सोमवार, जुलै 13, 2020
   
Text Size

गुराखी

प्रधान म्हणाला, “महाराज, माझी सारी संपत्ती यात आहे.”

राजा खवळला. रागाने लाल झाला. तो ओरडून म्हणाला, “फोडा ते कुलूप.”
कुलूप फोडण्यात आले. परंतु आत काय होते? तेथे एक फाटकी घोंगडी, एक काठी व एक फाटका वहाणाचा जोड होता.

राजाने रागाने विचारले, “कोठे आहे संपत्ती? राजाची थट्टा करतोस?”

प्रधान नम्रप्रणे म्हणाला, “महाराज, हीच माझी खरी संपत्ती. तुमच्या वडिलांनी मला रानातून आणले तेव्हा एवढ्याच वस्तू माझ्याजवळ होत्या. बाकीचे माझे वैभव तुमचे होते. ते मी सारे लोकांस देत असे. आई म्हणाली होती, ‘राजाची मर्जी म्हणजे  आळवावरचे पाणी. राजाची नोकरी म्हणजे सुळावरची पोळी.’ तिचे शब्द खरे झाले. मी पुन्हा रानात जातो व रानातील राजा होतो.”

राजाला वाईट वाटले. त्याला त्या दुष्ट कारभारी मंडळींचा राग आला. त्याने गुराख्याला सांगितले, “तू जाऊ नकोस. या चांडाळांनाच मी दूर करतो. तुझ्यासारखा प्रधान असेल तरच राजाच्या हातून भले होईल. लोकांच्या कल्याणासाठी तरी तू रहा.”

गुराख्याने ऐकले. दुष्ट मंडळी दूर गेली. प्रजा सुखी झाली. गुराख्याने आपल्या आईलाही रानातून आणिले. तो दिवसा लोकांचे कल्याण करी व रात्री आईचे पाय चेपून तिचा आशीर्वाद घेई.

 

पुढे जाण्यासाठी .......