सोमवार, फ़ेब्रुवारी 24, 2020
   
Text Size

सोन्यामारुति

वसंता उठला. त्यानें शौचमुखमार्जन केलें.

वेदपुरुष : वसंता, चल मंदिरात जाऊ.

वसंता : घाटावर किती गर्दी .

वेदपुरुष : देवधर्म, स्नानसंध्या अजून आहे.

वसंता : हे सारे निष्पाप असतील का ?

वेदपुरुष
: त्यांनी संध्येंत तर आतां तसे म्हटले.

वसंता : परंतु  हे तशी ग्वाह देतील का ?

वेदपुरुष : एकदा शंकरानी माणसाचें रूप घेतले व गंगेवर गेले. ''मी संकल्प सांगतो, मी संकल्प सांगतो'' अशी त्यांच्याभोवतीं गर्दी झाली. भगवान शंकर म्हणाले, ''ज्याला वाटत असेल कीं मी निष्पाप आहें, त्यानें मला संकल्प सांगावा. तुम्ही रोज गंगेत स्थान करतां. गंगा पापं शशी तापं वगैरे म्हणतां स्थानसंध्या करतां. पातक कोठे उरले आतां ? पहा, ज्याला वाटत असेल त्यानेंच संकल्प सांगावा. पाप्याचा संकल्प मला कशाला ? मला स्वत: पापाचें कमी नाही. पाप्याचा संकल्प मीही सोडीन. पुण्यवंतानें सागितलेला संकल्प मला पाहिजे आहे का कोणी ?'' वसंता! भराभर सारे निघून गेले. दुसरीकडे संकल्प सांगण्यासाठी गेले. शंकरांच्या शेजारीं कोणीही उभे राहिलें नाही.

वसंता
: कैलासावर घरे बांधण्याची जरुर राहिली नाहीं त्यांना. निश्चित झाले ते. पुण्यवंत होऊन कैलासाची पायरी कोणीहि चढणार नाही.

वेदपुरुष
: ती बघ देवळाकडे गर्दी चालली आहे. कुजबुज सुरू आहे. पोलीसहिं जात आहेंत. चल लौकर .

वसंता
: चला खूपच तोबा उडाला आहे. मंदिराचे आवार भरले आहे. आपण सूक्ष्मरूप घेऊन पोळींवर बसू .

वेदपुरुष : बरे.

पुजारी
: हें मूल कोणाचें मी तरी काय सांगूं ?

पोलीस
: तुम्हीं केव्हां पाहिलें ?

 

वेदपुरुष : छत्तीस लाख रुपयांचा तेथें फन्ना उडाला आहे.

वसंता : छत्तीस लाखांचा तो तुरुंग आहे ? खरेंच का ?

वेदपुरुष : हो.

वसंता : हे पैसे जर धंदेशिक्षण देण्यांत सरकारनें घातले असते तर किती छान झालें असतें ? गांधींनी पंचवीस लाख रुपये खादी धंद्यांत घातले व पत्रास हजारांना काम दिलें. सरकारलाहि करतां आलें असते.

वेदपुरुष : परंतु माणुसकी हवी, इच्छा हवी. जगांत मांगल्य अधिक निर्माण व्हावें, जास्तींत जास्त लोक सुखी व्हावेत अशी तळमळ हवी. कोण फ्रेंच लेखकानें म्हटलें आहे कीं ''एक शाळा उघडणें म्हणजे एक तुरुंग बंद करणे.'' ती अर्थात बेकारी निर्माण करणारी शाळा असतां कामा नये. देहाच्या पोषणाचीं साधनें देणारी आणि त्याबरोबरच हृदयाचें व बुध्दीचेंहि पोषण कसें करावे तें शिकवणारी ती खरी शळा! देहाची उपासामार बंद न करणारे शिक्षण तें शिक्षणच नव्हे.

वसंता
: छत्तीस लाखांची ही मोठी कबरच आहे.

वेदपुरुष : होय. माणसांची जीवनें येथें मातीमोल होतात! हजारों जीवनांची राख होते! कबरस्थान म्हण, कांहींहि म्हण !

वसंता : मी आतां निजतो. गोदामाईच्या मांडीवर निजतों.

वेदपुरुष : नीज नीज. मी काळ्या रामाला प्रदक्षिणा घालतों.

वसंता : वेदांतील कांहीं सुंदर मंत्र म्हणा, उपनिषदांतील भाषा गा. त्यांच्या नादांत मी झोंपेन.

वेदपुरुष : सार्‍या विश्वांतील वेद ऐकवतों, नीज.

वसंता : क्षणभर मला जगांतील सर्व भाषा समजतील असें करा.

वेदपुरुष : जशी तुझी इच्छा.

वसंता : गा, आतां रशियांतील गीतें गा वा प्रशियांतील गीतें गा. तिबेटांतील गा वा तास्मानियांतील गा. काठेवाडांतील गा. काश्मिरांतील गा.

वेदपुरुष जगांतील महर्षीनीं रचलेलीं महान् रुद्रसूक्तें म्हणूं लागला. नव संदेश देणारीं, नव जीवन देणारीं, खरा पुरुषार्थाचा मार्ग दाखवणारीं पुरुषसूक्तें म्हणूं लागला. जगांत क्रांतीचे नवपवन वाहवणारीं पवमाने पढूं लागला. गरिबांचा गौरव करणारा सौर म्हणूं लागला. जीर्ण शीर्ण झडझडून टाकणारी, सर्वत्र मधुमधु मांगल्य दाखवणारीं त्रिसुपर्णे म्हणूं लागला. अनंत वेद, अनंत ऋचा.

वसंता त्या मंत्रसागरांत बुडून गेला. वेदपुरुष म्हणतां म्हणतां डोलूं लागला, मुका झाला. वेदपुरुषाची ज्ञानमय समाधि लागली.

पहांट झाली! नदीच्या घाटावर सनातनी मंडळी जमूं लागली. पळीपंच पात्रीं वाजूं लागलीं वेदमंत्र कानांवर येऊं लागले. अधमर्षणें सुरु झाली. रात्रीं केलेल्या पापाचें ''रात्रिकृतं पापं नाशयतु'' असें म्हणून भस्म करावयाचें व सायंकाळी ''दिवसकृतं पापं नाशयतु'' असा मंत्र म्हणून दिवसाचें पाप नाहिसें करावयाचें. सोपा मोक्षाचा मार्ग. सदैव पाप करुन सदैव निष्पाप!

 

वेदपुरुष : लोळ लोळ. घोळ घोळ. तुलसीरामायणांत राम जेथें जेथें बसला, उठला, झोंपला, तेथें तेथें भरत लोळून घेत होता असें वर्णन आहे.

वसंता : तुलसीरामायण फारच गोड आहे, होय ना ?

वेदपुरुष : होय! उत्तर हिंदुस्थानचा तो वेद आहे. तूं तें एकदां वाच.

वसंता : मला हिंदीं येत नाहीं.

वेदपुरुष : मग शीक. हिंदीं आलीच पाहिजे. हिंदुस्थानचें हदय एकत्र आणणारी हिंदी आधीं शीक. तुलसीरामायणासाठीं तरी शीक.

वसंता : माझ्या ज्ञानेश्वरीसाठीं माझी मराठी कोण शिकेल ?

वेदपुरुष : तुझी मराठी पॅरिसमधला पंडित शिकेल! ज्ञानेश्वरीच्या व्याकरणांचा अभ्यास पॅरिसमधील विद्यापीठांत होतो.

वसंता : कसा गार वारा आला !

वेदपुरुष : तूं झोंपतोस ना ?

वसंता : हा कसला आवाज ? किती भीषण वाटतो आहे ?

वेदपुरुष
: नाशिकमधल्या तुरुंगांतील हा विजेच्या शिंगाचा आवाज !

वसंता : हा थांबत नाहीं.

वेदपुरुष : तुरुंगांत गणति होत आहे. गणति पुरी झाली, कैद्यांची संख्या जुळली कीं तें शिंग थांबेल.

वसंता : असे कां करतात ?

वेदपुरुष : मधून मधून असें करतात. त्यामुळें पहारेकरी, शिपाई नेहमीं सावध राहतात.

वसंता
: नाशिकचा तुरुंग प्रसिध्द आहे.

   

दुसरा : जरा झपझप पावलें टाक.

पहिला : चल.

वसंता : किती काळोख आहे !

वेदपुरुष : आणि देवाजवळचा दिवाहि बिघडलेला दिसतो !

वसंता : देवाजवळ दिवा कशाला ? सूर्याजवळ पणती कशाला ?

पहिला : रामा, क्षमा कर. बाळाला सांभाळ.

दुसरा : चल चटकन्.

पहिला : कोणीं पाहिलें का ?

दुसरा : केव्हां ?

पहिला : भास झाला.

दुसरा : वरुन वटवाघळें गेलीं.

वसंता : आतां या मुलाचें काय होईल ?

वेदपुरुष : सकाळीं समजेल. सूर्याच्या प्रकाशांत पाहूं.

वसंता : आतां कोठें जायचें ?

वेदपुरुष : गंगेच्या कांठानें हिंडूं.

वसंता : गंगातीरावर मी निजतों. रामाचे पाय लागलेली ही भूमि! तिच्यावर लोळतों, पवित्र होतों.

 

ताई : त्याला पाजलेंहि नाहीं, नीट पाहिलेंहि नाहीं. आईनें नेलें.

आई : ने लौकर. बोलायची वेळ नाहीं.

दुसरा : मांजरें बाहेर भांडत आहेत !

आई : मुलाचें रडणें ऐकूं जाणार नाहीं.

दुसरा : चल रे.

आई : सावधपणें जा. काळोख आहेच. सावासारखे जा. चोरासारखे जाऊं नका. मी दार लावून घेतें.

पहिला : कठीण काम !

दुसरा : ही सनातन संस्कृति !

पहिला : तिचीं फळें देवाच्या चरणीं वाहूं.

दुसरा : सनातन संस्कृति देवासाठींच आहे. मानवासाठीं नाहीं.

पहिला : मुकाट्यानें चला.

दुसरा
: कोण आहे तें ? आपल्यापाठीमागून कोणी येत का आहे ?

पहिला : कोणी येत नाहीं.

दुसरा : एवढ्या रात्रीं नारोशंकरी घंटा कोण वाजवीत आहे ?

पहिला : कोणी देवाचा भक्त! पाप करुन आला असेल व '' पाहि मां '' म्हणत असेल ?

   

पुढे जाण्यासाठी .......