंधी आहेत.'

'पडला, तो पडला. जणू मऊ शीतल गादीवरच पडला आहे. अंगारांची शय्या.'

'प्रेम जवळ असले, म्हणजे अंगार अमृताप्रमाणे होतात.'

हळूहळू लोकांचे बोलणे थांबले. सारे स्तब्ध होते.

तो कोण मुशाफर येत आहे? थकलेला दिसतो. आयुष्याची बरीच यात्रा त्याने केलेली दिसते. तो तेथे आला. येऊन उभा राहिला.

'मैना, कोठे आहे मैना?' त्याने सद्गदित होऊन विचारले.

'ती हसत सती गेली. गोपाळानेही आगीत उडी घेतली.

'अरेरे!' तो यात्रेकरू म्हणाला.

'आता अरेरे करून काय होणार? तुम्ही कोण?'

'मुलाला मारणारा बाप.'

'तुम्ही का मैनेचे वडील?'

'हो.'

कोण बोलणार? जयंताने दिलेली फुले. ती कोणाला द्यावयाची? पित्याने ती सुकलेली फुले पिशवीतून काढली. ती त्याने चितेवर वाहिली. पित्याने चितेला प्रणाम केला, साष्टांग नमस्कार घातला.

'मैने क्षमा कर, पापी पित्याला क्षमा कर.' तो म्हणाला.

मंडळी गावात परतली. पिता तसाच पुन्हा परतला. तो तेथे राहिला नाही. आल्या पाऊली परत गेला.

'कसे आहे मैनेच्या नव-याचे?' सावित्रीबाईंनी विचारले.

'आता त्याला पुन्हा आजार येणार नाही.' धोंडोपंत म्हणाले,

'मैना कोठे आहे?'

'ती सती गेली.'

'सती?'

'हो. गोपाळानेही चितेत उडी घेतली, अग्नीने त्यांचे लग्न लावले, देह जाळून आत्म्यांचे लग्न. चिर लग्न.'

 

पुढे जाण्यासाठी .......

सती