शनिवार, जुलै 11, 2020
   
Text Size

गुराखी

प्रधान म्हणाला, “महाराज, चार दिवस नकोत. आताच घ्या. चार दिवसांची मुदत द्याल, परंतु माझे शत्रू म्हणतील की नेलेले पैसे आणून ठेवले असतील, पुन्हा संशयाला जागा नको.”

राजा म्हणाला, “ठीक तर, आताच खजिना पाहू.”

राजा निघाला. तो प्रधान निघाला. सारी जुनी कारभारी मंडळी निघाली. खजिना मोजण्यात आला. पाव आण्याचीही चूक नाही. मत्सरी मंडळीची मान खाली झाली. परंतु त्यातील एकजण धीर करुन राजाला म्हणाला, “राजा, या प्रधानाच्या घराची झडती घ्या. खात्रीने चोरलेली हिरेमाणके तेथे सापडतील.”

राजा म्हणाला, “चला.”

सारे प्रधानाच्या घरी गेले. ओटीवर साधी चटई होती. ना गालीचे, ना हंड्याझुंबरे, राजा म्हणाला, “यांचे घर तर साधे दिसते.”

मत्सरी मंडळी म्हणाली, “लबाड लोक वरुन असेच असतात. बगळे दिसायला ढवळे परंतु आत काळे.”

राजा म्हणाला, “बरे. घरात शिरु या.”

घरात कोठे काही सापडले नाही. परंतु शोधता शोधता एका खोलीत एका कपाटाला भले मोठे कुलूप होते.

मंडली म्हणाली, “केवढे मोठे कुलूप! यात असेल चोरीचा माल.”

राजाने विचारले, “प्रधानजी, यात काय आहे?”

 

पुढे जाण्यासाठी .......