सोमवार, जुलै 13, 2020
   
Text Size

दगडफोड्या

एक होता दगडफोड्या. गाढवांवर दगड घालून तो नेहमी नेत असे. एके दिवशी दगड लादलेली गाढवे घेऊन तो झा झा करीत जात होता. तो त्याला वाटेत शिपायांनी आडवले. ते त्याला म्हणाले, “हा रस्ता बंद आहे. राजेसाहेबांची स्वारी या रस्त्याने जाणार आहे. माहीत नाही का तुला, दिसत नाही का तुला ? चालला गाढवे घेऊन. गाढवच दिसतोय.”

तो दगडफोड्या म्हणाला, “मी असा राजा असतो तर किती छान झाले असते. मग मला कोणी अडविले नसते. मीच सा-यांना अडविले असते.” त्याच्या मनात असे आले नाही तोच त्याच्यासमोर एक देवता उभी राहिली. तिने त्याला विचारले, “तुला काय राजा व्हायचे आहे?”

तो म्हणाला, “हो, मला राजा व्हायचे आहे, म्हणजे सारे हात जोडून माझ्या समोर उभे राहतील.”

देवता म्हणाली, “ठीक तर. मीट डोळे व उघड म्हणजे तू राजा झालेला असशील.”

दगडफोड्याने डोळे मिटले व उघडले. तो काय आश्चर्य ! तो एकदम राजा झालेला. तो  पांढ-या छानदार घोड्यावर बसलेला होता. अंगावर जरीचा पोशाख होता. डोक्यावर मुगुट होता. भालदार, चोपदार जयजयकार करीत होते. मोठमोठे शेट, सावकार, सरदार, जहांगीरदार नजराणे देत होते व अदबीने नमस्कार करीत होते.

परंतु आकाशात वर सूर्य़ तापत होता. राजाला ताप सहन होईना. तो मनात म्हणाला, “हा सूर्य माझ्यापेक्षा मोठा दिसतो. त्याला माझी पर्वा वाटत नाही. मी सूर्य़ असतो तर चांगले झाले असते.”

तो असे मनात म्हणतो तोच ती देवता त्याच्यासमोर उभी राहिली व म्हणाली, “काय तुला सूर्य़ व्हायचे आहे ? मीट डोळे व उघड म्हणजे तू सूर्य़ झालेला असशील.”

त्याने तसे केले व तो सूर्य़नारायण झाला. तो आता सारा पराक्रम दाखवू लागला. बारा डोळे जणू त्याने उघडले. झाडेमाडे सुकून गेली. नद्यानाले आटून गेले. गाईगुरे तडफडू लागली. सूर्य़ाला ऐट आली.

 

पुढे जाण्यासाठी .......