सोमवार, जुन 01, 2020
   
Text Size

खरा भक्त

“हो.”

“त्याला वेदमंत्र येत नसतील. जपजाप्य करीत नसेल तो. पूजा तरी कशाने करणार ? कोठून आणील गंध ? कोठून आणील नीरांजन ? येथे राजा रोज पूजेसाठी येतो. कशी घवघवित दिसते ती पूजा. किती माळा, किती कापूर. त्या राजापेक्षाही का तो गुराखी मोठा भक्त ?”

“हो; पुन्हा पुन्हा काय सांगू ?”

“महाराज. तुमच्या म्हणण्यावर विश्वास बसत नाही.”

“उद्या प्रचीती दाखवितो. राजा पूजा करील त्यावेळेस व गुराखी दुपारी येईल त्या वेळेस तुम्हीही येथे असा.”

“अवश्य येईन.”

तो मनुष्य निघून गेला. संन्यासी आपल्या कर्मात रमला.

दुसरा दिवस उजाडला. तो मनुष्य आधीच देवळात येऊन बसला. काही वेळाने राजा आला. चौघडा वाजू लागला. सनया आलापू लागल्या. महापूजा सुरू झाली. माळा चढविण्यात आल्या. कापूर पेटवून राजा ओवाळू लागला. इतक्यात काय झाले ? ते देऊळ एकदम हलू लागले. भूकंप होणार असे वाटले. राजा घाबरला. दगड डोक्यावर पडतात की काय असे त्याला वाटले. त्याच्या हातातील ती हलकारती खाली पडली. कोठले ओवाळणे, कोठली पूजा. राजा धूम पळत सुटला. राजाच्या बरोबरचे सारे पळत सुटले. ती पूजा तशीच अर्धवट तेथे पडून राहिली.

दुपारची वेळ झाली. तो गुराखी आला. त्याच्या गाई रानात चरत होत्या. तो देवाच्या दर्शनाला आला. तो गाभा-यात शिरला. पिंडीला त्याने कडकडून मिठी मारली. नंतर त्याने आपल्या भाकरीचा नैवेद्य देवासमोर ठेवला. क्षणभर त्याने डोळे मिटले. आणि तेथेच ती कांदाभाकर खाऊ लागला. आईच्या जवळ बसून जेवू लागला. देव म्हणजे सर्वांची आई  ना ?

 

पुढे जाण्यासाठी .......