मंगळवार, आँगस्ट 21, 2018
   
Text Size

सेवासदनात

प्रेमाला नर्स व्हायचे होते. आपण डॉक्टर व्हावे असे लहानपणी तिला वाटत असे. परंतु डॉक्टर नाही तर निदान नर्स तरी होता आले तर पाहावे असे तिने ठरविले. ती मराठी शिकलेली होती. इंग्रजी तिला येत नव्हते. तिने पुष्कळ वाचले होते; परंतु ते सारे मराठीत. ती हुशार होती. बहुश्रुत होती. लग्नापूर्वी रामरावांना ती वर्तमानपत्रे वाचून दाखवायची; परंतु आता इंग्रजी शिकायला हवे होते.

ती तेथे महिलाश्रमात इंग्रजी शिकू लागली. लवकरच पुरेसे इंग्रजी तिचे झाले. तेथील सर्वांच्या संमतीने ती पुण्यास सेवासदनात नर्सिंगचा कोर्स घ्यायला गेली. तिची मोफत व्यवस्था करण्यात आली होती.

तेथे ती सर्वांची आवडती झाली. ती सर्वांच्या उपयोगी पडे. सर्वांचे काम करी. सेवासदन संस्था तिला फार आवडे. लहानपणी ‘आमच्या आयुष्यातील आठवणी’ हे रमाबाई रानडे ह्यांनी लिहिलेले पुस्तक प्रेमाने वाचले होते. ते तिला फार आवडायचे. सेवासदन म्हणजे रमाबाईंचीच संस्था. रमाबाईंच्या तेथील भव्य तैलचित्राला ती वंदन करी. एकदा एका वेळी सभेत तिने रमाबाईंच्या चरित्रावर भाषण केले. फार सुरेख ती बोलली. सर्वांनी वाहवा केली.

एकदा ती आपल्या काही मैत्रिणींबरोबर फिरायला गेली होती. वाटेत एकाएकी तिला घेरी आली. तिला एका टांग्यात घालून एक मैत्रीण परत आली. प्रेमा सावध झाली; परंतु कसला तरी धक्का तिला एकदम बसला होता. दोन दिवस ती पडून होती.

एके दिवशी ती आपल्या खोलीत रडत होती. तिच्या मैत्रिणी आल्या, तो प्रेमाच्या डोळ्यांत आपले पाणी.

‘प्रेमा काय झाले?’

‘जुन्या आठवणी येतात व वाईट वाटते.’

‘चल, व्याख्यानाला येतेस ना? आरोग्यशास्त्रावर व्याख्यान आहे. चल.’

‘तुम्ही जा. आज नाही मी येत.’

‘अशी एकटी नको रडत बसू. ऊठ.’ मैत्रिणींनी तिला बळेच नेले.

 

पुढे जाण्यासाठी .......